(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market Opening Bell : शेअर बाजाराची सावध सुरुवात, सेन्सेक्स 200 अंकांनी वधारला
Share Market Opening Bell : शेअर बाजाराची सुरुवात सावधपणे झाली. शेअर बाजार 200 अंकांनी वधारला.
Share Market Opening Bell : शेअर बाजाराची सुरुवात सावधपणे झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 200 अंकांनी वधारला. ऑटो, बँकिंग आणि मेटल क्षेत्रातील शेअर दरात तेजी असल्याचे दिसून येत आहे.
शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाल्यानंतर काही मिनिटांतच तेजी असल्याचे दिसून आले. सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 348 अंकांनी वधारत 59,151.47 अंकावर व्यवहार सुरू होता. निफ्टी 86 अंकांच्या तेजीसह 17,625.55 अंकांवर व्यवहार करत होता. एसजीएक्स निफ्टीमध्ये घसरण दिसून आल्याने भारतीय शेअर बाजारातही घसरण होईल असे संकेत होते. मात्र, एसजीएक्स निफ्टीतील घसरणीनंतरही भारतीय शेअर बाजार वधारला. प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांक वधारले.
आज, आयटीसीच्या शेअर दरात एक टक्क्यांची तेजी असल्याचे दिसून येत आहे. त्याशिवाय, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, टाटा स्टील, इंडसंइड बँक, रिलायन्स इंडस्ट्री, एनटीपीसी, अॅक्सिस बँक, भारती एअरटेल, कोटक महिंद्रा बँक, एसबीआय, इन्फोसिस, टीसीएस, सन फार्मा, एचडीएफसी, एचडीएफसी बँक आदी कंपन्यांच्या शेअर दरात तेजी असल्याचे दिसून येत आहे.
तर, एशियन पेंट्स, विप्रो, अल्ट्राटेक सिमेंट, एचयूएल, डॉ. रेड्डीज लॅब, एमअॅण्डएम, पॉवरग्रीड. मारुती सुझुकीच्या शेअर दरात घसरण असल्याचे दिसत आहे.
शुक्रवारी शेअर बाजारात अस्थिरता
शुक्रवारी शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली. शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये 36 अंकांची वाढ झाली. तर निफ्टीमध्ये 3.30 टक्क्यांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.06 टक्क्यांची वाढ होऊन तो 58,803 अंकांवर पोहोचला. शेअर बाजारात आज 1726 कंपन्यांच्या शेअर दरामध्ये वाढ झाली. तर 1612 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. तसेच 137 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Indian Economy : जगाला कळणार भारताची ताकद, येत्या काळात भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल
- Wheat Producer: भारत बनला जगातील दुसरा सर्वात मोठा गहू उत्पादक देश, जाणून घ्या या मागचं कारण