सगळा देश टी-20 फायनल पाहण्यात दंग, इकडे Disney+ Hotstar ने केली कोटींची कमाई, प्रत्येक सेकंदाला लाखो कमवले!
टी-20 लढतीत भारताे दक्षिण आफ्रिकेला पारभूत केलं. भारताने सात धावांनी विजय मिळवला. दरम्यान, हा सामना चालू असताना Disney+ Hotstar मात्र चांगलीच कमाई केली.
मुंबई : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वात टीम इंडियाने टी-20 विश्वचषक जिंकला आहे. भारताने या स्पर्धेच्या अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेला सात धावांनी पराभूत केलंय. या विजयासह भारताचा तब्बल 17 वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपला आहे. भारताची टीम ही ट्रॉफी घेऊन लवकरच भारतात परतणार आहे. समस्त भारतीयांनी बार्बाडोसमधील ही अंतिम लढत पाहिली. डिज्नी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सामना मोफत पाहण्याची सोय होती. दरम्यान, भारतात कोट्यवधी लोक या सामन्याचा आनंद लुटत असताना दुसरीकडे Disney+ Hotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मने कोट्यवधी रुपये कमवले आहेत.
भारताचा सात धावांनी विजय
भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील ही लढत Disney+ Hotstar हॉटस्टावर मोफत पाहण्याची सोय होती. Disney+ Hotstar वर साधारण पाच कोटीपेक्षा अधिक क्रिकेटचाहते हा अंतिम सामना पाहात होते. भारताने या सामन्यात 20 षटकांत 176 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेला 169 धावाच करता आल्या. सात धावांनी भारताने या समन्यात विजयी कामिगीरी केली.
Disney+ Hotstar ची मोठी कमाई
दरम्यान, एकीकडे समस्त भारतीय या समन्याचा आनंद लुटत असताना दुसरीकडे Disney+ Hotstar ने मात्र कोट्यवधी रुपये कमवले आहेत. भारताने अंतिम लढतीत उडी घेतल्यानंतरच Disney+ Hotstar या सामन्यात चांगले पैसे कमवणार हे ठरलेले होते. त्याची प्रचिती प्रत्यक्ष सामना चालू झाल्यावर आली. भारत अंतिम लढतीत पोहोचताच स्टार स्पोर्ट्स आणि Disney+ Hotstar या मंचावरील जाहिरातींचे दर वाढवण्यात आले. त्यामुळेच या दोन्ही मंचांनी मोठी कमाई केली आहे.
प्रतिसेकंद 2.5 ते 3 लाख रुपयांची कमाई
Disney+ Hotstar जवळ आयसीसीचे सामने दाखवण्याचे राईट्स आहेत. त्यामुळे स्टार स्पोर्ट्स चॅनल्सवर जेव्हा लाईव्ह सामने चालू होते, तेव्हा कंपनीने अंतिम सामन्यासाठी जाहिराती ब्रॉडकास्ट करण्याची फी प्रति 10 सेंकद 25 ते 30 लाख रुपये याप्रमाणे वाढवली होती. म्हणजेच Disney+ Hotstar ने अंतिम सामन्यादरम्यान प्रतिसेकंद 2.5 ते 3 लाख रुपयांची कमाई केली, असा अंदाज लावला जात आहे.
भारत अंतिम लढतीत नसता तर घटली असती कमाई
भारत अंतिम लढतीत नसता तर ही कमाई घटली असती. विश्वचषकादरम्यान स्टार स्पोर्ट्सने आपल्या चॅनलवरील जाहिरातीचा दर 13 ते 26 लाख रुपये प्रति 10 सेंकद असा ठेवला होता. मात्र भारत अंतिम लढतीत पोहोचताच हे दर वाढवण्यात आले.
हेही वाचा :
विराट, रोहितनंतर आता 'या' दिग्गज खेळाडूकडून निवृत्तीची घोषणा
Virat Kohli Net Wealth : टीम इंडियाला विजय मिळवून देणारा विराट कोहली किती कोटींचा मालक?