Share Market Closing Bell : शेअर बाजारात नफावसुलीने घसरण; टाटा स्टीलमध्ये खरेदीचा जोर
Share Market Closing Bell : शेअर बाजारात आज झालेल्या नफावसुलीने तेजीला ब्रेक लागला. आज सकाळपासून बाजारात विक्रीचा सपाटा सुरू होता.
Share Market Closing Bell : मागील आठवड्याच्या तेजीनंतर आज सोमवारी शेअर बाजारात (Share Market Updates) नफावसुली दिसून आली. नफावसुलीने जोरदार विक्री झाल्याने सेन्सेक्स (Sensex), निफ्टीत (Nifty) घसरण दिसून आली. सेन्सेक्स निर्देशांक 306.01 अंकांच्या घसरणीसह 55,766.22 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टी निर्देशांक 88.45 अंकांच्या घसरणीसह 16,631.00 अंकांवर स्थिरावला.
आज सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 13 शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, 17 शेअर मध्ये घसरण नोंदवण्यात आली. टाटा स्टीलच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी झाली. त्याशिवाय, इंडसंइड बँक, एशियन पेंट्स, एचसीएल टेक, विप्रो, एनटीपीसी, एसबीआय, एलटी, आयटीसी, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि टायटनच्या शेअर दरात तेजी दिसून आली.
आज जवळपास सर्वच सेक्टरमध्ये घसरण नोंदवण्यात आली. त्याशिवाय मेटल आणि आयटी सेक्टरमध्ये तेजी दिसून आली. निफ्टी ऑइल अॅण्ड गॅस, ग्राहकोपयोगी वस्तू, हेल्थकेअर, रियल्टी, खासगी बँक, सार्वजनिक क्षेत्रातील बँक, फार्मा, मीडिया, एफएमसीजी, वित्तीय सेवा, ऑटो आणि निफ्टी बँकमध्ये घसरण दिसून आली.
आज शेअर बाजारात विक्री झालेल्या शेअर्समध्ये महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, रिलायन्स, मारुती, कोटक बँक, अल्ट्रा केमिकल, टेक महिंद्रा, नेस्ले इंडिया, बजाज फिनसर्व्ह, पॉवर ग्रीड, अॅक्सिस बँक, इन्फोसिस, भारती एअरटेल, टीसीएस आदी शेअर्समध्ये विक्री झाली.
आज सकाळी बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर विक्रीचा दबाव असल्याने घसरण झाली. सेन्सेक्स 177 अंकांच्या घसरणीसह 55,895 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टीमध्ये 43 अंकांची घसरण होत 16,662 च्या पातळीवर व्यवहाराची सुरुवात झाली. त्यानंतर बाजारातील घसरण वाढत गेली.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Indian Equities : विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर्स बाजारात परतले; जुलैमध्ये 1,100 कोटी रुपयांची गुंतवणूक
- Pan Card : तुमच्या स्मार्टफोनमध्ये पॅन कार्ड कसे डाऊनलोड कराल? 'ही' आहे संपूर्ण प्रक्रिया
- ITR Status Check Online : ITR भरण्याच्या शेवटच्या दिवशी बँका असतील बंद; 'या' अडचणींचा करावा लागू शकतो सामना