एक्स्प्लोर

देशाच्या संपत्तीपैकी एक तृतीयांश संपत्ती शेअर मार्केटमधून, 8.5 कोटी गुंतवणूकदारांपैकी 2 कोटी महिला

देशातील एक तृतीयांश संपत्ती सध्या शेअर बाजारातून (Share Market) निर्माण होत आहे. देशाला पुढे नेण्यात शेअर बाजार खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

Share Market: देशातील एक तृतीयांश संपत्ती सध्या शेअर बाजारातून (Share Market) निर्माण होत आहे. देशाला पुढे नेण्यात शेअर बाजार खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. सध्या देशात सुमारे 8.5 कोटी गुंतवणूकदार आहेत. त्यापैकी 2 कोटींहून अधिक महिला आहेत. तसेच 5 कोटींहून अधिक कुटुंबे शेअर बाजारातून थेट गुंतवणूक करतात. एनएसईचे एमडी आणि सीईओ आशिष कुमार चौहान यांनी आनंद व्यक्त केला आहे की भारतातील शेअर बाजारांवरील गुंतवणूकदारांचा विश्वास सतत मजबूत होत आहे.

भारताची अर्थव्यवस्था 100 ट्रिलियन डॉलर्स होणार

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चे MD आणि CEO आशिष कुमार चौहान म्हणाले की, भारतातील प्रत्येक तीन संपत्तीपैकी एक शेअर बाजारातून येत आहे. भारताची अर्थव्यवस्था 50 वर्षांत 100 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते असे चौहान म्हणाले.

NSE चे मार्केट कॅप 4.34 ट्रिलियन डॉलर 

2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी भारत 4 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होईल असा अंदाज अनेक अधिकारी आणि मंत्र्यांनी व्यक्त केला आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे मार्केट कॅप 2023 च्या अखेरीस 4.34 ट्रिलियन डॉलर आहे. UBS च्या अहवालानुसार 2022 मध्ये भारताची संपत्ती 15.4 ट्रिलियन डॉलर होती.

लोकसंख्या ही आपली मोठी ताकद

बॉम्बे चार्टर्ड अकाउंटंट्स सोसायटी (BACS) च्या कार्यक्रमात बोलताना चौहान म्हणाले की, जग जर 250 ट्रिलियन डॉलरपेक्षा अधिक संपत्ती निर्माण करणार असेल तर त्यातील सुमारे 30 टक्के भारताची असेल. आपण जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 18 टक्के आणि तरुण लोकसंख्येच्या 20 ते 22 टक्के आहोत.

शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी प्रचंड संपत्ती निर्माण करत आहे

भारतातील भांडवली बाजार गुंतवणूकदारांसाठी प्रचंड संपत्ती निर्माण करत आहेत. शेअर बाजारावरील लोकांचा विश्वास दृढ झाला आहे. त्यामुळेच देशातील गुंतवणूकदारांची संख्या साडेआठ कोटींवर पोहोचली आहे. याशिवाय 2 कोटींहून अधिक महिलाही आपले भांडवल शेअर बाजारात गुंतवत आहेत. देशातील 5 कोटींहून अधिक कुटुंबे शेअर बाजारातून गुंतवणूक करत आहेत. हा आकडा भारतातील एकूण कुटुंबांपैकी 17 टक्के असल्याचे चौहान म्हणाले.

शेअर बाजाराने लोकांची जीवनशैली बदलली

गेल्या 10 वर्षांत शेअर बाजाराने लोकांची जीवनशैली बदलण्यास मदत केली आहे. सप्टेंबर 2023 पर्यंत, NSE चा गुंतवणूकदार 7 कोटींवरून 8 कोटींपर्यंत वाढला होता. वर्षअखेरीस हा आकडा 8.5 कोटी गुंतवणूकदारांवर पोहोचला. हे गुंतवणूकदार भारतातील 99.8 टक्के भागातून येतात. सुमारे 90 लाख गुंतवणूकदारांसह उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या कॅलेंडर वर्षात इक्विटी डेरिव्हेटिव्हमध्ये किमान एकदा व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या वार्षिक आधारावर 31 टक्क्यांनी वाढून 83.6 लाख झाली आहे. रोख विभागासाठी, ही संख्या वार्षिक आधारावर 0.4 टक्क्यांनी घसरून 2.67 कोटी झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Embed widget