एक्स्प्लोर

Closing Bell :  शेअर बाजारातील तेजीमुळे विक्रम, बाजार भांडवलाने गाठला ऐतिहासिक टप्पा, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत अडीच लाख कोटींची वाढ

Stock Market Closing Bell: भारतीय शेअर बाजारात आज तेजी दिसून आली. आजच्या तेजीमुळे बाजार भांडवलाने ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.

Sensex Closing Bell :  आठवड्यातील पहिले ट्रेडिंग सत्र भारतीय शेअर बाजारासाठी (Share Market) सकारात्मक राहिले. जागतिक बाजारातील संकेत आणि कंपन्यांचे चांगले तिमाही निकाल यामुळे गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे बाजारात तेजी दिसून आली. आजच्या सत्रात आयटी, ऊर्जा समभागात तेजी आली. मिड कॅपमध्येही खरेदी दिसून आली, आजच्या व्यवहाराअंती बीएसईचा सेन्सेक्स निर्देशांक 367 अंकांच्या उसळीसह 66,527 वर बंद झाला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 108 अंकांच्या उसळीसह 19,753 अंकांवर बंद झाला. आजच्या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.52 लाख कोटींची वाढ झाली. 

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समधील (Sensex) 30 पैकी 23 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, निफ्टी निर्देशांकातील (Nifty 50) 50 पैकी 36 कंपन्यांच्या शेअर्स दर वधारले. 

कोणत्या सेक्टरमध्ये तेजी-घसरण

आज दिवसभरातील व्यवहारात आयटी, एनर्जी, ग्राहकोपयोगी वस्तू, ऑटो, फार्मा, रिअल इस्टेट, मीडिया, मेटल्स, ऑईल अॅण्ड गॅस सेक्टरमध्ये तेजी दिसून आली. मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्समध्येही तेजी दिसून आली. निफ्टीचा मिड कॅप इंडेक्सने सर्वकालिक उच्चांक गाठला. मिड कॅपमध्ये 1.03 टक्क्यांची तेजी दिसून आली. एफएमसीजी, हेल्थकेअर सेक्टरमध्ये स्टॉक्स घसरणीसह बंद झाले. 

इंडेक्‍स किती अंकांवर बंद दिवसभरातील उच्चांक दिवसभरातील नीचांक किती टक्के बदल
BSE Sensex 66,527.67 66,598.42 65,998.90 0.56%
BSE SmallCap 35,002.32 35,039.71 34,662.29 00:18:52
India VIX 10.41 11.19 10.14 2.74%
NIFTY Midcap 100 37,721.35 37,757.15 37,352.65 0.97%
NIFTY Smallcap 100 11,702.85 11,712.90 11,639.00 0.88%
NIfty smallcap 50 5,294.75 5,299.50 5,247.85 1.19%
Nifty 100 19,679.35 19,697.45 19,545.00 0.50%
Nifty 200 10,445.90 10,454.80 10,372.00 0.57%
Nifty 50 19,753.80 19,772.75 19,597.60 0.55%

गुंतवणूकदारांनी 2.52 लाख कोटी रुपये कमावले

मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज, 31 जुलै रोजी 306.68 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. मागील ट्रेडिंग दिवशी म्हणजेच शुक्रवार, 28 जुलै रोजी 304.16 लाख कोटी रुपये होते. BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 2.52 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 2.52 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 

1470 समभाग घसरले

मुंबई शेअर बाजारामध्ये (BSE) आज मोठ्या प्रमाणात शेअर्स वाढीसह बंद झाले. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,878 शेअर्सचे व्यवहार झाले. यातील 2,209 शेअर्स वाढीसह बंद झाले. त्याच वेळी, 1,470 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर 199 शेअर्स कोणत्याही चढ-उताराशिवाय फ्लॅट बंद झाले. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 331 समभागांनी 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर 50 समभागांनी त्यांच्या नवीन 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर
Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
Embed widget