(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Indian Economy : जगाला कळणार भारताची ताकद, येत्या काळात भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल
Indian Economy News : भारत लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल. नुकताच भारत जागतिक क्रमवारीत 11 वरून पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
India Becomes Fifth Largest Economy in World : भारत (Indian Economy) जगातील पाचवी सर्वात मोठ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. भारत जागतिक पातळीवर ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेच्या पुढे पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर एका नव्या अहवालानुसार, भारत लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकांची अर्थव्यवस्था म्हणून नावारुपाला येईल. भारतीय स्टेट बँकेच्या एका रिपोर्टनुसार, भारतीय अर्थव्यवस्था येत्या काळात जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. या शतकाच्या शेवटी भारतीय अर्थव्यवस्थेचा विस्तार आणखी व्यापक होईल, असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल
भारतीय स्टेट बँकेच्या रिसर्च डिपार्टमेंटच्या नव्या अहवालानुसार, भारत येत्या काळात अनेक महासत्तांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या रिपोर्टनुसार, 2027 पर्यंत भारत जर्मनीच्या पुढे जाईल आणि 2029 पर्यंत जपानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकेल. सध्या जागतिक क्रमवारीत जर्मनी (Germany) चौथ्या आणि आणि जपान (Japan) तिसऱ्या स्थानावर आहे. अशा प्रकारे या दशकाच्या शेवटी भारतीय अर्थव्यवस्था अधिक विस्तार करत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, असंही या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.
सध्या भारतीय अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर
ब्रिटनला मागे टाकत भारत पाचव्या क्रमांकावरील जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. एका दशकाआधी या क्रमवारीत भारताचा क्रमांक अकरावा होता. मात्र आता भारत या यादीत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे कधी काळी ब्रिटिशांचं राज्य असणारा भारत आता ब्रिटनला मागे टाकत अग्रेसर ठरला आहे. भारत आता अमेरिका (America), चीन (China), जपान (Japan) आणि जर्मनी (Germany) या देशांनंतर जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश आहे.
भारतीय शेअर्सवरील जागतिक गुंतवणुकीचा परिणाम
या तिमाहीत भारतीय शेअर्समध्ये जागतिक गुंतवणुकीमुळे देशाने एमएससीआय इमर्जिंग मार्केट्स इंडेक्समध्ये चीननंतर दुसरे स्थान मिळवलं आहे. तिमाहीच्या शेवटी डॉलरच्या विनिमय दराचा वापर करून, रोखीच्या बाबतीत मार्चमधील तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार 854.7 डॉलर बिलियन होता, तर ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेचा आकार 816 डॉलर इतका होता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची (IMF) माहिती आणि ब्लूमबर्ग टर्मिनलवरील संगणक सॉफ्टवेअर वापरून ऐतिहासिक विनिमय दरांचा वापर करून ही आकडेवारी काढली जाते.
विदेशी गुंतवणूकीच्या प्रमाणात वाढ
दरम्यान, या यादीत ब्रिटनची अर्थव्यवस्था आणखी घसरू शकते, असं तज्ज्ञांचे मत आहे. दुसऱ्या तिमाहीत ब्रिटनचा जीडीपी केवळ एक टक्क्यांनी वाढला आणि चलनवाढीनंतर 0.1 टक्के कमी झाला. येत्या काळात भारताची अर्थव्यवस्था आणखी बळकट होईल. जागतिक पातळीवर भारताच्या योगदानातही भर पडत आहे. तसेच विदेशी कंपन्याचे भारतीय कंपन्यांमध्ये पैसे गुंतवण्याचं प्रमाण