एक्स्प्लोर

EPFO मध्ये सॅलरी लिमिट 15 हजारांवरून 21 हजार करण्याचा विचार; कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होणार फायदा

EPFO Update : यापूर्वी 2014 मध्ये EPFO ​​ची सॅलरी लिमिट वाढवण्यात आली होती. 2014 पूर्वी ही मर्यादा 6,500 रुपये होती जी नंतर 15,000 रुपये करण्यात आली.

EPFO Update : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) शी संबंधित एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. लवकरच EPFO ​​ची सॅलरी लिमिट 15000 रुपयांवरून 21000 रुपये दरमहा केली जाण्याची शक्यता आहे. वेतन मर्यादेत वाढ करण्याचा प्रस्ताव उच्चस्तरीय समितीनं सरकारकडे दिला आहे. यामुळे अनेक संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना फायदा होईल आणि किमान 75 लाख कर्मचारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत अधिक सामील होऊ शकतील. 

तसेच, हे कर्मचारी ईपीएफओच्या नवीन योजनांचा लाभ घेऊ शकतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर सरकारनं समितीच्या अहवालाला मान्यता दिली तर त्याची अंमलबजावणी मागील तारखेपासून केली जाऊ शकते. याचा लाभ अनेक नोकरदारांना मिळू शकतो. 

2014 मध्ये EPFO ​​पगार मर्यादा वाढवण्यात आली होती

यापूर्वी 2014 मध्ये EPFO ​​ची पगार मर्यादा वाढवण्यात आली होती. 2014 पूर्वी ही मर्यादा 6,500 रुपये होती जी नंतर 15,000 रुपये करण्यात आली. ही मर्यादा वाढवूनही अनेक कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळाला. आता त्याची मर्यादा 15,000 रुपयांवरून 21,000 पर्यंत वाढवण्याचा विचार केला जात आहे. इकोनॉमिक टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे की, जर ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळानं समितीच्या प्रस्तावाची अंमलबजावणी केली तर अशा परिस्थितीत महागाईच्या या युगात लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होईल. 

कंपन्यांचं काय म्हणणं? 

या प्रस्तावाबाबत एका कंपनीनं बोलताना सांगितलं की, कोरोना महामारीमुळे कंपन्या आधीच खूप दबावाखाली काम करत आहेत. महामारीमुळे कंपनीच्या बॅलेन्स शीटवर खूप ताण आला आहे. अशा स्थितीत सरकारनं या प्रस्तावाची योग्यवेळी अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर सरकारवरीलही बोजा खूप वाढणार आहे. सध्याच्या परिस्थितीत, सरकार दर वर्षी पेन्शन योजनेवर म्हणजेच, EPFO ​​वर दरवर्षी सुमारे 6,750 रुपये खर्च करते. समितीच्या शिफारशी लागू केल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.

इंटरनेटशिवाय कसा चेक कराल PF ची रक्कम?

एसएमएसने जाणून घ्या बचतीची रक्कम

एसएमएसद्वारे तुम्ही ईपीएफ खात्यातील रक्कम जाणून घेऊ शकता. एसएमएसद्वारे माहिती मिळवण्यासाठी  EPFO UAN LAN (ज्या भाषेत माहिती हवी ती भाषा) टाइप करावे आणि 7738299899 या क्रमांकावर मेसेज पाठवावा. इंग्रजी भाषेत माहिती मिळवण्यासाठी ENG, हिंदीसाठी HIN या शब्दाचा वापर करू शकता. हा मेसेज पाठवल्यानंतर दोन ते तीन मिनिटात तुम्हाला पीएफ खात्यातील रक्कमेची माहिती मिळेल. 

मिस्ड कॉलद्वारे मिळू शकेल माहिती

मिस्ड कॉलद्वारे तुम्हाला पीएफ खात्यातील बचतीची माहिती मिळू शकेल. तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 011-22901406 मिस्ड कॉल द्या. त्यानंतर तुम्हाला एक कॉल येईल. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या बचतीबाबतची माहिती दिली जाईल. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
साखरेच्या दरानं चिंता वाढवली! 10 वर्षानंतर प्रथमच भारत सरकार घेणार मोठा निर्णय, देशात सध्या किती साखर शिल्लक? 
साखरेच्या दरानं चिंता वाढवली! 10 वर्षानंतर प्रथमच भारत सरकार घेणार मोठा निर्णय, देशात सध्या किती साखर शिल्लक? 
Gold Silver Rate: सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ; 24 तासांत सोन्यात 4500, तर चांदीमध्ये 11000 रुपयांची उडी, भाववाढीचं कारणंही समोर
सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ; 24 तासांत सोन्यात 4500, तर चांदीमध्ये 11000 रुपयांची उडी, भाववाढीचं कारणंही समोर

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलीब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलीब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Embed widget