Share Market : भारतीय शेअर बाजाराची सपाट सुरुवात, बाजार अस्थिर राहण्याचे संकेत
Share Market Updates : आज शेअर बाजाराची सुरुवात सपाट झाली. प्री ओपनिंग सत्रात सेन्सेक्स वधारला होता. मात्र, काही वेळानंतर त्यात घसरण दिसून आली.
Share Market Updates : भारतीय शेअर बाजाराची सुरुवात आज संमिश्र झाली. शेअर बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्स वधारला होता. मात्र, काही वेळेनंतर किंचित घसरण झाली. प्री-ओपनिंग सत्रात बाजार वधारला असल्याचे दिसून आले. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात अस्थिरता दिसत आहे. चीन आणि जपान शेअर बाजारमधील व्यवहार आज बंद आहेत.
आज बीएसईचा 30 शेअरचा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्समध्ये 148.92 अंकानी वधारत 57,124.91 अंकावर सुरू झाला. त्याशिवाय, एनएसईचा निफ्टी निर्देशांक 27.50 अंकांच्या तेजीसह 17,096.60 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.50 वाजता सेन्सेक्स 10.53 अंकाच्या घसरणीसह 56,965.46 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 50 मध्ये 7.20 अंकाची घसरण झाली असून 17,061.90 अंकावर व्यवहार करत होता. बँक निफ्टी निर्देशांक 80.80 अंकानी वधारला असून 36,244.55 अंकावर ट्रेड करत आहे.
निफ्टी 50 मधील 26 शेअरमध्ये तेजी दिसत आहे. तर, 24 शेअरमध्ये घसरण दिसून येत आहे. टाटा पॉवरच्या शेअरसह टाटा समूहाच्या इतर शेअरमध्ये खरेदीचा जोर दिसत आहे.
ब्रिटानिया कंपनीच्या शेअर दरात 5.5 टक्के वाढ झाली आहे. तर, पॉवर ग्रीडमध्ये 1.84 टक्क्यांनी वधारला आहे. ओेएनजीसीच्या शेअरमध्ये 1.82 टक्के आणि एनटीपीसीचा शेअर 1.46 टक्क्यांनी वधारला आहे. टाटा मोटर्सच्या शेअर दरात 1.21 टक्क्यांनी तेजी दिसून आहे.
अपोलो हॉस्पिटल्सच्या शेअर दरात 2.45 टक्के घसरण झाली आहे. हिंदाल्कोच्या शेअर दरात 2.09 टक्क्यांची घसरण झाली आहे. भारती एअरटेलमध्ये 1.87 टक्के आणि डॉ. रेडिज् लॅब्जमध्ये 1.47 टक्क्यांची घसरण झाली आहे. सन फार्माच्या शेअर दरात 1.16 टक्के घसरण झाली आहे.
एलआयसीचा आयपीओ आजपासून खुला
बहुप्रतिक्षित आणि देशातील सर्वात मोठा आयपीओ असलेला एलआयसीचा आयपीओ आज खुला होणार आहे. देशातील सामान्य गुंतवणूकदारांसाठी उद्यापासून आयपीओसाठी बोली लावता येणार आहे. एलआयसीने आयपीओमधील काही भाग हा कर्मचारी, पॉलिसीधारक यांच्यासाठी राखीव ठेवला आहे. एलआयसी कर्मचारी, पॉलिसीधारकांना सवलतीच्या दरात आयपीओमध्ये बोली लावता येणार आहे. मागील आर्थिक वर्षात एलआयसीचा आयपीओ येणार होता. मात्र, रशिया-युक्रेन युद्धामुळे आणि बाजारातील अस्थिरतेमुळे आयपीओ उशिराने आला.