Stock Market Opening: शेअर मार्केट तेजीत, सेन्सेक्स शंभर पार, तर निफ्टी 18,066 वर
Stock Market Opening: गुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 190 अंकांच्या वाढीसह 60,847 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 59 अंकांच्या वाढीसह 18102 अंकांवर उघडला.
Stock Market Opening On 5th January 2023: बुधवारच्या घसरणीनंतर आज (गुरुवारी) भारतीय शेअर बाजारातील (Stock Market) व्यवहार तेजीनं सुरू झाले आहेत. BSE सेन्सेक्स 190 अंकांच्या वाढीसह 60,847 वर उघडला. त्यामुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 59 अंकांच्या वाढीसह 18,102 अंकांवर उघडला. मात्र, बाजार सुरू झाल्यानंतर मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. शेअर बाजार तेजीसह उघडल्यानंतर, बाजार काही काळासाठी निच्चांकी पातळीवर गेला आणि काही काळानं पुन्हा तेजीत परतला. बजाजचा फायनॅन्शिअल स्टॉक, बजाज फायनान्स मोठ्या घसरणीसह व्यवहार करत आहे.
बाजारातील सुरुवातीच्या ट्रेडिंग सत्रात हिंदुस्थान युनिलिव्हर, सन फार्मा, नेस्ले इंडिया आणि आयटीसी यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.
बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये घसरण
बजाज फायनान्स 5.76 टक्क्यांनी घसरत असून आता 6,195 रुपयांवर व्यवहार करत आहे. बुधवारी हा शेअर 6571 रुपयांवर बंद झाला होता. केवळ बजाज फायनान्सच नाही तर बजाज फिनसर्व्हमध्येही मोठी घसरण होत आहे. बजाज फिनसर्व्हचा शेअर 3.14 टक्क्यांनी घसरून 1499 रुपयांवर व्यवहार करत आहे.
बाजारातील आजच्या सत्रात बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी, धातू, ऊर्जा, ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्येही तेजी जिसत आहे. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 26 शेअर्स तेजीसह आणि 4 शेअर्समध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 44 शेअर्स वाढीसह आणि 6 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.
कोणते शेअर तेजीत?
आजच्या ट्रेडिंग सत्रात ब्रिटानिया 2.11 टक्के, टाटा कंझ्युमर 1.76 टक्के, बजाज ऑटो 1.44 टक्के, ITC 1.42 टक्के, NTPC 1.41 टक्के, सन फार्मा 1.36 टक्के, BPCL 1.17 टक्के, HUL 1.16 टक्के, नेस्ले 1.10 टक्के, HUL 1.10 टक्के वधारले आहेत.
कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्ह व्यतिरिक्त पॉवर ग्रिड, अपोलो हॉस्पिटल, आयसीआयसीआय बँक यांच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
मोठी बातमी! अॅमेझॉन कंपनी 18 हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना देणार नारळ