Stock Market Opening : दिलासा! शेअर बाजारात तेजी, सेंसेक्स 200 अंकांनी वधारला, तर निफ्टी 17250 अंकांवर
Stock Market Opening : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात काही प्रमाणात तेजी दिसून येत आहे. सेंसेक्स 200 अंकांनी वधारला असून निफ्टी 17250 अंकांवर पोहोचला आहे.
Stock Market Opening : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात (Stock market) तेजीत उघडल्याचं दिसून येत आहे. कालच्या पडझडीनंतर आज मात्र शेअर बाजार तेजीत असल्याचं पाहायला मिळत आहे. प्री-ओपनिंगमध्येही बाजारा तेजीत होता. आज पहिल्याच सत्रामध्ये सेंसेक्समध्ये (Sensex) 215 अंकानी वधारल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, काल शेअर बाजारात कमालीची घसरण झाली होती. सेन्सेक्स तब्बल 1172 अंकांच्या घसरणीसह बंद झाला होता.
आज सेंसेक्स 215 अंकाच्या वाढीसह 57381 अंकांवर पोहोचला. तर निफ्टी देखील 85 अकांनी वधारला आहे. सध्या निफ्टी 17258 अकांवर पोहोचला आहे. शेअर बाजारासाठी कालचा दिवस 'ब्लॅक मंडे' ठरला होता. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली होती. तर काल शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 1172 अंकांनी घसरला होता. तर निफ्टीही 302 अंकानी घसरला होता. सेन्सेक्समध्ये 2.01 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,166 वर पोहोचला होता तर निफ्टीमध्ये 1.73 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,173 वर पोहोचला होता. कालच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे चार लाख कोटी रुपये पाण्यात गेले होते.
कालच्या तुलनेत शेअर बाजारातील आजचे चित्र गुंतवणूकदारांसाठी काहीसं आशादाय आहे. शेअर बाजार ओपन होताच पहिल्याच सत्रामध्ये सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये अनुक्रमे 215 आणि 85 अंकाची वाढ पहायला मिळाली. आज शेअर बाजारात किंचित तेजी दिसल्यामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळालाय. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात झालेल्या पडझडीमुळे सर्वाधिक फटका एचडीएफसी (HDFC), एचडीएफसी (HDFC) बँक आणि इन्फोसिस सारख्या कंपन्यांना बसला आहे.
कोणते शेअर तेजीत?
- आयशर मोटर्स : 2.5 टक्के
- JSW स्टील : 2.23 टक्के
- कोल इंडिया : 2.08 टक्के
- हिरो मोटोकॉर्प : 1.73 टक्के
- BPCL : 1.53 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- Infosys : 1.33 टक्के
- HDFC : 1.36 टक्के
- HDFC Bank : 1.18 टक्के
- HDFC Life : 0.31 टक्के
- Dr Reddy's Laboratories Ltd : 0.45 टक्के
महत्त्वाच्या इतर बातम्या :