Share Market : शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 550 अंकांनी उसळला
Stock Market Today: सेन्सेक्समध्ये आज तेजी दिसून आली. सेन्सेक्स 500 अंकांनी वधारला.
Stock Market Today: मागील काही दिवसांपासून घसरण सुरू असलेल्या शेअर बाजारात आज सकारात्मक वातावरण दिसून आले. आज शेअर बाजार सुरू होताच 550 अंकांनी वधारला. शेअर बाजाराची सुरुवात झाली तेव्हा निर्देशांक गॅप अपने सुरू झाला.
आज ट्रेडिंग सत्रात निफ्टी 98 अंकांनी वधारत 17208 अंकावर सुरू झाला. तर, सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 722 अंकांनी वधारला. तर, निफ्टी 232 अंकांनी वधारला होता.
निफ्टीमध्ये आज 50 पैकी 48 स्टॉक वधारले होते. बँक निफ्टीतही तेजी दिसून आली. बँक निफ्टीत 300 अंकांनी उसळण दिसून आली. वित्त, आॅईल ॲंड गॅस, आयटी, ऑटो आणि मेटलच्या क्षेत्रात तेजी दिसून आली. टाटा स्टील, एअरटेल आणि टायटनच्या शेअर्सचे दर वधारले.
दरम्यान, गुरुवारी शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स 581.21 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 167.80 अंकानी घसरला होता.
जागतिक शेअर बाजाराचा परिणाम
जागतिक शेअर बाजारात आज संमिश्र वातावरण दिसून आले. त्याच्या परिणामी आज भारतीय शेअर बाजारातही सकारात्मक वातावरण दिसून आले. जपान आणि दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारात तेजी दिसून आली. चीन आणि हाँगकाँगच्या बाजारात पडझड दिसून आली. आयटी आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रातून परदेशी गुंतवणुकदारांकडून विक्री सुरू असल्याने आशियाई शेअर बाजारावर परिणाम दिसून येत आहे. तर, सुरुवातीला वधारल्यानंतर अमेरिकन शेअर बाजारात पडझड झाली. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल बँकेने व्याज दर वाढवण्याची घोषणा केल्यानंतर शेअर बाजारावर परिणाम दिसून आला.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- LIC चा IPO मार्चमध्ये येणार; देशातील सर्वात मोठी IPO ठरण्याची शक्यता
- Budget 2022: अर्थसंकल्प 2022 पासून ऑटोमोबाईल क्षेत्राच्या अपेक्षा काय, गाडी घेणं स्वस्त होणार का?
- Budget 2022 : यंदाच्या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांच्या काय अपेक्षा?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha