टोमॅटोनं बदललं शेतकऱ्याचं जीवन, कमी खर्चात मिळवलं लाखो रुपयांचं उत्पन्न
उत्तर प्रदेशमधील (UP) एका शेतकऱ्याने टोमॅटोच्या शेतीतून (Tomato Crop) मोठं उत्पन्न मिळवलं आहे. बबलू कुमार (Bablu Kumar) असं या शेतकऱ्याचं नाव आहे.
Success Story: अलिकडच्या काळात अनेक शेतकरी (Farmers) आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकरी कमी क्षेत्रात भरघोस, उत्पादन घेत आहेत. एका अशाच उत्तर प्रदेशमधील (UP) एका शेतकऱ्याने टोमॅटोच्या शेतीतून (Tomato Crop) मोठं उत्पन्न मिळवलं आहे. बबलू कुमार (Bablu Kumar) असं या शेतकऱ्याचं नाव असून, ते रायबरेलीच्या चिटवानिया गावातील रहिवासी आहेत. पाहुयात त्यांची यशोगाथा.
बबलू यांनी पारंपारिक शेती करण्यापेक्षा वेगळी शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या शेतात टोमॅटोची लागवड केली. यातून त्यांना चांगला नफा मिळत आहे. इतर पिकांच्या तुलनेत टोमॅटो पिकाला खर्चही कमी येतो, त्यामुळं टोमॅटो पिकाची शेती परवडत असल्याची माहिती बबलू यांनी दिली. खर्च जाऊन बबलू यांना 1 एकर टोमॅटोच्या पिकातून 3 ते 4 लाख रुपयांचा नफा निव्वळ नफा झाल्याची माहिती दिली.
टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी कमी खर्च
इतर पिकांच्या तुलनेत टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी कमी खर्च येतो. त्यामुळं गेल्या पाच वर्षापासून मी टोमॅटोची लागवड करत असल्याची माहिती शेतकरी बबलू कुमार यांनी दिली. कमी खर्च आणि कमी काळात टोमॅटो विक्रीसाठी बाजारात नेता येतं. त्यामुळं कमी कालावधीत पैसे मिळतात. सध्या बाजारात टोमॅटोला मोठी मागणी देखील आहे. याचा आम्हाला चांगला फायदा होत असल्याची माहिती बबलू कुमार यांनी दिली.
एका कॅरेटची किंमत ही 600 ते 700 रुपये
बबलू कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या टोमॅटोच्या एका कॅरेटची किंमत ही 600 ते 700 रुपये आहे. एका कॅरेटमध्ये 25 ते 30 किलो टोमॅटो बसतात. त्यामुळं शेतकऱ्यांना या दराचा फायदा होत आहे. वालुकामय माती टोमॅटोच्या लागवडीसाठी योग्य समजली जाते. तसेच काळी , तांबडी माती देखील लागवडीसाठी योग्य मानली जाते. फक्त ही जमिन पाण्याचा निचरा होणारी हवी आहे.
मागील वर्षी टोमॅटोच्या किंमतीनं मोडला होता विक्रम
मागील वर्षी जुन जुलै महिन्यात टोमॅटोच्या किंमतीनं विक्रम केला होता. प्रतिकिलो टोमॅटोचे दर हे 200 रुपयांच्या आसपास गेले होते. यावेळी ज्या शेतकऱ्यांकडे टोमॅटो होती, त्या शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला होता. मात्र, यावेळी देखील किंमती नियंत्रीत करण्यासाठी सरकारनं एक धोरणं आखलं. सरकारनं देशातील टोमॅटोच्या किंमती कमी करण्यासाठी नेपाळवरुन टोमॅटोची आयात केली. परिणामी देशातील टोमॅटोच्या किंमती घसरल्या होत्या. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला होता. आता पुन्हा टोमॅटोच्या किंमती वाढत असल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या: