Share Market Opening Bell: कोरोना संकटाच्या सावटाने शेअर बाजारात पडझड; सेन्सेक्स 400 अंकांनी घसरला, निफ्टी 18000 अंकांखाली
Share Market Opening Bell: भारतीय शेअर बाजारात आज घसरण दिसून येत आहे. कोविड संकटाची भीती आणि जागतिक शेअर पातळीवर झालेली पडझड याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे.
![Share Market Opening Bell: कोरोना संकटाच्या सावटाने शेअर बाजारात पडझड; सेन्सेक्स 400 अंकांनी घसरला, निफ्टी 18000 अंकांखाली share market opening bell Sensex falls nearly 400 points Nifty trades around 18000 level due to covid fear and global cue Share Market Opening Bell: कोरोना संकटाच्या सावटाने शेअर बाजारात पडझड; सेन्सेक्स 400 अंकांनी घसरला, निफ्टी 18000 अंकांखाली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/23/98cf5436a830e82ea0cad612e71c691d1671769428324290_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Share Market Opening Bell: जागतिक शेअर बाजारात झालेली (Indian Share Market) पडझड आणि कोरोना महासाथीची (Coronavirus) भीती याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला आहे. अमेरिकन शेअर बाजार (US Share Market) घसरणीसह बंद झाला. तर, आशियाई शेअर बाजारातही नकारात्मक संकेत आहेत. त्याच्या परिणामी आज भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीत (Nifty) मोठी घसरण दिसून येत आहे. निफ्टी निर्देशांक 18000 अंकांखाली व्यवहार करत आहे.
आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 314 अंकांच्या घसरणीसह 60,512 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 91 अंकांच्या घसरणीसह 18036 अंकांवर खुला झाला. त्यानंतर बाजारात विक्रीचा जोर दिसून येत आहे. सकाळी 9.40 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 311 अंकांच्या घसरणीसह 60,514.92 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 101 अंकांच्या घसरणीसह 18,026.10 अंकांवर व्यवहार करत होता.
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 4 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. तर, निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 9 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसत असून 41 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे.
कोरोना महासाथीच्या सावटाचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. फार्मा आणि हेल्थकेअर सेक्टर वगळता इतर सेक्टरमध्ये घसरण दिसून येत आहे. बँकिंग आयटी, ऑटो, एफएमसीजी, मेटल्स. एनर्जी आदी सेक्टरमध्ये घसरण दिसून येत आहे. मिडकॅप आणि स्मॉल कॅपच्या शेअर दरात मोठी घसरण दिसून येत आहे.
शेअर बाजारात घसरण सुरू असताना दुसरीकडे फार्मा कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. सिप्लामध्ये 1.61 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. तर, सनफार्मामध्ये 1.12 टक्के, डॉ. रेड्डी लॅब 0.97 टक्के, डिविज लॅबमध्ये 0.69 टक्के, एचसीएल टेकमध्ये 0.19 टक्के आणि नेस्लेमध्ये 0.04 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे.
गुरुवारी तेजीनंतर बाजारात घसरण
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये गुरुवारी सकाळी तेजी दिसून आली होती. मात्र, त्यानंतर खरेदीचा दबाव वाढू लागल्याने घसरण सुरू झाली. दिवस अखेर सेन्सेक्स 241.02 अंकांच्या घसरणीसह 60,826.22 अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 71.75 अंकांनी घसरून 18,127.35 अंकांवर बंद झाला.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)