शेअर बाजारात सुरुवातीलाच मोठी वाढ, सेन्सेक्स 300 अंकांनी झेप घेत 72500 च्या जवळ
देशांतर्गत शेअर बाजारात (Stock Market) आज सुरुवातीलाच वाढ दिसून आली. सेन्सेक्सने 300 अंकांनी झेप घेत 72500 च्या जवळ गेला आहे.
Stock Market Opening: देशांतर्गत शेअर बाजारात (Stock Market) आज सुरुवातीलाच वाढ दिसून आली. सेन्सेक्सने 300 अंकांनी झेप घेत 72500 च्या जवळ गेला आहे. तर बँक निफ्टीमध्येही वाढ दिसून आली असून निफ्टी 22 हजारांच्या वर गेली आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाच्या दिवशी शेअर बाजारातून जबरदस्त सकारात्मक संकेत मिळत आहेत.
निफ्टी 22000 च्या वर जात आहे आणि प्री-ओपनिंगपासून बाजारात जोरदार तेजी आहे. काल अमेरिकन बाजार विक्रमी पातळीवर बंद झाले आणि आज सकाळी आशियाई बाजारही सकारात्मक संकेतांवर आहेत. त्यामुळं बाजारातील गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
मार्केट ओपनिंग कसे होते?
आरबीआय धोरणाच्या पहिल्या ओपनिंगमध्ये, बीएसई सेन्सेक्स 321.42 अंकांच्या किंवा 0.45 टक्क्यांच्या वाढीसह 72,473 च्या पातळीवर उघडला. NSE चा निफ्टी 79.15 अंकांच्या किंवा 0.36 टक्क्यांच्या मजबूत वाढीसह 22,009 च्या पातळीवर उघडला आहे.
प्री-ओपनिंगमध्ये बाजार कसा होता?
शेअर बाजार सुरू होण्यापूर्वी, बीएसईचा सेन्सेक्स 383.20 अंकांच्या किंवा 0.53 टक्क्यांच्या वाढीसह 72535 च्या पातळीवर व्यवहार करत होता आणि एनएसईचा निफ्टी 88.20 अंकांच्या किंवा 0.40 टक्क्यांच्या वाढीसह 22018 च्या पातळीवर व्यवहार करत होता. BSE सेन्सेक्सच्या 30 समभागांपैकी 22 शेअर्स वधारत आहेत तर 8 शेअर्स घसरत आहेत. सर्वाधिक लाभधारकांमध्ये, पॉवर ग्रिड 5.34 टक्के आणि इंडसइंड बँक 1.28 टक्क्यांनी वर आहे. SBI 1.234 टक्के आणि HCL टेक 1.21 टक्क्यांनी वर आहे. TCS 1.05 टक्क्यांनी वाढला आहे. सर्वाधिक नुकसान झालेल्यांपैकी ITC 1.31 टक्क्यांनी आणि मारुती 1.26 टक्क्यांनी घसरला. एशियन पेंट्स 0.71टक्के आणि बजाज फायनान्स 0.64 टक्क्यांनी घसरले आहेत. नेस्ले 0.38 टक्क्यांनी वर आहे.
आशियाई बाजारांतून मजबूत संकेत
काल सकाळी आशियाई बाजारांतून मजबूत संकेत मिळत असताना जागतिक बाजारांमध्ये एक चांगली वाढ दिसून आली आहे. जपानचा निक्केई सुमारे 0.75 टक्क्यांनी वर आहे. काल रात्री अमेरिकन बाजार विक्रमी पातळीवर बंद झाले. डाऊ आणि एस अँड पी विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. डाऊ जोन्स 150 अंकांच्या उसळीसह बंद झाला. S&P 500 निर्देशांक आता प्रथमच 5000 च्या पातळीच्या जवळ जाताना दिसत आहे आणि त्याने फ्युचर्समध्ये पाच हजारांची पातळी ओलांडली आहे.
(Disclaimer : ही बातमी केवळ माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात व्यवहार करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. तुमच्या आर्थिक नुकसानीला एबीपी माझा जबाबदार राहणार नाही.)
महत्वाच्या बातम्या: