एक्स्प्लोर

'तर भिंत फोडणार साहेब' कोल्हापूर विमानतळाला लागून रस्ता बंद झाल्याने तामगावकरांचा आक्रोश; गावकऱ्यांना 20-25 किमी वळसा घालायची पाळी

Kolhapur Airport: गावकऱ्यांना 20-25 किमीचा वळसा घालावा लागत असल्याने विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांची पायपीठ सुरु आहे. प्रशासनाकडून या गावकऱ्यांसोबत कोणीही चर्चा केली नसल्याने ग्रामस्थ अधिकच संतप्त झाले. 

Kolhapur Airport: कोल्हापूर विमानतळ परिसरातील रस्ता खुला करण्यासाठी तामगावचे ग्रामस्थांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत  विमानतळाच्या गेटवर धडक मारत आंदोलन केले. पर्यायी रस्ता करून दिला नाही, तर भिंत पाडून टाकण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला. कोल्हापूर विमानतळाचे विस्तारीकरण झाले त्यावेळी रस्ता विमानतळाच्या हद्दीमध्ये आला. विमानतळ प्रशासनाने हा रस्ता पूर्णपणे बंद करून ठेवला आहे. कुठलाही पर्यायी रस्ता न देता ही भिंत बांधलेली आहे. त्यामुळे गावकऱ्यांना तब्बल 20-25 किमीचा वळसा घालावा लागत असल्याने विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांची मोठी पायपीठ सुरु आहे. प्रशासनाकडून या गावकऱ्यांसोबत कोणीही चर्चा केली नसल्याने ग्रामस्थ अधिकच संतप्त झाले. 

वैमानिकांची गाडी अडवून ठेवली

रस्ता बंद झाल्यामुळे गावकऱ्यांना जवळपास 20 ते 25 किलोमीटरचा वळसा घ्यावा लागत आहे. लहान मुलांना शाळेला जाण्याला त्रास होत असून मुलांना शाळेत ये-जा करण्यासाठी देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आंदोलकांनी विमानतळाच्या गेटवर धडक दिल्यानंतर पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला. पोलिसांनी विमानतळाचा रस्ता कोणत्याही परिस्थितीमध्ये अडवता येणार नाही, अशी भूमिका घेतली. मात्र, गावकऱ्यांनी बॅरिकेड तोडून विमानतळाच्या गेटवर पोहोचले. आंदोलकांनी विमानतळावर ये-जा करणाऱ्या वैमानिकांची गाडी देखील अडवून ठेवली.  इतक्या मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित राहतील याचा अंदाज पोलिसांना देखील आला नव्हता. पोलिसांनी निवेदनाच्या माध्यमातून आंदोलकांचे म्हणणे प्रशासनापर्यंत पोहोचवू अशी भूमिका घेऊन आंदोलन न करण्याची विनंती करत आहेत, मात्र आंदोलक ऐकण्यास तयार नव्हते. 

जोपर्यंत पर्यायी रस्ता देत नाही तोपर्यंत हा रस्ता देखील सुरू करावा, आमचा चालू रस्ता चालू झालाच पाहिजे, विमानतळ प्रशासनाने बांधलेली भिंत तातडीने काढून घ्यावी, कारण कुठलाही पर्यायी रस्ता न देता ही भिंत बांधली असल्याचे गावकरी म्हणाले. त्यांनी जर नाही ऐकलं तर आम्ही बांधलेली भिंत पाडणार आहे, असा गर्भित इशारा दिला. जर तुम्ही आमचा रस्ता अडवत असाल तर आम्ही देखील तुमचा रस्ता अडवू, असा इशाराही दिला. 

इतर महत्वाच्या बातम्या

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget