एक्स्प्लोर

मी कधीही नापास होऊ शकत नाही, आजही मला उद्धव ठाकरेंचे फोन येतात; संजय राठोडांचा खळबळजनक दावा

राज्यातील फडणवीस सरकारने मंत्र्यांच्या कामाचा लेखाजोखा मांडताना त्यांच्या प्रगतीचे पुस्तक जाहीर केले. त्यात, संजय राठोड हे नापास असल्याचे सांगण्यात आले, त्यावरुन राठोड नाराज असल्याचे स्पष्ट झालं.

नांदेड : संजय राठोड कधीही नापास होऊ शकत नाही, मी तुम्हाला नापास करेल. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी माझे आजही चांगले संबंध, त्यांचे आजही मला फोन येतात, असा खळबळजनक दावा राज्याचे कॅबिनेटमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी केला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर पूजा चव्हाण प्रकरणी गंभीर आरोप झाल्यानंतर राजीनामा घेण्यात आला होता. त्यावेळी, मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे होते. त्यामुळे, शिवसेना (Shivsena) पक्षात फूट पडल्यानंतर संजय राठोड यांनी आपली नाराजी दर्शवत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाणे पसंत केले. त्यानंतर, उदयास आलेल्या महायुतीमध्ये संजय राठोड यांना मंत्रिपदही मिळाले. मात्र, शिवसेना शिंदे गटात गेल्यापासून उद्धव ठाकरेंशी आमदारांचा संवाद संपुष्टात आल्याचं दिसून आलं. मात्र, संजय राठोड यांनी आज खळबळजनक दावा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  

राज्यातील फडणवीस सरकारने मंत्र्यांच्या कामाचा लेखाजोखा मांडताना त्यांच्या प्रगतीचे पुस्तक जाहीर केले. त्यात, संजय राठोड हे नापास असल्याचे सांगण्यात आले, त्यावरुन मंत्री राठोड चांगलेच नाराज असल्याचे स्पष्ट झालं. मंत्रिमंडळाचे प्रगतीपुस्तक काढले आणि प्रगती पुस्तकात संजय राठोड नापास दाखवले. पण, मी कधी परीक्षा दिली नाही आणि कुणी पेपरही तपासले नाहीत, मग मी नापास कसा झालो? असे वक्तव्य जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी नांदेडमध्ये संवाद मेळाव्यात बोलताना केले. बंजारा समाजाच्या संवाद बैठकीत राठोड यांनी बंजारा भाषेत तुफान फटकेबाजी केली. मी एकनाथ शिंदे यांना उठून सांगितले, संजय राठोड कधीही नापास होऊ शकत नाही, मी तुम्हाला नापास करेल. मी तुम्हाला गोष्ट सांगत नाही. उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझे आजही चांगले संबंध आहेत आणि मला उद्धव ठाकरे यांचे फोन सुद्धा येतात, असा खळबळजनक दावाही संजय राठोड यांनी पुढे बोलताना केला. 

भाषणानंतर वक्तव्यावरुन घुमजाव

भाषण संपल्यानंतर संजय राठोड यांना या वक्तव्याबाबत विचारले असता मात्र त्यांनी घुमजाव केले. मी असे बोललोच नाही, असे राठोड म्हणाले. मात्र, राठोड यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून यावर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहावे लागेल.  

अखंड शिवसेनेचा नारा

दरम्यान, राज्यात दोन्ही ठाकरे बंधु एकत्र येण्याची चर्चा जोर धरत असून महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसेची युती होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. खासदार संजय राऊतांसह उद्धव ठाकरे यांनी देखील तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे, एकीकडे ठाकरेंच्या मनोमिलनाची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे शिवसेना शिंदे गटातील नेते गजानन कीर्तीकर यांनी अखंड शिवसेनेचा नारा दिला आहे. दोन ठाकरेंसह एकनाथ शिंदेंनीही एकत्र यावे, असे त्यांनी म्हटलं. त्यातच, आता संजय राठोड यांचे वक्तव्य चर्चेत आलं आहे. 

हेही वाचा

Video : महाराष्ट्रात 12 ते 20 जून मुसळधार पाऊस, तळी भरुन वाहणार; पंजाबराव डख यांचा अंदाज

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut: नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस, 17 सप्टेंबरनंतर कोणत्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतंय बघा: संजय राऊत
नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस, 17 सप्टेंबरनंतर कोणत्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतंय बघा: संजय राऊत
ST Students School Admission: राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांना सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांना सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
Devendra Fadnavis in Nagpur: देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या तरुणीचा पुनर्विवाह, कोरोनामुळे जोडीदार गमावलेल्या तरुणीच्या आयुष्यात नवी पहाट
देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या तरुणीचा पुनर्विवाह, कोरोनामुळे जोडीदार गमावलेल्या तरुणीच्या आयुष्यात नवी पहाट
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Embed widget