Share Market : जागतिक मंदीचं सावट! सेन्सेक्स 350 अंकांनी गडगडला, सलग सहाव्या दिवशी घसरण
Share Market Updates : जागतिक मंदीचं सावट भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. सलग सहाव्या दिवशी सेन्सेक्ससह निफ्टीही घसरला आहे.
Share Market Opening Bell : आज सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार (Share Market Today) गडगडल्याचं दिसून येत आहे. जागतिक मंदीचं सावट भारतीय शेअर बाजारावर (Share Market Updates) दिसून येत आहे. आज शेअर बाजार (Stocks) सुरु होताच सलग सहाव्या दिवशी सेन्सेक्ससह निफ्टीही घसरला आहे. सेन्सेक्स (Sensex) 350 अंकांनी घसरला आहे. तर निफ्टीही (Nifty) 100 अंकांच्या घसरणीसह 16,860 वर व्यवहार करत आहे.
बाजारातील सुरुवातीची परिस्थिती
आज शेअर बाजारात सुरुवातीच्या सत्रात बीएसईचा (BSE) 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 120 अंकांपेक्षा अधिक घसरून 57,430 अंकांवर उघडला. तर एनएसई (NSE) चा निर्देशांक निफ्टी (Nifty 50) सुमारे 45 अंकांच्या घसरणीसह 17,930 अंकांच्या खाली घसरला. आज दिवसभरातील सेन्सेक्स आणि निफ्टीच्या हालचालींवर जागतिक बाजाराचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
बाजारातील सध्याची परिस्थिती
घसरणीसह सुरुवात झालेल्या शेअर बाजार गडगडण्याचं सत्र सुरुच आहे. सध्या सेन्सेक्स 328 अंकाच्या म्हणजेच 0.52 टक्क्यांनी घसरला असून 57,256 वर व्यवहार करत आहे. तसेच निफ्टी 111 अंकानी म्हणजेच 0.66 टक्क्यांनी घसरला असून 16,860 वर व्यवहार करत आहे
सलग सहाव्या दिवशीही घसरण
गेल्या पाच दिवसांपासून बीएसई आणि एनएसई सातत्याने घसरत असून आजही सहाव्या दिवशी शेअर बाजार तोट्यात आहे. जागतिक बाजारातील घसरणीमुळे देशांतर्गत बाजार गुरुवारी सलग सहाव्या दिवशी घसरण होत आहेत. व्यवसाय सुरू झाल्यापासून बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत आहेत. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक बंद झाल्यामुळे जागतिक बाजारावर याचा मोठा परिणाम पाहायला मिळत आहे.
शेअर्सची परिस्थिती काय?
सुरुवातीच्या सत्रात बीपीसीएल (BPCL), टायटन (Titan), पावरग्रीड (Power Grid), नेस्ले इंडिया (Nestle India) हे शेअर्स नफ्यासह व्यवहार करत आहेत. तर हिंदाल्को (Hindalco), टाटा स्टील (Tata Steel), जेएसडब्ल्यू स्टील (JSW Steel), इंडसइंड बँक (IndusInd Bank) आणि ओएनजीसी (ONGC) हे शेअर्स तोट्यात आहेत.
भारतीय गुंतवणूकदारांना मोठा फटका
भारतीय शेअर बाजारात (Indian Share Market) अडीच महिन्यात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. मागील अडीच महिन्यात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे (Stock Market Investors) 26.50 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बाजारात सतत होत असणाऱ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या कमाईला घरघर लागली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
जगाची वाटचाल मंदीच्या दिशेने? कच्च्या तेलाची किंमत 75 डॉलरच्या खाली, 2021 नंतर नीच्चांकी पातळीवर