फळ विक्रेता ते 400 कोटींचा मालक, आईस्क्रीम मॅन ऑफ इंडियाची संघर्षगाथा
फळ विक्रेत्याचा मुलगा ते 400 कोटी रुपयांचा आईस्क्रीमचा व्यवसाय (Ice cream business) असा थक्क करणार प्रवास आहे. रघुनंदन श्रीनिवास कामथ असं त्या यशस्वी उद्योजकाचं नाव आहे.
Success Story : इच्छाशक्ती आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर सामान्य माणूस देखील यशाच्या शिखरावर पोहोचतो. कोणताही व्यवसाय, उद्योग किंवा नोकरी असो, या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी प्रत्येकालाच संघर्ष कारावा लागतो. संघर्षातूनच जडणघडण होत असते. आज आपण अशाच एका यशस्वी व्यवसायीकाची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत. फळ विक्रेत्याचा मुलगा ते 400 कोटी रुपयांचा आईस्क्रीमचा व्यवसाय (Ice cream business) असा थक्क करणार प्रवास आहे. रघुनंदन श्रीनिवास कामथ असं त्या यशस्वी उद्योजकाचं नाव आहे.
मुंबईतील जुहू परिसरात नॅचरल्स आईस्क्रीमचे दुकान
मुंबईतील जुहू परिसरात तुम्हाला नॅचरल्स आईस्क्रीमचे दुकान दिसेल. या दुकानातून दररोज मोठ्या प्रमाणात व्यवसाय होतो. आज हा व्यवसाय 400 कोटी रुपयांचा आहे. नॅचरल्स आईस्क्रीमची स्थापना रघुनंदन श्रीनिवास कामथ यांनी केली होती. त्यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले आहे. रघुनंदन यांचे वडील कर्नाटकचे असून ते फळे विक्रीचा व्यवसाय करत होते. रघुनंदन अभ्यासात हुशार नव्हते. त्यांनी वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी मुंबईतील त्यांच्या भावाच्या दक्षिण भारतीय रेस्टॉरंटमध्ये काम करण्यास सुरुवात केली. येथूनच त्यांच्या उद्योजक बनण्याचा मार्ग सुरु झाला. आज ते एक मोठे यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जातात.
पहिल्याच वर्षी झाला पाच लाखांचा नफा
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, रघुनंदन यांनी वडिलांसोबत बराच काळ फळे विकण्याचे काम देखील केलं होतं. त्यामुळे फळांबद्दलची त्यांची समज चांगली होती. कोणत्या फळाच्या चवीचा समतोल साधावा हे त्याला माहीत होते. नॅचरल्स आईस्क्रीमची ही समज फळांच्या मूळ चवशी निगडीत राहिली. जुहू येथील त्याच्या कॉर्नर शॉपवर त्याचे आईस्क्रीम लोकांना आवडू लागले. सुरुवातीला त्याच्या दुकानात फक्त 12 फ्लेवर्स उपलब्ध होत्या. या व्यवसायातून पहिल्या वर्षी त्यांनी तब्बल 5 लाख रुपयांची उलाढाल केली. यातूनच त्यांना आपला व्यवसाय वाढवण्याचा मार्ग मिळत गेला.
आईस्क्रीम मॅन ऑफ इंडिया अशी ओळख
नॅचरल्स आईस्क्रीम हे त्याच्या चवीमुळं प्रसिद्ध आहे. देशभरातील 100 हून अधिक स्टोअर्स असलेला हा देशातील सर्वात मोठा आइस्क्रीम ब्रँड आहे.
नॅचरल्स आईस्क्रीम मधील सर्वात प्रसिद्ध आइस्क्रीम म्हणजे टेंडर कोकोनट. कच्च्या नारळाचे दूध आणि साखर मिसळून, रघुनंदन श्रीनिवास कामथ यांनी एक चव विकसित केली आहे. त्यांच्यापूर्वी कोणीही असे आईस्क्रीम तयार केले नव्हते. यावरुनच त्यांचा कर्नाटकशी असलेला संबंध आणि नवनिर्मिती करण्याची क्षमताही स्पष्टपणे दिसून येते. 'बास्किन रॉबिन'ने जे पश्चिमेत केले ते रघुनंदनने भारतात केले. आज त्यांना ‘आईस्क्रीम मॅन ऑफ इंडिया’ म्हटले जाते.
महत्वाच्या बातम्या: