(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्पाइसजेटची मोठी घोषणा, 'या' आठ शहरांतून अयोध्येसाठी विमानसेवा सुरू होणार; सर्व उड्डाणे 'या' तारखेपासून सुरु होणार
SpiceJet : स्पाइसजेटनं (SpiceJet) मोठी घोषणा केली आहे. स्पाइसजेटने अयोध्येला जाण्यासाठी महत्वाच्या 8 शहरातून अयोध्येला जाण्यासाठी विमानसेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे.
SpiceJet : राम मंदिर (Ram Mandir) उद्घाटन सोहळा दोनच दिवसावर आला आहे. 22 जानेवारीला हा राम मंदिर उद्घाटन सोहळा होणार आहे. यानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर स्पाइसजेटनं (SpiceJet) मोठी घोषणा केली आहे. स्पाइसजेटने अयोध्येला जाण्यासाठी महत्वाच्या 8 शहरातून अयोध्येला जाण्यासाठी विमानसेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळं तुम्ही अयोध्येला सहज जाऊ शकता.
'या' आठ शहरातून विमानसेवा सुरु होणार
तुम्ही पवित्र राम मंदिरात जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. स्पाइसजेटने 8 शहरातून अयोध्येला जाण्यासाठी विमानसेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे. जेणेकरून तुम्ही येथे सहज जाऊ शकता. अनेक विमान कंपन्यांनीही देशातील विविध शहरांमधून अयोध्येसाठी उड्डाणे जाहीर केली आहेत. आता या यादीत स्पाइसजेटचेही नाव जोडले गेले आहे. कंपनीने एकूण आठ मार्गांवर विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये दिल्ली, अहमदाबाद, जयपूर, पाटणा, दरभंगा येथून अयोध्येला विमानसेवा सुरु होणार आहे. तर यापूर्वीच एअरलाइन्सने चेन्नई, मुंबई आणि बंगळुरु येथून थेट विमान सेवा सुरु केली होती. सर्व उड्डाणे 1 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होणार आहेत.
स्पाईसजेटची विशेष फ्लाइट
22 जानेवारीला हा राम मंदिर उद्घाटन सोहळा होणार आहे. यानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर स्पाईसजेटने 21 जानेवारी रोजी दिल्ली ते अयोध्या दरम्यान विशेष विमान चालवण्याची घोषणा केली आहे. 21 जानेवारी रोजी राम मंदिराच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी स्पाईस जेटचे विशेष विमान दिल्ली ते अयोध्या दरम्यान उड्डाण करणार आहे.
स्पाईसजेटबरोबरच अनेक कंपन्यांनी सुरु केली विमानसेवा
देशातील सर्वात मोठ्या एअरलाइन्स इंडिगो आणि एअर इंडिया एक्सप्रेसनेही वेगवेगळ्या शहरांमधून अयोध्येला विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. इंडिगोने दिल्ली, अहमदाबाद आणि मुंबई येथून अयोध्येसाठी उड्डाणे चालवण्याची घोषणा केली आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसनेही दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद ते अयोध्या दरम्यान उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळं आता अयोध्येला जाणं सहज शक्य होणार आहे. आकासा एअरनेही अयोध्येसाठी उड्डाणे चालवण्याची घोषणा केली आहे. विमान कंपन्या पुणे ते अयोध्या दरम्यान दिल्ली मार्गे उड्डाणे सुरू करणार आहेत. पुणे ते अयोध्या दरम्यानचे हे विमान 15 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणार आहे. हे विमान पुण्याहून सकाळी 8.50 वाजता उड्डाण करेल आणि 12.55 वाजता अयोध्येला पोहोचेल.
महत्वाच्या बातम्या: