Share Market Opening : शेअर बाजारात आज अस्थिरता; सेन्सेक्समध्ये किरकोळ घसरण, निफ्टी वधारला
Share Market Opening : शेअर बाजारात आज अस्थिरता राहण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात आज सावध सुरुवात झाली.

Share Market Opening : आज भारतीय शेअर बाजारात (Share Market Updates) आज अस्थिरता राहण्याचे संकेत दिसून येत आहे. प्री-ओपनिंग सत्रात निफ्टी निर्देशांकात घसरण दिसून आली. मात्र, बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर तेजी दिसून आली. शेअर बाजारात आज Weekly Expiry चा दिवस आहे. गुंतवणूकदारांकडून खरेदीचा जोर राहण्याची शक्यता आहे.
आज शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्स निर्देशांक 5.60 अंकांनी घसरत 55,391.93 अंकांवर खुला झाला. तर. निफ्टी निर्देशांक 2.70 अंकांनी वधारत 16,523.55 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 6.84 अंकांच्या घसरणी 55,390.69 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 7.65 अंकांनी वधारत 16,528.50 अंकांवर व्यवहार करत होता.
आज निफ्टी 50 पैकी 31 शेअरमध्ये तेजी असल्याचे दिसून येत आहे. तर, 19 शेअरमध्ये घसरण सुरू आहे. बँक निफ्टीमध्ये सपाट व्यवहार सुरू आहे. बँक निफ्टीत चार अंकांची घसरण नोंदवण्यात आली असून 35968 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.
वित्तीय सेवा, आयटी, फार्मा, ग्राहकोपयोगी वस्तू, ऑइल अॅण्ड गॅस सेक्टरमध्ये घसरण सुरू आहे. तर, मीडिया क्षेत्रातील शेअरमध्ये सर्वाधिक 1.21 टक्क्यांनी उसळण असल्याचे दिसून येत आहे. ऑटो, रियल्टी आणि खासगी बँक सेक्टरमध्ये तेजी असल्याचे दिसून येत आहे.
आज प्री-ओपनिंग बाजार निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये संमिश्र संकेत देत आहेत. निफ्टीमध्ये 51.30 टक्क्यांच्या घसरणीसह 16469.50 च्या पातळीवर व्यवहार करत होता.
दरम्यान, बुधवारी, सेन्सेक्समध्ये 629 अंकाची, तर निफ्टीमध्ये 180 अंकांची वाढ नोंदवण्यात आली. सेन्सेक्स 55,397 अंकांवर, तर निफ्टी 16,520 अंकांवर स्थिरावला. बँक निफ्टीमध्येही 251 अंकांची वाढ होऊन तो 35,972 वर बंद झाला होता. जागतिक स्तरावर सकारात्मक संकेत आणि गुंतवणूकदारांचा खरेदीकडे असलेला कल यामुळे शेअर बाजार वधारल्याचं चित्र होतं.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
