(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market Opening : शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 200 अंकांनी वधारला
Share Market Opening : शेअर बाजारातील व्यवहारांची आजची सुरुवात चांगली झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक चांगलेच वधारले.
Share Market Opening : तीन दिवसांच्या सुट्टीनंतर शेअर बाजारात (Share Market Opening Session) आज खरेदीचा जोर दिसून येत आहे. बाजारातील व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांक वधारले. बँकिंग आणि मिडकॅपमधील शेअर्स दरात चांगली तेजी दिसून आली. महगाईचे आकडेवारी आज जाहीर होणार आहे. मात्र, महागाईबाबत दिलासादायक आकडेवारी समोर येण्याचे संकेत शेअर बाजारातून मिळत आहेत.
आज बीएसईचा निर्देशांक सेन्सेक्स 212.34 अंकांनी वधारत 59,675.12 अंकांवर खुला झाला. तर, एनएसईचा निर्देशांक निफ्टी 99.05 अंकांनी वधारत 17797 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.40 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 440 अंकांनी वधारत 59,903.17 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 124 अंकांनी वधारत 17,823.05 अंकावर व्यवहार करत होता.
शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात होताच निफ्टीने 17800 अंकांची पातळी ओलांडली. तर, सेन्सेक्सने 59700 अंकांची पातळी ओलाडली. बाजारातील व्यवहार सुरू होताच सेन्सेक्समधील 30 पैकी 25 शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर, पाच शेअर्सच्या दरात घसरण नोंदवण्यात आली. त्याशिवाय, निफ्टीतील 50 पैकी 43 शेअर वधारले आहेत. तर, 7 शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून येत आहे. बँक निफ्टी 321 अंकांनी वधारला असून 39363 अंकांच्या पातळीवर आहे.
मेटल आणि ऑइल-गॅसच्या शेअर दरात निफ्टीशिवाय इतर सर्व सेक्टोरियल इंडेक्समध्ये तेजी दिसून येत आहे. निफ्टी ऑटो सेक्टरमध्ये 1.13 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. बँकिंग शेअर जवळपास एक टक्क्यांनी वधारला आहे. त्याशिवाय, एफएमसीजी आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे.
FPI ची गुंतवणूक वाढली
परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) भारतीय शेअर बाजारात (FPI Investment in Share Market) गुंतवणूक वाढवण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली आहे. मागील महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून खरेदीचा जोर वाढत असल्याचे दिसून आले. महागाईबाबतची चिंता (Inflation Rate) कमी झाल्याच्या परिणामी परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातील गुंतवणूक वाढवली आहे.
जुलै महिन्यात एफपीआयने शेअर बाजारात जवळपास पाच हजार कोटींची गुंतवणूक केली होती. सलग नऊ महिन्यांपासून परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडून विक्रीचा सपाटा सुरू होता. मागील वर्षीच्या ऑक्टोबरपासून विक्री सुरू होती. त्यानंतर मागील महिन्यात, जुलैमध्ये खरेदी दिसून आली. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 22,452 कोटींची गुंतवणूक केली.