एक्स्प्लोर

Share Market Prediction: टाटा पॉवर आणि विप्रोच्या शेअरवर ठेवा नजर, होऊ शकतो फायदा

Share Market Prediction: आज काही कंपन्यांच्या शेअर दरात तेजीचे संकेत दिसून येत आहेत. यामध्ये टाटा पॉवर, विप्रो आदी कंपन्यांचा समावेश आहे.

Share Market Prediction:  बुधवारी भारतीय शेअर बाजारातील व्यवहार किरकोळ घसरणीसह बंद झाले. आठवड्यातील पहिल्या दोन दिवसात बाजारात तेजी दिसून आली. आज बाजारात खरेदीचा जोर असेल का, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. आज बाजारात KFin Technologies या कंपनीची लिस्टिंग होणार आहे. 

शेअर बाजारात बुधवारच्या व्यवहारात अस्थिरता दिसून आली. बीएसईचा 30 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स निर्देशांक 17.15 अंकांनी घसरून 60,910.28 अंकांवर बंद झाला. बुधवारी व्यवहाराच्या दिवशी एका वेळी सेन्सेक्समध्ये 213.66 अंकांपर्यंतची घसरण झाली होती.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही 9.80 अंकांनी म्हणजेच 0.05 टक्क्यांनी घसरून 18,122.50 अंकांवर स्थिरावला. सेन्सेक्स मधील भारती एअरटेल, अॅक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट आणि टाटा मोटर्स या कंपन्यांमध्ये घसरण दिसून आली. दुसरीकडे, टायटन, महिंद्रा अँड महिंद्रा, पॉवरग्रिड आणि मारुती या कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली.

आज, गुरुवारी, टाटा पॉवर कंपनी (Tata Power Company), अशोका बिल्डकॉन (Ashoka Buildcon), बँक ऑफ इंडिया (Bank of India), विप्रो (Wipro) आणि स्पंदना स्फूर्ति फायनान्शियल (Spandana Sphoorty Financial) या कंपन्यांच्या शेअर दरात तेजी राहण्याची शक्यता आहे. 

टाटा पॉवरची सहकंपनी असलेल्या  Tata Power Renewable Energy या कंपनीला कर्नाटकमध्ये 255 मेगावॅट हायब्रिड पॉवर प्रोजेक्टचे कंत्राट मिळाले आहे. तर, अशोका बिल्डकॉन कंपनीला मध्य प्रदेशात 754.57 कोटी रुपयांचे तीन प्रकल्प मिळाले आहेत. 

आज या कंपन्यांच्या शेअर दरात चढ-उतार?

MACD इंडिकेटरनुसार, संवर्धन मदर (Samvardhana Mother), सदर्न पेट्रोकेमिकल्स (Southern Petrochemicals) आणि कल्याण ज्वेलर्स (Kalyan Jewellers) या कंपन्यांच्या शेअर दरात तेजी राहण्याचे संकेत आहेत. 

तर, पार्श्वनाथ (Parsvnath), Carborundum, Gyscoal Alloys आणि V-Guard Industries या कंपन्यांच्या शेअर दरात घसरण होण्याची शक्यता आहे. MACD इंडिकेटरमध्ये  या कंपन्यांच्या शेअरमध्ये विक्रीचे संकेत दिसून येत आहेत. 

MACD इंडिकेटर काय आहे?

Moving Average Convergence/Divergence  (MACD) हे ट्रेंड रिव्हर्सलसाठी ओळखले जाते. MACD इंडिकेटरमध्ये सिग्नल लाइन ओलांडली की त्या शेअरमध्ये तेजी राहण्याचे संकेत समजले जातात. या MACD नुसार स्टॉकमधील संभाव्य तेजी आणि घसरण याचाही अंदाज लावता येतो. त्याआधारे संबंधित शेअर्समध्ये तेजी अथवा घसरण होणार याचा अंदाज लावता येतो. 

(Disclaimer: ही बातमी केवळ माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात व्यवहार करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. तुमच्या आर्थिक नुकसानीला एबीपी माझा जबाबदार राहणार नाही.) 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
Mhada lottery 2024 प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
''आनंदाच्या शिधामधील डाळ निकृष्ट, साखरही पिवळसर;पाकिटातील तेलातही मारलाय काटा''
''आनंदाच्या शिधामधील डाळ निकृष्ट, साखरही पिवळसर;पाकिटातील तेलातही मारलाय काटा''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : महाराष्ट्र काँग्रेसच्या न्याय पत्रात काय असेल? तीन पातळ्यांवर असणार काँग्रेसचा जाहीरनामाZero Hour : नागपुरात भाजपला धक्का बसण्याची शक्यता, भाजपच्या विदर्भ सर्व्हेत धक्कादायक आकडेZero Hour Guest:विदर्भात काँग्रेसच्या सर्वाधिक जागा? मविआचं प्लॅनिंग काय?Sachin Sawant गेस्ट सेंटरवरZero Hour : भाजपच्या विदर्भ सर्व्हेत धक्कादायक आकडे, मविआकडून भाजपच्या सर्व्हेवर प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
Mhada lottery 2024 प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
''आनंदाच्या शिधामधील डाळ निकृष्ट, साखरही पिवळसर;पाकिटातील तेलातही मारलाय काटा''
''आनंदाच्या शिधामधील डाळ निकृष्ट, साखरही पिवळसर;पाकिटातील तेलातही मारलाय काटा''
गणपती बाप्पांचे विसर्जन करताना दोघे बुडाले; पोलिसांची समुद्रात धाव, सुदैवाने दोघांचा जीव वाचला
गणपती बाप्पांचे विसर्जन करताना दोघे बुडाले; पोलिसांची समुद्रात धाव, सुदैवाने दोघांचा जीव वाचला
Amol Mitkari: 'ही' तर बालिश नेत्याच्या डोक्यातील घाण; अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर बोचरा आरोप
'ही' तर बालिश नेत्याच्या डोक्यातील घाण; अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर बोचरा आरोप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
Port Blair Renamed Sri Vijaya Puram : देशातील आणखी एका शहराचे नामांतर; नेताजी सुभाष चंद्र बोस, सावरकरांचा संघर्ष पाहिलेल्या शहराचं नाव आता  'श्री विजयपूरम'
देशातील आणखी एका शहराचे नामांतर; नेताजी सुभाष चंद्र बोस, सावरकरांचा संघर्ष पाहिलेल्या शहराचं नाव आता 'श्री विजयपूरम'
Embed widget