(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सहावी पास ते 279 कोटींची संपत्ती, 76 वर्षांचे'काका' जाणार देशाच्या सर्वोच्च सभागृहात
आज आपण अशाच एका 76 वर्षांच्या एका व्यक्तीची यशोगाथा पाहणार आहोत. त्यांनी फक्त सहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे, पण आपल्या मेहनतीच्या बळावर त्यांनी कोट्यावधी रुपयांची कंपनी स्थापन केली आहे.
Success Story : आयुष्यात तुम्हाला काहीतरी मोठं करायचं असेल तर मोठ्या पदव्या असायलाच हव्यात असं काही नाही. कारण तुम्ही इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमाच्या बळावर हव्या त्या गोष्टी मिळवू शकता. आज आपण अशाच एका 76 वर्षांच्या एका व्यक्तीची यशोगाथा पाहणार आहोत. त्यांनी फक्त सहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे, पण आपल्या मेहनतीच्या बळावर त्यांनी कोट्यावधी रुपयांची कंपनी उभी केली आहे. गोविंद ढोलकिया असं त्यांचं नाव आहे.
सर्वोच्च पदव्या मिळवणारे लोक जीवनात यशाच्या कसोटीवर अनेकदा अपयशी ठरतात. दुसरीकडं कोणतीही विशेष पदवी किंवा उच्च शिक्षण नसलेले अनेक लोक आहेत, ज्यांनी राजकारणापासून अर्थशास्त्रापर्यंतच्या क्षेत्रात मोठे यश संपादन केलं आहे. आज आपण गुजरातमधील सुरत येथील हिरे व्यापारी गोविंद ढोलकिया यांची यशोगाथा पाहणार आहोत. त्यांनी सहावी उत्तीर्ण होऊन आपल्या मेहनतीने हजारो कोटी रुपयांची कंपनी उभी केली आहे. त्यांच्याकडे 279 कोटी रुपयांची स्वतःची संपत्ती आहे.
गोविंद ढोलकिया यांचा राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल
गोविंद ढोलकिया यांनी गुजरातमधून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपच्या चार उमेदवारांमध्ये ते सर्वात श्रीमंत असून त्यांची एकूण घोषित संपत्ती 279 कोटी रुपये आहे. निवडणूक उमेदवार भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडे 9.36 कोटी रुपयांची संपत्ती आहे, हे त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात उघड झाले आहे. जेपी नड्डा आणि ढोलकिया यांच्या व्यतिरिक्त सत्ताधारी पक्षाने गुजरातमधून पक्षाचे नेते जसवंतसिंह परमार आणि मयंक नायक यांना 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, चार उमेदवारांपैकी एकाही उमेदवाराविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही किंवा त्यांच्यावर कोणत्याही फौजदारी खटला नाही. निवडणूक प्रतिज्ञापत्रासोबत जोडलेल्या 2022-23 च्या आयकर रिटर्ननुसार, नड्डा यांचे वार्षिक उत्पन्न 24.92 लाख रुपये होते, तर त्यांची पत्नी मल्लिका यांचे त्याच कालावधीत उत्पन्न 5.26 लाख रुपये होते. या दाम्पत्याकडे मिळून 9.36 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. भाजप अध्यक्षांची शैक्षणिक पात्रता बीए आणि एलएलबी आहे.
राम मंदिराच्या उभारणीसाठी 11 कोटी रुपयांची देणगी
सुरतचे हिरे व्यापारी गोविंद ढोलकिया (76) हे श्री रामकृष्ण एक्सपोर्ट्सचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. त्याच्या प्रतिज्ञापत्रात असे म्हटले आहे की ते सहावी पास आहेत. 2022-23 मध्ये त्याचे उत्पन्न 35.24 कोटी रुपये होते, तर त्याच्या पत्नीचे उत्पन्न 3.47 कोटी रुपये होते. ढोलकिया यांनी अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी नुकतेच एक-दोन नव्हे तर 11 कोटी रुपयांची देणगी दिली होती. ढोलकिया यांच्या म्हणण्यानुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वत: फोन करून त्यांना भाजपकडून राज्यसभेचा उमेदवार बनवण्याबाबत माहिती दिली होती. गोविंद ढोलकिया यांना ओळखणारे त्यांना आदराने 'काका' म्हणतात.
महत्वाच्या बातम्या: