एक्स्प्लोर

Chandrahar Patil : ....म्हणून सरकारसोबत जातोय, अखेर चंद्रहार पाटील यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र

Chandrahar Patil : डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे.

Chandrahar Patil will  join Eknath Shinde Shivsena सांगली :  डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रहार पाटील यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन या निर्णयाची माहिती दिली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी चंद्रहार पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. चंद्रहार पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती, त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. आता चंद्रहार पाटील यांनी सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बरोबर एक वर्षानं चंद्रहार पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. 

चंद्रहार पाटील काय म्हणाले?

राज्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये काम करत असताना, बऱ्याच त्रुटी, अडचणी, गैरप्रकार मी अनुभवलेले आहेत. अशा बाबींविरुद्ध मी वेळोवेळी आवाज देखील उठवला आहे. परंतु, प्रत्यक्ष शासन सहभागाशिवाय असे प्रश्न मार्गी लागणे कठीण आहे. म्हणून क्रीडा क्षेत्रामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी व सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी, मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी सरकार सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे, असं चंद्रहार पाटील म्हणाले. 

संजय शिरसाट यांचा दावा खरा ठरला

सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी 4 जून 2025 ला महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील सोमवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हिंमत असेल तर थांबवा, असं चॅलेंज ठाकरेंच्या शिवसेनेला दिलं होतं. त्यावेळी चंद्रहार पाटील यांनी  मी अजूनही ठाकरेंच्या शिवसेनेतच असून पक्ष सोडण्याबाबत अजून निर्णय घेतला नाही. शिंदेंच्या शिवसेनेकडून पक्ष प्रवेशाबाबत मला ऑफर आहे, असं म्हटलं होतं.  आता चंद्रहार पाटील यांचा निर्णय झाला आहे.  

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून चंद्रहार पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून चंद्रहार पाटील यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. खासदार श्रीकांत शिंदे यांनी एप्रिल महिन्यात चंद्रहार पाटील यांच्यासंदर्भात एक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे चांगले कार्यकर्ते आहेत. ते जर आमच्या शिवसेनेत येणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. त्यांच्यासाठी आमच्या शिवसेना पक्षाची दारे ही कायम उघडी आहेत. 

चंद्रहार पाटील ताकदीचेच पैलवान आहेत. यांना जी ताकद लागेल ती आम्ही निश्चित देऊ. आमच्या शिवसेनेमध्ये काम करणाऱ्याला वाव मिळतो. पूर्वीच्या शिवसेनेमध्ये कार्यकर्ते थेट नेत्याला भेटत नव्हते. मात्र, आमचे नेते प्रत्येक कार्यकर्त्याला वेळ देतात, भेटतात. त्यामुळे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे चांगले कार्यकर्ते आहेत. ते जर आमच्या शिवसेनेत येणार असतील तर त्यांचे स्वागत आहे असे श्रीकांत शिंदे म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE: सोनम वांगचुक यांना 'जंतर मंतर'वरुन हटवलं, दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई
Maharashtra Breaking LIVE: सोनम वांगचुक यांना 'जंतर मंतर'वरुन हटवलं, दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा वाईट पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा वाईट पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
Sharad Pawar on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक पोलिसांच्या ताब्यात, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'त्यांना अटक केली तरीही...'
सोनम वांगचुक पोलिसांच्या ताब्यात, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'त्यांना अटक केली तरीही...'
Sonam Wangchuk Wife : दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local News: लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा घाणेरडा पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा घाणेरडा पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
Sonam Wangchuk Wife : दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
BCCI On Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
Sonam Wangchuk Hunger Strike: दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
Nashik Crime News: नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
Embed widget