एक्स्प्लोर

Share Market : शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले

Share Market: भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 559 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. तर निफ्टीमध्ये देखील  147 अंकांची घसरण झाली. 

मुंबई : भारतीय शेअर बाजारात आज (12 फेब्रुवारी) मोठी घसरण पाहायला मिळाली. गुंतवणूकदारांनी नफा वसूल करण्याचं धोरण स्वीकारल्यानं  बाजारात घसरण पाहायला मिळाली.  सेन्सेक्स 559 अंकांच्या घसरणीसह  83674.92 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टी  50 निर्देशांक देखील 147 अंकांच्या घसरणीसह 25807 वर बंद झाला. सर्वच क्षेत्रात जोरदार विक्री झाल्यानं बाजारावर परिणाम दिसून आला. बीएसई 150 मिडकॅप निर्देशांक 0.46 टक्क्यांनी घसरला. तर, बीएसई 250 स्मॉल कॅप निर्देशांक 0.86 टक्क्यांनी घसरला. 

Share Market Update : गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले

शेअर बाजारातील घसरणीमुळं बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य कमी झालं. बुधवारी बीएसईवरील कंपन्यांचं बाजारमूल्य  475 लाख कोटी रुपये होतं, आज ते तीन लाख कोटींनी कमी होऊन 472 लाख कोटींवर आलं. म्हणजेच गुंतवणूकदारांचं 3 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं.

भारतीय शेअर बाजारातील घसरणीचं प्रमुख कारण आयटी स्टॉक्सची जोरदार विक्री हे आहे. एआय क्षेत्रातील अपडेटस मुळं आयटी स्टॉक्सला धक्का बसला. याशिवाय डॉलर निर्देशांक देखील मजबूत झाल्यानं त्याचा नकारात्मक परिणाम दिसून आला. 

अमेरिकन शेअर बाजारात आयटी शेअरमध्ये झालेल्या घसरणीमुळं भारतीय शेअर बाजारात देखील आयटी कंपन्यांचे स्टॉक्स घसरले. अमेरिकेत व्याज दरातील कपातीची शक्यता कमी असल्यानं गुंतवणूकदार नफा वसूल करत आहेत. 

निफ्टी 50 निर्देशांकावर सर्वाधिक वाढ बजाज फायनान्स, श्रीराम फायनान्स, आयशर मोटर्सच्या शेअरमध्ये दिसून आली. तर, निफ्टी 50 वर सर्वाधिक फटका टेक महिंद्रा, इन्फोसिस,टीसीएस,एचसीएल टेक्नोलॉजीज, विप्रोच्या शेअरला बसला. निफ्टी 50 मधील 30 स्टॉक्स घसरणीमुळं बंद झाले. 

कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्यानं शेअर बाजारावर त्याचा परिणाम झाला.आंतरराष्ट्रायी बाजारात गुरुवारी ब्रेंट क्रूड ऑईलचा दर 0.46 टक्क्यांनी वाढून 49.72 डॉलर प्रति बॅरल झाला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळं तेलाच्या दरात वाढ झाली. भारतासारख्या तेल आयातदार देशाला क्रूड ऑईलच्या दरातील वाढ परवडणारी नसते. 

जागतिक शेअर बाजारांमधून देखील कोणताही आधार भारतीय शेअर बाजाराला मिळाला नाही. आशियाई बाजार कमजोर राहिले. तर, हाँगकाँगचा हैंग सेंग  निर्देशांक कमजोर राहिला. याशिवाय अमेरिकन शेअर बाजार बुधवारी घसरणीसह बंद झाले होते. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Metro 13: मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोनं जोडणार, 25 किमीच्या मेट्रो-13 वर 16 स्थानकं, 17,725 कोटींचा खर्च 
मुंबई-पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती, मेट्रो 13 आणि पुण्यातील रिंगरोडच्या खर्चास मान्यता 
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget