(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत पाच लाख कोटींची वाढ, या कारणांमुळे सेन्सेक्स 1200 अंकांनी मजबूत
Share Market : बाजाराच्या या तेजीमध्ये बीएसई लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप सुमारे 5 लाख कोटींनी वाढले.
मुंबई: भारतीय शेअर बाजारात आज जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. चांगल्या जागतिक संकेतांदरम्यान सेन्सेक्स आज 1200 हून अधिक अंकांनी मजबूत झाला. त्याचवेळी निफ्टी 17250 च्या जवळ पोहोचला आहे. एका दिवसात गुंतवणूकदारांनी जवळपास पाच लाख कोटींची कमाई केली आहे. बाजारपेठेत चौफेर खरेदी होताना पाहायला मिळाली. बँक असो, फायनान्शिअल असो की आयटी आणि ऑटो असो, प्रत्येक सेगमेंटचे शेअर्सच्या भावात चांगली वाढ झाली.
निफ्टीवर, बँक आणि वित्तीय निर्देशांक सुमारे 2.5 टक्क्यांनी मजबूत झाला आहे, तर मेटल निर्देशांक 3 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. बाजाराच्या या तेजीमध्ये बीएसई लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप सुमारे 5 लाख कोटींनी वाढले. म्हणजेच एका दिवसात गुंतवणूकदारांनी 5 लाख कोटींची कमाई केली आहे.
या कारणांमुळे बाजाराला आधार
यूएनला जगभरातील केंद्रीय बँकांनी चलनविषयक धोरणाचा विचार करण्यास आणि कठोर भूमिका न घेण्यास सांगितले आहे. अशा स्थितीत मध्यवर्ती बँकांच्या दृष्टिकोनात बदल भविष्यात पाहायला मिळू शकतो. या भावनेमुळे आज डॉलरच्या निर्देशांकात 3 अंकांची घट झाली आहे. तर रोखे उत्पन्नही मंद झाले आहे. याशिवाय FIRE च्या खरेदीचा कल मजबूत आहे. अमेरिकेतील उत्पादनाच्या चांगल्या आकडेवारीमुळे देशांतर्गत बाजारालाही जागतिक बाजारातील तेजीचा आधार मिळाला असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे
एफआयआयकडून अर्थात परदेशी गुंतवणूकदारांकडून खरेदी सुरू आहे. एफआयआयने डिसेंबर तिमाहीच्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी 590 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली. तर सप्टेंबरमध्ये 7000 कोटींचा जावक होता. यूएसमध्ये 10 वर्षांचे रोखे उत्पन्न 0.88 टक्क्यांनी कमी होऊन 3.619 टक्क्यांवर आले आहे. तर डॉलर इंडेक्स 114 वरून 112 च्या पातळीवर खाली आला आहे.
देशांतर्गत हेवीवेट स्टॉक्समध्ये खरेदी
हेवीवेट स्टॉक्समध्ये आज चांगली खरेदी झाली. सेन्सेक्सचे सर्व 30 समभागात तेजी दिसली. आजच्या टॉप गेनर्समध्ये INDUSINDBK, LT, TATA STEEL, BAJFINANCE, AXISBANK, SBIN, HDFC, NTPC, ICICIBANK यांचा समावेश आहे. त्याचबरोबर बँक, फायनान्शियल, आयटी, ऑटो, मेटल आणि फार्मा यासह प्रत्येक क्षेत्रात मोठी तेजी आहे.
अमेरिकन बाजार मजबूत
सोमवारी अमेरिकन बाजार मजबूत स्थितीत बंद झाले. डाऊ जोन्स 765.38 अंकांनी म्हणजेच 2.7 टक्क्यांनी वधारला आणि 29,490.89 च्या पातळीवर बंद झाला. S&P 500 निर्देशांक 2.6 टक्क्यांनी वाढून 3,678.43 वर बंद झाला. Nasdaq 2.3 टक्क्यांनी वाढून 10,815.43 च्या पातळीवर बंद झाला.
आशियाई बाजारात खरेदी
आजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारांमध्ये खरेदी दिसून येत आहे. SGX निफ्टी 1.44 टक्क्यांनी वर आहे, तर Nikkei 225 निर्देशांक देखील 2.38 टक्क्यांनी वाढला आहे. स्ट्रेट टाइम्स 0.89 टक्के वाढला आहे, तर हँग सेंग 0.83 टक्के कमकुवत झाला आहे. तैवान वेटेडमध्ये 1.66 टक्के आणि कोस्पीमध्ये 2.22 टक्के वाढ झाली आहे. शांघाय कंपोझिट 0.55 टक्क्यांनी घसरला आहे.