Stock Market Closing : मोठ्या उसळीनंतर भारतीय शेअर बाजार बंद, धातू-बँकिंग स्टॉकेसमध्ये वाढ
Stock Market Closing : भारतीय शेअर बाजारपेठेतील एफएमसीजी क्षेत्राचे शेअर्स वगळता इतर सर्व शेअर्स मोठ्या वाढिसह बंद झाले. धातू क्षेत्रात सर्वाधिक तेजी दिसून आली. धातूंचे शेअर्स 4.23 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.
Stock Market Closing : भारतीय शेअर बाजार सलग दुसऱ्या सत्रातील वाढीसह बंद झाला. आज धातू बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. व्यवहार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) 361 अंकांनी म्हणजेच 0.60 टक्क्यांनी वाढून 60,927 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 117.70 अंकांनी म्हणजेच 0.65 टक्क्यांनी वाढून 18,132 अंकांवर बंद झाला.
भारतीय बाजारपेठेतील एफएमसीजी क्षेत्राचे शेअर्स वगळता इतर सर्व शेअर्स मोठ्या वाढिसह बंद झाले. धातू क्षेत्रात सर्वाधिक तेजी दिसून आली. धातूंचे शेअर्स 4.23 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. तर निफ्टी आयटी 0.88 टक्क्यांनी, बँक निफ्टी 0.54 टक्क्यांनी, ऊर्जा क्षेत्र 0.97 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. ऑटो, मीडिया आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील समभागातही तेजी दिसून आले. मिडकॅप आणि स्मॉल कॅप समभागांमध्येही चांगली खरेदी दिसून आली.
Stock Market Closing : दोन दिवसांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ८.३७ लाख कोटींची वाढ
आजच्या वाढीमुळे शुक्रवारी भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे झालेले नुकसान भरून निघाले आहे. गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.50 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. गुंतवणूकदारांची संपत्ती 277.99 लाख कोटी रुपयांवरून 280.49 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. दोन दिवसांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 8.37 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
Stock Market Closing : प्री-ओपनिंग सत्रातही तेजी
दरम्यान, बाजार सुरू होतानाच आज देखील तेजी आजही कायम होती. मेटल , आयटी, बँकिंग सेक्टरमध्ये खरेदीचा जोर दिसून आल्याने सुरूवातीपासनच शेअर बाजार वधारला होता. प्री-ओपनिंग सत्रातही बाजारात तेजी दिसून आली होती. त्यानंतर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर खरेदीचा ओघ कायम राहिला. त्यामुळे बाजर बंद होताना देखील वाढीसह बंद झाला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज सकाळी 295 अंकांच्या तेजीसह 60,861.41 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 75 अंकांच्या तेजीसह 18,089.80 अंकांवर खुला झाला होता. सकाळी 9.35 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 99 अंकांच्या घसरणीसह 60,466.67 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 22.30 अंकांच्या घसरणीसह 17,992.30 अंकांवर व्यवहार करत होता. त्यानंतर चढ उतार होत व्यवहार बंद होताना दिवसाच्या शेवटी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) 361 अंकांनी म्हणजेच 0.60 टक्क्यांनी वाढून 60,927 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 117.70 अंकांनी म्हणजेच 0.65 टक्क्यांनी वाढून 18,132 अंकांवर बंद झाला.