एक्स्प्लोर

Mumbai Crime Anant Garje: अनंत गर्जेंच्या घरी फॉरेन्सिक टीमची झाडाझडती, गौरी पालवेंनी फास घेतलेल्या पंख्याची उंची अन् वजन मोजलं, नेमकं काय घडलं?

Anant Garje & Gauri Garje Crime: फॉरेन्सिक पथकाकडून अनंत गर्जेंच्या घराची झाडाझडती , गौरी पालवेंनी फास घेतलेल्या पंख्याची उंची अन् वजन मोजलं, रेफ्यूजी एरियाचीही तपासणी

Anant Garje & Gauri Garje Crime: राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे खासगी स्वीय सहायक (पीए) अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे  यांनी शनिवारी मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली होती. गौरी गर्जे (Gauri Palve Garje) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असे सांगितले जात असले तरी त्यांच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर वरळी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. गौरी पालवे यांचे पती अनंत गर्जे यांना रविवारी रात्री 1 वाजता अटक करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी सोमवारी सकाळी अनंत गर्जे (Anant Garje) यांचा सविस्तर जबाब नोंदवला. अनंत गर्जे यांनी आपण इमारतीच्या रेफ्यूजी एरियातून  31 व्या मजल्यावरुन 30व्या मजल्यावरील खिडकीत गेल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्यानंतर खिडकीतून मला गौरीचा लटकलेला मृतदेह दिसला, असेदेखील ते म्हणाले होते. या अनुषंगाने आता मुंबईत पोलिसांचा तपास सुरु आहे. त्यासाठी सोमवारी सायन रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता आणि तज्ञ डॉक्टर राजेश ढेरे यांच्या नेतृत्त्वाखाली एक फॉरेन्सिक पथक अनंत गर्जे राहत असलेल्या वरळी येथील घरी गेले होते. (Mumbai crime news)

फॉरेन्सिक पथकाने अंनंत गर्जे यांच्या घराची कसून तपासणी केली आहे. गौरी पालवे-गर्जे यांनी आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला, यादृष्टीने घरात तपास करण्यात आला. डॉ. राजेश ढेरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आम्ही गौरी पालवे यांनी आत्महत्या केलेल्या घटनास्थळाची पाहणी केली. आत्महत्येची किती शक्यता आहे, याचा तपास केला. गौरी पालवे यांचा मृतदेह ज्या पंख्याला लटकलेला होता त्या सिलिंग पंख्याची उंची आम्ही तपासली. हा पंखा किती वजन घेऊ शकते, हेदेखील आम्ही तपासले. आम्ही आता प्राथमिक अहवाल पोलिसांना देणार आहोत. मात्र, हा मृत्यू अनैसर्गिक आहे, असे डॉ. राजेश ढेरे यांनी सांगितले.

आम्ही तपासाच्यादृष्टीने घरातून आवश्यक असलेले सॅम्पल्स गोळा केले आहेत. हे सगळे सॅम्पल प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. गौरी पालवे गर्जे यांचा मृत्यू गळा आवळून झाला की नाही, याबाबत पोलिसांना विचारण्यात आले. यावर डॉक्टरांनी सांगितले की, गौरी पालवे यांचा मृत्यूचे प्राथमिक कारण 'लिगेचर कम्प्लेशन ऑफ नेक', असे आहे. आता आम्ही पोलीस ठाण्यात चाललो आहोत. तिकडे आम्ही पोलिसांना याबाबत माहिती देऊ, असे डॉक्टरांनी सांगितले.

आणखी वाचा

मुलीच्या अंत्यसंस्काराला गौरीचे वडील पोलिसांसमोर ओक्साबोक्सी रडले, म्हणाले, 'तुमच्या मुली गरीबाला द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका'

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
Cyber Crime : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा AI Deepfake व्हिडीओ, पुण्यातील व्यापाऱ्याला 1 कोटींचा गंडा, अनेकजण बळी
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा AI Deepfake व्हिडीओ, पुण्यातील व्यापाऱ्याला 1 कोटींचा गंडा, अनेकजण बळी
Digital Arrest : आधार-पॅन कार्डचा मनी लॉड्रिंगमध्ये वापर, सुप्रीम कोर्टचे वॉरंट... डिजिटल अरेस्टच्या नावाखाली कोट्यवधी लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
आधार-पॅन कार्डचा मनी लॉड्रिंगमध्ये वापर, सुप्रीम कोर्टचे वॉरंट... डिजिटल अरेस्टच्या नावाखाली कोट्यवधी लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget