एक्स्प्लोर

8 व्या वर्षीच उद्योजक, 10 व्या वर्षी स्वत:ची वेबसाइट तर 18 व्या वर्षी 6 कोटींच्या कंपनीचा मालक

आज आपण श्रेयन डागा (Shreyan Daga) यांची यशोगाथा पाहणार आहोत. अत्यंत लहान वयापासूनच त्यांनी उद्योजगतेच्या जगात पाऊल ठेवलं होतं. वयाच्या 8 व्या वर्षातच तो उद्योजकतेच्या क्षेत्रात उतरला होता.

Success story : आज आपण श्रेयन डागा (Shreyan Daga) यांची यशोगाथा पाहणार आहोत. अत्यंत लहान वयापासूनच त्यांनी उद्योजगतेच्या जगात पाऊल ठेवलं होतं. वयाच्या 8 व्या वर्षातच तो उद्योजकतेच्या क्षेत्रात उतरला होता. शाळेत असताना त्याने मुलांना 45 टक्के व्याजाने कर्ज देण्यास सुरुवात केली होती. वयाच्या फक्त 10 व्याच वर्षी त्याने वेबसाइट बनवली होती. तर वयाच्या 18 व्या वर्षी ते 6 कोटींच्या कंपनीचे मालक झाला होता. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती. 

10वी नंतर शाळा सोडून स्टार्टअपमध्ये दिलं झोकून

यशस्वी होण्यासाठी वय नसते. श्रेयन डागाने हे सिद्ध केले आहे. ज्या वयात मुले खेळत होती त्या वयात डागाने पहिला पगार मिळवला होता. वयाच्या 3 ऱ्या  वर्षापासून पेंटिंग करणारा श्रेयन हा वयाच्या 10 व्या वर्षी कोडिंग शिकून त्यांची पहिली वेबसाइटही तयार केली. यावेळी श्रेयनने आपली पहिली पेंटिंग विकून 9000 रुपये कमावले होते. श्रेयन गेल्या वर्षी शार्क टँक इंडियामध्येही दिसला होता. त्यानंतर तो शाळेत मुलांना कर्ज देत असे. कर्जावरील व्याजदर 40 ते 50 टक्के होता. डागा जेव्हा 13 वर्षांचा होता आणि 7 व्या वर्गात शिकत होता तेव्हा त्याने शेअर मार्केटमध्ये इंटर्नशिप सुरू केली. त्याचे वडीलही गुंतवणूकदार आहेत. त्यांनी आपल्या वडिलांकडून 2 लाख रुपये घेऊन एक स्टार्टअप सुरू केले. ते पैसे त्याला अनेक पटीने परत केले. डागा यांनी 10वी नंतर शाळा सोडली आणि स्वतःला त्याच्या स्टार्टअपमध्ये पूर्णपणे झोकून दिले.

डागाचे स्टार्टअप काय?

कोरोना महामारीच्या काळात, डागा यांना शिक्षकांना सत्यापित अभ्यासक्रम सुरू करण्यास मदत करण्याची कल्पना होती. हे अभ्यासक्रम मुलांना अभ्यासक्रमेतर उपक्रम म्हणून शिकवले जाणार आहेत. अभ्यासक्रमेतर असण्याबरोबरच भविष्यात हे अभ्यासक्रम मुलांना महत्त्वाचे कौशल्य म्हणून उपयुक्त ठरतील, असा दावा केला जात आहे. डागा हे ऑनलाइन लाइव्ह लर्निंग सेशनमध्ये शाळा आणि मुलांच्या पालकांना जोडायचे आणि त्यांची मुले भविष्याचा विचार करून कोणते कौशल्य विकास अभ्यासक्रम निवडू शकतात हे सांगायचे.

दर तासाला 2000 रुपयांची कमाई

प्रत्येक थेट सत्रात 5 ते 15 मुले असतात. त्याची फी 133 रुपये प्रति व्यक्ती आहे. जर एका सत्रात 15 लोक असतील तर त्यांना प्रत्येक सत्रातून सुमारे 2000 रुपये मिळतात. डागाची ही कल्पना शार्क टँकमध्येही आवडली होती. गेल्या वर्षी त्याला विनीता सिंग आणि पियुष बन्सल यांच्याकडून 5 टक्के इक्विटीवर 30 लाख रुपयांचा निधीही मिळाला होता. तेव्हा त्याच्या कंपनीचे मूल्यांकन 6 कोटी रुपये झाले होते.

महत्वाच्या बातम्या:

विमान तिकीट बुकिंगचे पैसे वाचवण्यासाठी तरुणानं केलं धाडस, उभारली स्वत:ची कंपनी, आज करतोय 8000 कोटींची उलाढाल 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Embed widget