लाखोंची नोकरी सोडली, शेतीची वाट धरली; आज वर्षाला तरुण कमवतोय करोडो रुपये
आज आपण अशाच एका तरुणाची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत. या तरुणाने इंजिनियरींगची नोकरी सोडून शेती करण्यास सुरुवात केलीय. प्रमोद गौतम (Pramod Gautam) असं या शेतकऱ्याचं नाव आहे.
Success Story : अलिकडच्या काळात अनेक तरुण शेती (Agriculture) क्षेत्रात पाऊल ठेवत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं शेतीतून भरघोस उत्पादन घेत आहेत. तर काही तरुण चांगली नोकरी (Job) सोडून शेती करत असल्याचं चित्र दिसत आहे. आज आपण अशाच एका तरुणाची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत. या तरुणाने इंजिनियरींगची नोकरी सोडून शेती करण्यास सुरुवात केलीय. प्रमोद गौतम (Pramod Gautam) असं या शेतकऱ्याचं नाव आहे. हे तरुण शेतकरी आज वर्षाला करोडो रुपये कमावत आहेत.
प्रमोद गौतम या तरुण शेतकऱ्याने इंजिनियरींगची नोकरी सोडून यशस्वी शेती केली आहे. यातून ते महिन्याला लाखो रुपये कमावत आहेत. प्रमोद यानी इंजिनियरींग आणि एमबीएचं शिक्षण घेतलं आहे. या शिक्षणानंतर त्यांना मोठ्या पगाराची नोकरी लागली होती. परंतू त्यांनी काही काळानंतर नोकरीला रामराम करत शेती करण्याचा निर्णय घेतला.
बहुराष्ट्रीय ऑटोमोबाईल कंपनीतील चांगली नोकरी सोडून शेतीचा निर्णय
प्रमोद गौतम हे मुळचे नागपूरचे आहेत. त्यांनी बहुराष्ट्रीय ऑटोमोबाईल कंपनीत चांगली नोकरी लागली होती. त्यांना चांगला पगारही मिळत होता. पण 2006 मध्ये प्रमोद गौतम यांनी नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांना वडिलोपार्जित 26 एकर जमीन होती. यामध्ये त्यांनी नोकरी सोडून शेती सुरु केली. या शेतात प्रमोद यांनी फळबागांसह मूग डाळीचं पीक घेतलं आहे. सुरुवातीच्या काळात प्रमोद यांनी भाजीपाल्यासह हळद, भुईमूग या पिकांचे उत्पादनही घेतले होते. मात्र त्यानंतरच्या काळात त्यांनी मूग डाळीचं उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. या डाळ पिकाचा त्यांना सध्या मोठा नफा होत आहे.
वंदना फूड्स नावाचा नवा डाळ ब्रँड
प्रमोद गौतम यांनी नागपुरात वंदना फूड्स नावाचा नवा स्वत:चा डाळ ब्रँड सुरू केलाय. या ब्रँडच्या नावाखाली प्रमोद हे विविध प्रकारच्या डाळी आणि धान्य विक्री केलं जाते. प्रमोद यांचे प्रोडक्ट Amazon आणि Flipkart वर देखील उपलब्ध आहे. डाळीच्या विक्रीतून प्रमोद गौतम हे वर्षाला 1 कोटी रुपये मिळवतात. तर शेतीतून त्यांना वर्षाला 10 ते 12 लाख रुपये मिळतात. दरम्यान, प्रमोद गौतम यांनी सुरु केलेल्या शेती प्रयोगाचे सर्वच स्तरातून कौतुक केलं जातंय. ते अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
5 गायीपासून दुग्ध व्यवसायाला सुरुवात, आज महिन्याला 7 लाखांचा नफा, जिद्दी महिलेची यशोगाथा