एक्स्प्लोर

Share Market Closing Bell: सलग चौथ्या सत्रात शेअर बाजार वधारला; 'या' स्टॉक्समध्ये दिसला खरेदीचा जोर

Share Market Closing Bell: सलग चौथ्या सत्रात भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली आहे. आज बाजारात खरेदीचा जोर असला तरी नफावसुलीदेखील दिसून आली.

Share Market Closing Bell:  या आठवड्यात सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला. दिवाळी आधी गुंतवणूकदारांकडून खरेदी सुरू आहे. बँकिंग, एफएमसीजी सेक्टरमध्ये खरेदीचा जोर दिसून आला. गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 146 अंकांनी वधारत 59,107 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 30 अंकांच्या तेजीसह 17,516  अंकांवर बंद झाला. 

बाजारात आज तेजी दिसून आली असली तरी विक्रीचा जोर दिसून आला. बाजारात आज विक्रीचा जोर दिसून आलेल्या कंपन्यांची संख्या अधिक दिसून आली. आज बाजारात सूचीबद्ध असलेल्या 3671 कंपन्यांपैकी 1652 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 1761 शेअर दरात घसरण दिसून आली. 158 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. बाजारात 228 कंपन्यांच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागले असून 146 कंपन्यांच्या शेअर दरात लोअर सर्किट लागले आहे. मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल 274.67 अब्ज डॉलर इतके झाले. 

आज भारतीय शेअर बाजारात बँकिंग, फार्मा, एफएमसीजी सेक्टरमध्ये तेजी दिसून आली. तर, ऑटो, आयटी, मेटल्स, एनर्जी आदी सेक्टरमध्ये नफावसुली दिसून आली. मिड कॅप आणि स्मॉल कॅप इंडेक्समध्ये किंचित तेजी दिसून आली. निफ्टी 50 मधील फक्त 18 शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर, 32 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. सेन्सेक्समधील 30 पैकी 10 शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, 20 शेअर घसरणीसह बंद झाले.

नेस्ले कंपनीच्या शेअर दरात 2.14 टक्के, एचडीएफसीच्या शेअर दरात 2.13 टक्के, रिलायन्समध्ये 1.88 टक्के, आयटीसी 1.79 टक्के, अॅक्सिस बँक 1.69 टक्के, एचडीएफसी बँक 1.02 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 0.89 टक्के, पॉवरग्रीड 0.68 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाले. 

तर, एनटीपीसी 1.77 टक्के, एसबीआय 1.64 टक्के, बजाज फिनसर्व्ह 1.54 टक्के, एचसीएल टेक 1.41 टक्के, डॉ. रेड्डी 1.12 टक्के, इन्फोसिस 1.03 टक्के, मारुती सुझुकी 0.92 टक्क्यांची घसरण दिसून आली. 

दरम्यान, शेअर बाजारात आजही तेजीसह  सुरुवात झाली. जागतिक शेअर बाजारात दिसत असलेल्या सकारात्मक संकेताने भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स 59,196.96 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टी निर्देशांक 17,568.15 अंकांवर खुला झाला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Embed widget