(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bank Holidays in September 2022 : सप्टेंबर महिन्यात 13 दिवस बँका राहणार बंद! ही आहे सुट्ट्यांची यादी
Bank Holidays in September 2022 : सप्टेंबर महिन्यात 13 दिवस बॅंका बंद राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत.
Bank Holidays in September 2022 : ऑगस्ट महिना संपून लवकरच सप्टेंबर (September) महिना सुरु होणार आहे. अशा वेळी, तुमची बॅंकेत काही महत्वाची कामे असतील तर आताच उरकून घ्या. कारण सप्टेंबर महिन्यात 13 दिवस बॅंका बंद (September Bank Holidays) राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत. नुकत्याच, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार सप्टेंबर महिन्यात कोणत्या दिवशी बॅंका बंद (September Bank Holidays) असणार आहेत याची यादी जाहीर केली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या कॅलेंडरनुसार सप्टेंबरमध्ये एकूण 13 दिवस बँक सुट्टी (September Bank Holidays) असेल. राज्य आणि तिथल्या सणानुसार या सुट्ट्या बदलू शकतात. बँक सुट्ट्यांची यादी आरबीआय (RBI) 3 आधारावर जारी करते. ही यादी देशभरात आणि राज्यांमध्ये साजरा केल्या जाणाऱ्या सणांवर आधारित आहे.
सुट्ट्यांची संपूर्ण यादी (Bank Holidays List in September 2022) :
1 सप्टेंबर : गणेश चतुर्थी (दुसरा दिवस) पणजीत बँका बंद
4 सप्टेंबर : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
6 सप्टेंबर : कर्मपूजा (रांचीमध्ये बँका बंद)
7 सप्टेंबर : पहिला ओणम (कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद)
8 सप्टेंबर : थिरुओनम (कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये बँका बंद)
9 सप्टेंबर : इंद्रजात्रा (गंगटोकमध्ये बँक बंद)
10 सप्टेंबर : दुसरा शनिवार, श्री नरवण गुरु जयंती
11 सप्टेंबर : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
18 सप्टेंबर : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
21 सप्टेंबर : श्री नरवणे गुरु समाधी दिन (कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद)
24 सप्टेंबर : चौथा शनिवार
25 सप्टेंबर : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
26 सप्टेंबर : नवरात्री स्थापना (इम्फाळ (मणिपूर) आणि जयपूरमध्ये बँका बंद)
वरील नमूद केलेल्या दिवसांच्या सुट्ट्या रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या सुट्ट्यांनुसार लागू होणार आहेत. या बॅंकेच्या सुट्ट्या असल्या तरी खातेधारकांनी बॅंकेचे काही काम करण्यासाठी नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग वापरू शकतात. तुम्ही या सुट्ट्यांचा मागोवा ठेवल्यास, तुम्ही बँकेच्या व्यवहाराची अधिक चांगल्या पद्धतीने योजना करू शकाल. लाँग वीकेंडसाठी, तुम्ही तुमच्या सुट्ट्यांचे उत्तम नियोजन देखील करू शकता.
महत्वाच्या बातम्या :