एक्स्प्लोर

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भडका? तेल निर्यातदार देशांकडून दिवसाला 10 लाख बॅरेल्सनं उत्पादन कमी करण्याचा निर्णय

Saudi Arabia Crude Oil Production Cut: काल सौदी अरेबिया आणि अनेक तेल उत्पादक देशांनी तेल उत्पादनात मोठी कपात करण्याची घोषणा केली. त्याचा परिणाम लगेच दिसून आले आहेत. आज कच्च्या तेलाच्या किमतींत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Saudi Arabia Crude Oil Production Cut: जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर (Crude Oil) वाढण्याची शक्यता आहे. कारण तेल उत्पादक देशांनी तेलाचं उत्पादन दिवसाला तब्बल 10 लाख बॅरेलनं कमी करण्याता निर्णय घेतला आहे. यामध्ये ओपेकसह रशिया-पुरस्कृत ओपेक-प्लस या संघटनेचा देखील समावेश आहे. बाजारात स्थैर्य यावं यासाठी आम्ही उत्पादन कमी करतोय, असं ओपेकनं म्हटलं आहे. तरी यामागचं खरं कराण वेगळं आहे. तेलाचे भाव वाढावेत, ज्यामुळे आपला नफा वाढेल, असा विचार आखाती देशांनी केला आहे. कारण कोरोनाकाळ संपल्यावर तेलाच्या मागणीत सातत्यानं वाढच होत आहे. त्यात उत्पन्न कमी करण्याची काहीच गरज नाही. मात्र नफा वाढवण्याठी ओपेकनं उत्पादन कमी केलंय, असं तज्ज्ञ सांगत आहेत.

कच्च्या तेलाच्या किमती आज उच्चांकी पातळी गाठण्याची शक्यता आहे. वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI Crude) क्रूड आज 8 टक्क्यांहून अधिक वाढले आहे. सौदी अरेबियानं (Saudi Arabia) म्हटलं आहे की, ते मे महिन्यापासून 2023 अखेरपर्यंत तेल उत्पादनात (Oil Production Cut) दररोज पाच लाख बॅरलनं कपात करणार आहे. तसेच, सौदी अरेबियासह, इराणसारख्या इतर काही तेल उत्पादक देशांनीही तेल उत्पादनात एकूण 1.15 दशलक्ष बॅरल कपात करण्याची घोषणा केली आहे. तेल उत्पादक देशांनी उचललेल्या या पावलांमुळे आज तेलाच्या किमतींत जोरदार वाढ होताना दिसत आहे. 

आज कच्चं तेल महागलं

सौदी अरेबियासह अनेक देशांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे जागतिक तेल बाजारात चांगलीच चलबिचल दिसून येत आहे. आज त्याचाच परिणाम तेलाच्या वाढत्या किमतींच्या रूपात दिसून येत आहे. या पावलाचं आणखी अनेक नकारात्मक परिणाम येत्या काळात दिसून येतील, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतींत जोरदार वाढ दिसून येते. सौदी अरेबियानं तेल बाजार स्थिर करण्याच्या उद्देशानं उचललेलं हे 'सावधगिरीचं पाऊल' असं म्हटलं असलं तरी यानंतर रियाध आणि अमेरिका यांच्यातील संबंधांमध्ये आणखी तणाव निर्माण होऊ शकतो. आधीच युक्रेन-रशिया युद्धामुळे संपूर्ण जगाला महागाईचा सामना करावा लागत आहे आणि आता तेल उत्पादनात घट झाल्यामुळे जागतिक चलनवाढीचा दर आणखी वाढण्याचा धोका आहे.

भारतावर काय परिणाम होणार? पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार?

सौदी अरेबिया आणि इतर तेल उत्पादकांनी तेल उत्पादनात एकूण 1.15 दशलक्ष बॅरल कपातीची घोषणा केली आहे आणि यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होणार आहे. त्याचा नकारात्मक परिणाम भारतावरही दिसू शकतो. पेट्रोल आणि डिझेलसारख्या तेल उत्पादनांच्या किमतींत वाढ होऊ शकते. भारतात पेट्रोल आणि डिझेलसाठी कच्च्या तेलाची उपलब्धता बहुतेक आयातीद्वारे भागविली जाते आणि महाग तेलामुळे देशाचे आयात बिल वाढेल, महागाई दर वाढेल आणि देशाची व्यापार तूटही वाढू शकते. महागाई कमी करण्याच्या प्रयत्नात असलेली देशाची मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देखील व्याजदरात वाढ करू शकते. 

जागतिक अर्थव्यवस्थेवर काय परिणाम?

तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसून येईल कारण सौदी अरेबिया आणि इतर तेल उत्पादकांच्या या निर्णयामुळे युक्रेनशी एक वर्षाहून अधिक काळ युद्ध सुरू असलेल्या रशियाला पाठिंबा मिळणार आहे. या तेल उत्पादनातील कपातीमुळे अमेरिका आणि इतर देशांना कच्च्या तेलासाठी आणि पेट्रोल-डिझेलसाठी अधिक खर्च करावा लागणार आहे. जागतिक आर्थिक मंदी आणि उच्च महागाईच्या काळात हा निर्णय या देशांना तोट्याचा पडू शकतो. 

सौदी अरेबियाचं म्हणणं काय? 

सौदी अरेबियाच्या ऊर्जामंत्र्यांनी रविवारी सांगितलं की, काही ओपेक आणि गैर-ओपेक सदस्यांच्या समन्वयानं उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला जाईल. मात्र, त्यांनी कोणाचंही नाव घेतलं नाही. ही कपात गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जाहीर केलेल्या कपातीच्या व्यतिरिक्त असेल. सौदी अरेबिया आणि इतर ओपेक सदस्यांनी गेल्या वर्षी तेल उत्पादनात घट करून अमेरिकन सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी अमेरिकेत मध्यावधी निवडणुका होणार होत्या आणि महागाई हा निवडणुकीचा मुख्य मुद्दा होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bachchu Kadu On MVA Mahavikas Aghadi :युती आघाडीकडून फोन आले, बच्चू कडूंची माहितीVinod Tawade Update : माझी बदनामी करणाऱ्या नेत्यांना कायदेशीर नोटीस पाठवली - विनोद तावडेElection Commission : पहिला कल 8.40 वाजता कळणार, निवडणूक अधिकाऱ्यांची माहितीMahadev Jankar On Vidhansabha Result : सत्तेत येणाऱ्या पक्षासह राहणार, जानकरांचा निर्धार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
Embed widget