एक्स्प्लोर

Share Market News :  शेअर बाजारातील घसरण सुरूच; सेन्सेक्स 60,682 अंकावर आणि निफ्टी 17900 अंकांखाली स्थिरावला

Share Market News :  शेअर बाजारात आजही घसरण दिसून आली. गुरुवारी बाजारात किंचीत तेजी दिसली होती. मात्र, आज विक्रीचा जोर दिसून आला.

Share Market News :  भारतीय शेअर बाजारात (Share Market) आजही घसरण कायम राहिली. जागतिक शेअर बाजारात दिसत असलेल्या कमकुवत संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात विक्रीचा सपाटा दिसून आला. आज, सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) दोन्ही निर्देशांकात घसरण दिसून आली. आज, मेटल, आयटी आणि एफएमजीसी सेक्टरमध्ये घसरण दिसून आली. 

आज शेअर बाजारातील व्यवहार थांबल तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 123.52 अंकांच्या घसरणीसह 60,682.70 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 36.95 अंकांच्या घसरणीसह 17,856.50 अंकांवर स्थिरावला. सेन्सेक्समधील 30 पैकी 10 कंपन्यांचे शेअर दर वधारले होते. तर, निफ्टीतील 50 पैकी 23 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 27 कंपन्यांचे शेअर दर घसरले होते. 

तेजी दिसून आलेले शेअर्स 

आज बाजारात टाटा मोटर्स, पॉवरग्रीड, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, एसबीआय, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी, टायटन, मारुती, बजाज फिनसर्व आणि टेक महिंद्रा या कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली.

घसरण झालेले शेअर्स

नेस्ले इंडिया, सन फार्मा, कोटक बँक, अॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, टीसीएस, बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनीलिव्हर, एशियन पेंट्स, एनटीपीसी, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, विप्रो, रिलायन्स, टाटा स्टील, आणि एचसीएल टेक या कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. 

MSCI च्या निर्णयाने अदानींच्या शेअर्सना फटका

मॉर्गन स्टॅनली कॅपिटल इंटरनॅशनल (MSCI) या फर्मने घेतलेल्या एका निर्णयामुळे अदानी समूहाच्या शेअर दरात मोठी घसरण दिसून आली. MSCI ने अदानी समूहातील चार कंपन्यांमधील फ्री फ्लोटची संख्या घटवली आहे. अदानी एंटरप्रायझेस (Adani Enterprises), अदानी टोटल गॅस ( Adani Total Gas), अदानी ट्रान्समिशन (Adani Transmission) आणि ACC या कंपन्यांमधील फ्री फ्लोट्सची संख्या कमी केली आहे. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, अदानी ग्रुपमधील इतर कंपन्यांमधील फ्री फ्लोटची संख्या पूर्वीच प्रमाणे राहणार आहे.  1 मार्च पासून नवीन निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. 

'महिंद्रा अॅण्ड महिंद्रा'ला 1528 कोटी नफा

ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेली महिंद्रा अँड महिंद्राने (M&M) त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले आहेत. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा नफा 13.5 टक्क्यांनी वाढून 1,528 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत M&M चा निव्वळ नफा 1,335 कोटी रुपये होता. कंपनीचा महसूल 21,654 कोटी रुपये झाला आहे. तर गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने 15,349 कोटी रुपयांचा महसूल नोंदवला होता.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget