एक्स्प्लोर

Stock Market Closing Bell : शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना रडवले, विक्रीच्या सपाट्याने अडीच लाख कोटींचा चुराडा

Closing Bell : शेअर बाजारात आज मोठ्या प्रमाणावर घसरण दिसून आली. बाजारातील विक्रीच्या सपाट्याने गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला

मुंबई :  भारतीय शेअर बाजाराचा (Share Market Closing Bell) आजचा दिवस हा काहीसा निराशाजनक ठरला.  एफएमसीजी, आयटी, बँकिंग सेक्टरमधील शेअर्समध्ये झालेल्या विक्रीच्या सपाट्यामुळे बाजारात मोठी घसरण झाली. आजच्या दिवसात मिड कॅप सेक्टरमध्ये ही घसरण दिसून आली. आज बाजारातील व्यवहार स्थिरावले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) 610 अंकांनी घसरला आणि  65,508 अंकांवर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 193 अंकांच्या घसरणीसह 19,523 अंकांवर बंद झाला.

सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी फक्त  6 कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले.  तर निफ्टीतील 50 कंपन्यांपैकी 6 कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. 

आजच्या दिवसभरात एफएमसीजी सेक्टरच्या शेअर्सची जोरदार विक्री झाली. एफएमसीजी सेक्टरचा निर्देशांक 1000 अंकांच्या घसरणीसह बंद झाला तर निफ्टी आयटी निर्देशांक 715 अंकांनी घसरला. निफ्टी बँक निर्देशांक 287 अंकांनी घसरला आहे. याशिवाय ऑटो, फार्मा, मेटल्स, एनर्जी, ग्राहकोपयोगी वस्तू, ऑईल अॅण्ड गॅस आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील स्टॉक्समध्येही घसरण दिसून आली आहे.  मिड कॅप समभागांसाठी आजचे ट्रेडिंग सत्र निराशाजनक ठरले. मिड कॅप निर्देशांक 536 अंकांनी तर स्मॉल कॅप निर्देशांक 52 अंकांनी घसरून बंद झाला. 

आज दिवसभरातील व्यवहारात लासर्नच्या शेअर दरात 1.51 टक्क्यांची तेजी दिसून आली. पॉवर ग्रीडच्या शेअर दरात 1.20 टक्के, अॅक्सिस बँक 0.61 टक्के, भारती एअरटेल 0.52 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाले. तर, टेक महिंद्राच्या शेअर दरात 4.42 टक्के, एशियन पेंट्समध्ये 4.14  टक्के, विप्रो 2.33 टक्क्यांची घसरण दिसून आली. 

इंडेक्‍स  किती अंकावर बंद दिवसभरातील उच्चांक दिवसभरातील नीचांक किती टक्के बदल
BSE Sensex 65,508.32 66,406.01 65,423.39 -0.92%
BSE SmallCap 37,347.57 37,767.35 37,326.47 -0.34%
India VIX 12.82 13.02 9.40 10.68%
NIFTY Midcap 100 40,104.05 40,766.75 40,051.65 -1.32%
NIFTY Smallcap 100 12,623.75 12,794.80 12,597.35 -0.41%
NIfty smallcap 50 5,810.70 5,915.25 5,798.60 -0.86%
Nifty 100 19,451.65 19,703.35 19,421.25 -1.03%
Nifty 200 10,436.15 10,575.75 10,420.80 -1.08%
Nifty 50 19,523.55 19,766.65 19,492.10 -0.98%

शेअर बाजारात आज मोठ्या प्रमाणात विक्री जोर दिसून आला. त्यामुळे मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल 316.92 लाख कोटी रुपयांवर आले आहे. आधीच्या दिवशी मार्केट कॅप 319.69 लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना 2.77 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

2050 कंपन्यांचे शेअर्स घसरले 

मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या बहुतांशी कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,790 शेअर्सचे व्यवहार झाले. यातील 1,613 शेअर्स तेजीसह बंद झाले. 2,050 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर 127 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. त्याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 202 शेअर्सने आज त्यांचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर 24 कंपन्यांच्या शेअर्सने त्यांच्या नवीन 52 आठवड्यांची नीचांकी पातळी गाठली. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
Varun Dhawan on Rohit Sharma : हिटमॅनने धुतले, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा काटा काढला; वरुण धवनने फक्त दोन शब्दात मीठ चोळले!
हिटमॅनने धुतले, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा काटा काढला; वरुण धवनने फक्त दोन शब्दात मीठ चोळले!
AFG vs BAN :  लढले, रडले अन् भिडले, अफगाणिस्तानकडून बांगलादेशी वाघांची शिकार, टेचात सेमीफायनलमध्ये धडक
राशिद खान अन् नवीन-उल-हकचा धडाका, अफगाणिस्ताननं बांगलादेशला पराभूत करत इतिहास रचला
Rashid Khan : 'तुमची मान अजिबात खाली जाऊ देणार नाही'; राशिद खानने विश्वविक्रमवीरला दिलेला शब्द खरा करून दाखवला
'तुमची मान अजिबात खाली जाऊ देणार नाही'; राशिद खानने विश्वविक्रमवीरला दिलेला शब्द खरा करून दाखवला
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Nilesh Lanke Family : लेकामुळे आज दिल्लीत आलो! निलेश लंके यांच्या आई-वडिलांची भावुक प्रतिक्रियाRahul Gandhi: विरोधक एनडीएच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देतीलABP Majha Headlines : 12 PM : 25 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNeet Paper Leak Racket : नीट परीक्षा घोटाळ्यात रॅकेट कसं काम करायचं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
Varun Dhawan on Rohit Sharma : हिटमॅनने धुतले, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा काटा काढला; वरुण धवनने फक्त दोन शब्दात मीठ चोळले!
हिटमॅनने धुतले, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा काटा काढला; वरुण धवनने फक्त दोन शब्दात मीठ चोळले!
AFG vs BAN :  लढले, रडले अन् भिडले, अफगाणिस्तानकडून बांगलादेशी वाघांची शिकार, टेचात सेमीफायनलमध्ये धडक
राशिद खान अन् नवीन-उल-हकचा धडाका, अफगाणिस्ताननं बांगलादेशला पराभूत करत इतिहास रचला
Rashid Khan : 'तुमची मान अजिबात खाली जाऊ देणार नाही'; राशिद खानने विश्वविक्रमवीरला दिलेला शब्द खरा करून दाखवला
'तुमची मान अजिबात खाली जाऊ देणार नाही'; राशिद खानने विश्वविक्रमवीरला दिलेला शब्द खरा करून दाखवला
Nilesh Lanke: आय निलेश ज्ञानदेव लंके.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ
I Nilesh Dnyandev Lanke.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीचा शपथ
Premachi Goshta Serial Update : मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
Rohit Sharma, Rarshid Khan : सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
Embed widget