Share Market : शेअर बाजारात आजही अस्थिरता कायम, Sensex आणि Nifty मध्ये काहीशी वाढ, 'या' कंपन्यांच्या शेअर्स वाढले
Stock Market Updates : आज ऑटो, कॅपिटल गुड्स, उर्जा आणि रिअॅलिटी या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये 0.5 ते 2 टक्क्यांची वाढ झाली.
Share Market Closing Bell : शेअर बाजारातील आजचा दिवस काहीसा अस्थिर असल्याचं दिसून आला. बाजारातील प्रमुख निर्देशांकामध्ये चढ उतार होत असल्याचं दिसून आलं. शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) आज 126 अंकांची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty 50) आज 40 अंकांची वाढ झाली.
सेन्सेक्समध्ये आज 0.22 टक्क्यांची वाढ होऊन तो 57,653 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये आज 0.24 टक्क्यांची घट होऊन तो 16,985 अंकांवर पोहोचला. निफ्टी बँकमध्ये (Nifty Bank) आज मोठी चढ-उतार दिसून आली असून बाजाराच्या सुरुवातीला निफ्टी बँकमध्ये मोठी घसरण झाली होती. बाजार बंद होईपर्यंत निफ्टी बँक सावरला आणि तो 35 अंकांच्या वाढीसह 39,431 वर स्थिरावला.
रिलायन्स इंडस्ट्रीज, सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आणि कोटक महिंद्रा बँकच्या सेन्सेक्समध्ये सर्वाधिक वाढ झाली तर टाटा मोटर्स, एम अँड एम आणि बजाज फायनान्सचे शेअर्स घसरले. आज शेअर बाजारातील 899 शेअर्समध्ये वाढ झाली. तर 2649 शेअर्समध्ये घसरण झाली. आज एकूण 138 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
आज ऑटो, कॅपिटल गुड्स, उर्जा आणि रिअॅलिटी या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये 0.5 ते 2 टक्क्यांची वाढ झाली. तर फार्मा इंडेक्समध्ये आज एका टक्क्यांची वाढ झाली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 1.5 टक्क्यांची घसरण झाली.
Stock Market Updates : या निफ्टीमध्ये वाढ झाली
Grasim Industries, Reliance Industries, Cipla, Sun Pharma आणि SBI या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे. तर Adani Ports, Power Grid Corp, SBI Life Insurance, M&M आणि Tata Motors या निफ्टीमध्ये घट झाल्याचं दिसून आलं.
Share Market Opening Bell : सुरवातीला काहीशी घसरण, पण नंतर बाजार सावरला
संमिश्र जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजारात चढउतार दिसून येत आहे. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक मजबूत दिसत आहेत. शेअर बाजाराची आजची सुरुवात काहीशी घसरणीने झाल्याचं दिसून आलं. पण नंतर बाजार सावरला आणि सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ झाली.
या शेअर्समध्ये वाढ झाली
- Grasim- 2.30
- Reliance- 1.55
- Cipla- 1.37
- Sun Pharma- 1.09
- SBI- 0.95
या शेअर्समध्ये घसरण झाली
- Adani Ports- 1.39
- SBI Life Insurance- 1.16
- M&M- 1.12
- Tata Motors- 1.07
- Power Grid Corp- 1.03
ही बातमी वाचा: