एक्स्प्लोर

Share Market Opening Bell: शेअर बाजारात आपटीबार; प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स 1100 अंकानी कोसळला

Share Market Opening Bell : शेअर बाजारात मोठी घसरण झाली. प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स 1100 अंकांनी घसरला. बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर काही प्रमाणात बाजार सावरला.

Share Market Opening Bell : अमेरिकन शेअर बाजारात झालेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. प्री-ओपनिंगमध्ये (Share Market Pre-Opening Session) सेन्सेक्समध्ये (Sensex Fall) एक हजार अंकांची घसरण दिसून आली. तर, निफ्टी (Nifty) तब्बल 298 अंकांची मोठी घसरण दिसून आली. अमेरिकेत पुन्हा महागाई वाढल्याने (US Inflation Data) अमेरिकन शेअर बाजारात घसरण झाली होती. महागाई वाढल्याने फेडरल रिझर्व्हकडून व्याज दर वाढण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात प्री-ओपनिंग सत्रात घसरण झाल्यानंतर बाजार सावरू लागला. 

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1,153.96 अंकांनी म्हणजे जवळपास 1.91 टक्क्यांच्या घसरणीसह 59,417 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 298.90 अंकांनी म्हणजे 1.65 टक्क्यांच्या घसरणीसह 17,771 अंकावर खुला झाला. प्री-ओपनिंगनंतर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर बाजार पुन्हा सावरू लागला. सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 560 अंकांच्या घसरणीसह 60,011.05 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 159 अंकांच्या घसरणीसह 17,910.80 अंकांवर व्यवहार करत होता. 

सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी 5 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, उर्वरित 25 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण नोंदवण्यात आली. निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 10 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ दिसून आली. तर, 40 कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली. 

सेन्सेक्समध्ये एनटीपीसीच्या शेअर दरात 2 टक्क्यांची तेजी दिसत आहे. तर, एशियन पेंट्स 0.67 टक्के, नेस्ले 0.36 टक्के आणि एसबीआयमध्ये 0.26 टक्क्यांची तेजी दिसत आहे. त्याशिवाय, पॉवरग्रीडमध्ये 0.18 टक्के, आयटीसीमध्ये 0.15 टक्के, इंडसइंड बँकेत 012 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. 

अमेरिकन बाजारात मोठी पडझड

अमेरिकन शेअर बाजारात मागील दोन वर्षातील सर्वात मोठी पडझड दिसून आली. अमेरिकन शेअर बाजारात झालेल्या या पडझडीचा परिणाम आशियाई आणि भारतीय शेअर बाजारावर दिसून येण्याची शक्यता आहे. अमेरिकन शेअर बाजारातील तिन्ही प्रमुख निर्देशांकात जून 2020 नंतरची मोठी घसरण दिसून आली. अमेरिकेत महागाईने पुन्हा डोके वर काढल्याने बाजारात घसरण झाल्याचे म्हटले जात आहे.  ऑगस्ट महिन्यात अमेरिकेतील महागाईचा दर 8.3 टक्के इतका नोंदवण्यात आला. अमेरिकेतील महागाईचा दर हा अपेक्षेपेक्षा अधिक दिसून आल्याने बाजारात पडझड झाल्याचे दिसून आले. महागाईमुळे फेडरल रिझर्व्हकडून व्याज दरात वाढ होण्याची शक्यता आहे. 

SGX Nifty मध्ये 1.5 टक्क्यांची घसरण

अमेरिकन शेअर बाजारात झालेल्या पडझडीचा परिणाम SGX Nifty सह आशियाई शेअर बाजारावर दिसून आला. सकाळी SGX Nifty निर्देशांक 258 अंकांच्या घसरणीसह 17807 अंकांवर व्यवहार करत होता. सिंगापूरचा बाजारात 1.25 टक्के, जपानच्या शेअर बाजारात 2.09 टक्के, हाँगकाँगमध्ये 0.18 टक्के, कोरियन शेअर बाजारात 1.70 टक्क्यांची घसरण दिसून आली. 

महत्त्वाच्या बातम्या

JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget