एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Stock Market : मंगळवार शेअर बाजारासाठी 'मंगल दिन', गुंतवणूकदारांना एकाच दिवसात सव्वा चार लाख कोटींचा फायदा

Share Market Update : आयटी निर्देशांकात 1000 अंकांची वाढ झाली असून मिडकॅप समभागांमध्ये खरेदी झाल्यानंतर बीएसईचे मार्केट कॅप 387 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे.

Share Market Update : मंगळवारचे ट्रेडिंग सत्र भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत शुभ ठरल्याचं दिसून आलं. आयटी आणि तेल, वायू क्षेत्रातील समभागांमध्ये जोरदार खरेदी झाल्यामुळे भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 72,000 चा टप्पा ओलांडण्यात यशस्वी ठरला तर मिडकॅप इंडेक्सने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 455 अंकांच्या उसळीसह 72,186 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 158 अंकांच्या उसळीसह 21,939 अंकांवर बंद झाला.

BSE मार्केट कॅप ऐतिहासिक उच्चांकावर

बाजारातील प्रचंड वाढीमुळे, सूचीबद्ध समभागांचे मार्केट कॅप देखील ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले आहे. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 386.97 लाख कोटी रुपये आहे, जे विक्रमी उच्च आहे. शेवटच्या सत्रात मार्केट कॅप 382.74 लाख कोटी रुपये होते. याचा अर्थ आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 4.23 लाख कोटी रुपयांची उडी झाली आहे.

कोणत्या क्षेत्रात तेजी?

आजच्या व्यवहारात, आयटी समभागांच्या खरेदीमुळे त्याच्या निर्देशांकात जोरदार वाढ झाली आहे. निफ्टी आयटी निर्देशांक 1085 अंकांच्या वाढीसह बंद झाला. याशिवाय ऑटो, फार्मा, मेटल्स, एनर्जी, कमोडिटी, हेल्थकेअर, ऑइल आणि गॅस या कंपन्यांचे समभाग तेजीने बंद झाले. तर एफएमसीजी आणि बँकिंग समभाग घसरले.

निफ्टीच्या मिडकॅप निर्देशांकाने 49,000 चा ऐतिहासिक उच्चांक गाठला तर स्मॉल कॅप निर्देशांकही तेजीत राहिला. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 19 समभाग वाढीसह आणि 11 तोट्यासह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 समभागांपैकी 34 शेअर्स वाढीसह बंद झाले आणि 16 तोट्याने बंद झाले.

वाढणारे आणि घसरणारे शेअर्स

आजच्या व्यवहारात बीपीसीएल 5.82 टक्के, एचडीएफसी लाइफ 5.23 टक्के, एचसीएल टेक 4.37 टक्के, टीसीएस 4.22 टक्के, मारुती सुझुकी 3.97 टक्के वाढीसह बंद झाले. पॉवर ग्रिड, ब्रिटानिया आयटीसी, ग्रासिम यांचे समभाग घसरले.

इंडेक्‍स किती अंकावर बंद झाला उच्‍च स्‍तर निम्‍न स्‍तर किती प्रमाणात बदल
BSE Sensex 72,186.09 72,261.40 71,625.18 0.63%
BSE SmallCap 46,307.84 46,351.14 45,825.78 1.23%
India VIX 15.79 15.98 15.09 1.07%
NIFTY Midcap 100 48,984.65 49,018.50 48,301.55 1.19%
NIFTY Smallcap 100 16,449.35 16,478.05 16,283.05 0.01
NIfty smallcap 50 7,623.70 7,645.70 7,555.40 0.01
Nifty 100 22,299.30 22,315.15 22,074.35 0.84%
Nifty 200 12,082.95 12,090.45 11,953.65 0.90%
Nifty 50 21,929.40 21,951.40 21,737.55 0.72%

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 26 November 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्स-Mitkari On Naresh Arora : अरोरांनी अजितदादांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढल्यानं कार्यकर्ते नाराजRamdas Athwale On Fadanvis : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री बनतील, शिंदेंना कोणतंच आश्वासन दिलं नव्हतंABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 26 November 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Eknath Shinde : आमचा राम राम घ्यावा! खटाखट निर्णय घेणाऱ्या एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा; खटाखट निर्णय घेणाऱ्या शिदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं
Nashik Crime : आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
Embed widget