फुटपाथ ते माइक्रोसॉफ्ट! डिझाइनींगच्या क्षेत्रात अस्तित्व निर्माण करणाऱ्या संघर्षकन्येची यशोगाथा
शाहिना अत्तरवाला (Shahina Attarwala) या तरुणीनं अत्यंत हालाकीच्या परिस्थितीन आपल्या कुटुंबाल सावरलं आहे. डिझाइनींगच्या क्षेत्रात शाहिना यांनी स्वत:च एक वेगळं अस्तित्व निर्माण केलंय.
Shahina Attarwala: प्रबळ इच्छाशक्ती आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर प्रत्येकाला यश मिळवता येतं. प्रत्येकालाच यशाचं शिखर गाठण्यासाठी संघर्ष करावा लागतो. आज आपण अशाच एका संघर्षकन्येची यशोगाथा (success story) पाहणार आहोत. शाहिना अत्तरवाला (Shahina Attarwala) असं या तरुणाचं नाव आहे. तिनं अत्यंत हालाकीच्या परिस्थितीन आपल्या कुटुंबाल सावरलं आहे. झोपडपट्टीत राहून डिझाइनींगच्या क्षेत्रात शाहिना यांनी स्वत:च एक वेगळं अस्तित्व निर्माण केलंय. माइक्रोसॉफ्टसह विविध कंपन्यांमध्ये शाहिना काम करत आहे.
एकेकाळी कुटुंबाला फुटपाथवर झोपण्याची वेळ
शाहिना अत्तरवाला आई वडिलांसह मुंबईत राहत होती. परिस्थिती अत्यंत गरिब होती. मात्र, शाहिना यांच्या डोळ्यात मोठं स्वप्न होतं. ज्यावेळी शाहिना 14 वर्षाची होती, त्यावेळी तिचे आई वडिल घरोघरी बांगड्या विकण्याचे काम करत होती. यातूनचं कुटुंबाचं उदरनिर्वाह चालत होता. मात्र, याच काळात शाहिनाचे वडिल आजारी पडले. याकाळात कुटुंबाची स्थिती अत्यंत नाजून झाली. त्यामुळं या कुटुंबाला फुटपाथवर झोपण्याची वेळ देखील आली होती. पैशांच्या अडचणीमुळं शाहिनाला काही डिझाइनींगच्या कोर्सचे शिक्षण देखील मध्येच सोडून द्यावे लागले होते. पण हळूहळू परिस्थिती सावरली.
मुंबई विद्यापीठातून पदवी
दरम्यान, आवड असेल तर कोणतही अवघड काम सोपं होतं. शाहिना चालत शाळेत जाऊन प्रवासाचे भाडे वाचवत होती. या काळात थोडे पैसे वाचवून तिने पुन्हा संगणकाचा अभ्यास सुरु केला. थोडी आर्थिक स्थिती सुधारल्यावर शाहिनाच्या वडिलांनी तिच्यासाठी एक संगणक खरेदी केला. नंतरच्या काळात शाहिनाने मुंबई विद्यापीठात प्रवेश मिळवला. मुंबई विद्यापीठातून शाहिनाने पदवी घेतली त्यानंतर NIIT मधून व्हिज्युअल कम्युनिकेशन आणि डिझाइनचा कोर्स पूर्ण केला. तसेच शाहिनाने युनायटेड नेशन आणि इंटरनॅशनल लॉमधून शिक्षण घेतलं आहे. तसेच शाहिना सध्या देशातील अनेक नामांकित संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना डिझाईनच्या क्षेत्राबाबत मार्गदर्शन देखील करते. मुलांच्या शिक्षणाबाबत शाहिना अधिक जागरक आहे. अनेक ठिकाणी ती स्वत: या कामासाठी मदत देखील करते.
मोठ्या कंपन्यांमध्ये शाहिनाला मिळालं काम
गरिबीची जाण असल्यामुळं शाहिनाने शिक्षण सुरु असतानाच अनेक प्रकारची उत्पादने तयार केली. डिझायनिंगचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कामं घेऊ लागली. याकाळात मुंबईतील कार एक्स्पोमध्ये ती सहभागी झाली होती. यावेळी एक्स्पोमध्ये आवडलेली स्कूरटरी शाहिनाने डिझाईन केली होती. त्यानंतर तिची ओळख होत गेली. Shaadi.com, Book My Show, Winzo, Instacred आणि Stylenuk अशा मोठ्या कंपन्यांमध्ये शाहिनाला काम मिळत गेले. हळूहळू स्थिती सुधापु लागली. त्यानंतर शाहिनाने मुंबईत एक घर घेऊन आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं.
महत्वाच्या बातम्या: