एक्स्प्लोर

ITR Filing Last Date 31st July: आज आखिरी तारीख है! अजून भरला नसेल तर आजच झटपट भरा Income Tax Return; कसा भराल?

ITR Filing Last Date : 31 जुलै 2023 आला आहे. असेसमेंट ईयर 2023-24 (AY2023-24) साठी ITR दाखल करण्याची ही अंतिम मुदत आहे.

ITR Filing Last Date Today 31st July, 2023: आज 31 जुलै 2023... इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज शेवटची संधी आहे. मूल्यांकन वर्ष 2023-24 (AY2023-24) साठी ITR दाखल करण्याची ही अंतिम मुदत आहे. ही अंतिम मुदत वाढवली जाईल की नाही याबद्दल अद्याप प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. (ITR Due Date 2023 Latest News Updates). ज्या करदात्यांनी अद्याप त्यांचा आयकर परतावा भरलेला नाही, ते आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर (www.incometax.gov.in)- eportal.incometax.gov.in/ वर जाऊन आयटीआर दाखल करू शकतात.

कसा भराल आयकर परतावा? 

बहुतेक लोक आयटीआर फाइल करण्यासाठी सीएची मदत घेतात. पण तुम्ही स्वतः देखील ITR भरू शकता. आयटीआर भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे तुम्हाला काहीशा अडचणी येऊ शकतात. जर तुम्ही पगारदार व्यावसायिक असाल आणि तुमचा पगार 50 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला ITR फॉर्म-1 भरावा लागेल. किंवा शेअर मार्केटमधून तुम्हाला भांडवली नफा किंवा तोटा झाला असेल, तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारचे लाभांश उत्पन्न प्राप्त झालं असेल तर तुम्हाला ITR फॉर्म-2 भरावा लागेल.

घर बसल्या अशा प्रकारे ITR फाइल करा :

  • सर्व प्रथम https://eportal.incometax.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.
  • त्यानंतर यूजर आयडी (User ID) आणि पासवर्ड (Password) टाका.
  • त्यानंतर Continue या पर्यायावर क्लिक करा.
  • फाइल आयकर रिटर्न (File IT Return) पर्यायावर क्लिक करा आणि मूल्यांकन वर्ष निवडा.
  • ऑनलाइन (Online) पर्याय निवडा आणि नंतर वैयक्तिक (Personal) पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर आयटीआर-1 किंवा आयटीआर-4 फॉर्म निवडा.
  • पगार घेणाऱ्या व्यक्तीला ITR 4 फॉर्मची निवड करावी लागेल.
  • रिटर्न फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर, त्यात भरलेल्या प्रकारावर 139(1) निवडा.
  • पुढे, तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल ज्यामध्ये सर्व माहिती भरा.
  • सर्व भरलेल्या माहितीची पडताळणी करा आणि सबमिट करा.
  • फॉर्म सबमिट केल्यानंतर, त्याचा Confirmation मेसेज तुमच्या मेल आयडी आणि मोबाइल नंबरवर येईल.

परतावा मिळाल्यानंतरही ITR मध्ये करू शकता बदल

आयकर विभागाने करचोरी विरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत आयकर रिटर्न भरताना करदात्यांनी आयकर विवरणात त्यांच्या उत्पन्नाची योग्य माहिती दिली पाहिजे याची काळजी घेतली जाते. अनेक वेळा करदाते बँक खात्यातील ठेवींच्या व्याज उत्पन्नाबद्दल योग्य माहिती देऊ शकत नाहीत किंवा चुकीच्या कपातीचा दावा करू शकत नाहीत. जर तुमच्यासोबतही असे घडले असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. इतकेच नाही तर आयकर विभागाकडून कमी परतावा मिळाल्यास त्याविरुद्ध अपील करण्याचीही तरतूद आहे.

सुधारित विवरणपत्र 139(5) अंतर्गत भरा

आयकर कायद्यांतर्गत आयकर रिटर्न भरल्यानंतरही तुम्ही तुमचा आयटीआर पुन्हा दुरुस्त करू शकता. आयकर कायद्याच्या कलम 139(5) अंतर्गत, करदाते सुधारित आयकर रिटर्न भरून आयटीआरमध्ये झालेल्या चुका सुधारू शकतात. या कायद्यानुसार, आयटीआर भरल्यानंतर, जर करदात्याला असे वाटत असेल की त्याने काही बाबी जाहीर केल्या नाहीत अथवा चूक झाली आहे. तर, तो सुधारित आयकर विवरण दाखल करू शकतो. 

प्रोसेसिंग-रिफंड मिळाल्यानंतरही सुधारित आयकर रिटर्न भरण्यास मुभा

करदात्यांना ही दिलासा देणारी बाब आहे की त्यांच्या आयकर रिटर्नवर प्रक्रिया झाली असली तरी ते कलम 139(5) अंतर्गत ऑनलाइन रिव्हाइज रिटर्न भरू शकतात. करदात्याच्या आयटीआरची प्रक्रिया केली गेली आहे आणि त्याला परतावा जारी केला गेला आहे, अशा प्रकरणांमध्ये, रिफंड मिळाल्यानंतरही, आयटीआर दुरुस्त करण्यासाठी करदाता सुधारित रिटर्न दाखल करू शकतो.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget