एक्स्प्लोर

Artificial Intelligence : AI चा कोर्स करा, लाखो रुपयांचा पगार मिळवा, करिअरची मोठी संधी

Artificial Intelligence : आज मोठ्या कंपन्या AI ची समज आणि तंत्रज्ञान असलेल्या लोकांच्या शोधात आहेत. त्यामुळे या क्षेत्रात अभ्यास असमाऱ्यांना नोकरीच्या मोठ्या संदी आहेत. 

Artificial Intelligence : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हे आजच्या युगातील सर्वात फायदेशीर करिअरपैकी एक आहे. आज, AI द्वारे, लोक तासभर लागणारे काम काही मिनिटांत पूर्ण करु शकतात. अशा परिस्थितीत, आज मोठ्या कंपन्या AI ची समज आणि तंत्रज्ञान असलेल्या लोकांच्या शोधात आहेत. त्यामुळे या क्षेत्रात अभ्यास असमाऱ्यांना नोकरीच्या मोठ्या संदी आहेत. 

जेव्हा एखादे यंत्र मनुष्यासारखा विचार करुन कोणतेही काम करू लागते, तेव्हा त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात. या विषयावर टर्मिनेटर, ब्लेड रनर, स्टार वॉर, मॅट्रिक्स, आय रोबोट असे अनेक हॉलीवूडपट बनले आहेत. या तंत्रज्ञानात यंत्र माणसाचे काम सोपे करते. ही गुणवत्ता जगभरातील अनेक कंपन्यांना आकर्षित करत आहे. AI चा वापर समस्यांचे निराकरण, नवीन योजना, नवीन कल्पना शोधण्यासाठी केला जाऊ शकतो. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित चॅटबॉट, चॅटजीपीटीचा वापर चर्चेत आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी आवश्यक पात्रता काय?

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अभ्यास करण्यासाठी 12 वीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या विषयांसोबतच कॉम्प्युटर सायन्स, आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयांची पदवी असणे आवश्यक आहे.

कशी कराल करिअरची सुरुवात?

एआय क्षेत्रात उत्तम करिअर करण्यासाठी संगणक विज्ञान आणि गणिताचे ज्ञान आवश्यक आहे. अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर तुम्ही या क्षेत्रात करिअर करू शकता. ही पदवी कॉम्प्युटर सायन्स, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी, मॅथ्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल्स या विषयांमध्ये असावी. काही संस्थांमध्ये, एआय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देखील घेतल्या जातात, ज्यात पात्रता असणे आवश्यक आहे. संगणक विज्ञान पदवीधर उमेदवार देखील या क्षेत्रात काम करू शकतात. B.Tech/M.Tech पदवीधर, BCA/MCA पदवीधर, B.Sc IT/MSc IT पदवीधर, सॉफ्टवेअर अभियंता/डेव्हलपर्स/वास्तुविशारद देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोर्स करू शकतात. जर उमेदवाराला ग्रॅज्युएशन दरम्यान सांख्यिकी, संभाव्यता सिद्धांत, रेखीय बीजगणित यासारखे मूलभूत ज्ञान तसेच UNIX साधने आणि प्रगत सिग्नल प्रक्रिया तंत्रांची चांगली माहिती असल्यास, तो या क्षेत्रात उच्च स्तरावर पोहोचू शकतो. या क्षेत्रातील शक्यता आणि करिअर वाढीला मर्यादा नाही.

कुठे कराल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कोर्स ?

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चंदीगड विद्यापीठ, चंदीगड
एसआरएम ईश्वरी अभियांत्रिकी महाविद्यालय, चेन्नई
किंग्ज कॉर्नरस्टोन इंटरनॅशनल कॉलेज, चेन्नई
सविता अभियांत्रिकी महाविद्यालय, चेन्नई
इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIIT), नवी दिल्ली

लाखो रुपये मिळणार पगार

नोकरीव्यतिरिक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अभ्यास करण्याचा सर्वात मोठा फायदा पगाराच्या बाबतीतही होतो. अभियांत्रिकीच्या इतर शाखांपेक्षा जास्त पगार हे या क्षेत्राचे आकर्षण आहे. भविष्यात प्रत्येक क्षेत्रात AI तज्ञ दिसतील. AI चा वापर सर्वत्र उद्योग, डिझायनिंग, अवकाश, अभियांत्रिकी, वैद्यकीय इत्यादी सर्वत्र केला जाईल. AI मध्ये शिक्षण घेतल्यानंतर, सुरुवातीचे पॅकेज 70 हजार ते 1 लाख रुपये प्रति महिना असू शकते, तर पाच ते दहा वर्षांच्या अनुभवानंतर ते दरमहा सुमारे 4 ते 5 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tatkal Ticket Booking New Rule : तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?

व्हिडीओ

Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tatkal Ticket Booking New Rule : तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
Video: ठाकरेंसोबतची भाजपची युती कशी तुटली, कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
Video: ठाकरेंसोबतची भाजपची युती कशी तुटली, कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
आष्टा नगरपालिका 'मतदार' राड्यानंतर स्ट्राँग रुमची पाहणी, कार्यकर्त्यांचा गोंधळ; जयंत पाटलांची मोठी मागणी
आष्टा नगरपालिका 'मतदार' राड्यानंतर स्ट्राँग रुमची पाहणी, कार्यकर्त्यांचा गोंधळ; जयंत पाटलांची मोठी मागणी
Illegal Bike Taxi : बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
Embed widget