एक्स्प्लोर

RBI MPC Meeting: 'मी महाभारतातील संजय नाही', ट्रम्प टॅरिफवर आरबीआयचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा असं का म्हणाले? 

RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांनी आज आर्थिक वर्ष 2025-26 या आर्थिक वर्षातील पहिलं पतधोरण जाहीर केलं. रेपो रेट आता 6.00 टक्क्यांवर आला आहे.  

RBI MPC Meeting  मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांनी आज एप्रिल ते जून या तिमाहीसाठी पतधोरण जाहीर केलं. संजय म्हलोत्रा यांनी रेपो रेट 25 बेसिस पॉईंटनं कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं रेपो रेट 6.00 टक्क्यांवर आला असून यामुळं गृहकर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. रेपो रेट जाहीर केल्यानंतर संजय म्हलोत्रा यांनी ट्रम्प टॅरिफमुळं जागतिक आर्थिक अनिश्चितता निर्माण झाली आहे. पुढं ते म्हणाले की "मी संजय आहे मात्र महाभारतातील संजय नाही"  

संजय म्हलोत्रा यांनी सलग दुसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कपात केली. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या तिमाहीसाठी रेपो रेटमध्ये कपात केली होती. रेपो रेट 6.50 टक्क्यांवरुन 6.25 टक्क्यांवर आणला होता. आता एप्रिल ते जून या तिमाहीसाठी रेपो रेट 25 बेसिस पॉईंटनं कपात करत 6 टक्के करण्यात आला आहे. समायोजनात्कम दृष्टिकोनाचा उद्देश हा आहे की  केंद्रीय बँक सध्याची स्थिती कायम ठेवेल किंवा आगामी पतधोरण विषयक समितीच्या बैठकीत रेपो रेट कमी करण्यासंदर्भात निर्णय घेईल.  

मी महाभारतातील संजय नाही

जागतिक परिस्थिती पाहता दिलासा देण्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न केले जातील. तुम्हाला माहिती आहे किती सूट दिली गेली आहे. सरकारनं त्यांच्या बाजूनं पूर्ण प्रयत्न केले आहेत. तुम्ही आताच्या बजेटमध्ये पाहिलं असेल, सर्व पावलं उचलण्यात आली आहे. ज्यामध्ये करामध्ये सूट असेल किंवा वैयक्तिक प्राप्तिकरातील सूट असेल. संजय म्हलोत्रा पुढं म्हणाले, आम्ही रेपो रेटमध्ये कपात केली आहे. आम्ही आमचा दृष्टिकोन बदलला आहे.  याचा अर्थ असा की रेपो रेटच्या धोरणामध्ये कोणताही बदल करण्यात किंवा कपात करण्यात आली नाही. ही स्थिती कुठपर्यंत जाईल माहिती नाही. मी संजय आहे मात्र महाभारतातील संजय नाही जो दूरपर्यंत घेऊन जाऊ शकेल. आपल्याकडे त्यांच्यासारखी दूरदृष्टी नाही, असं संजय म्हलोत्रा म्हणाले.  

GDP वाढीचा अंदाज घटवला

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नं भारताच्या आर्थिक वर्ष 2025-26 मधील जीडीपीच्या वाढीचा अंदाज 6.7 टक्क्यांवरुन घटवून 6.5 टक्के केला आहे. केंद्रीय बँकेनं टॅरिफ वॉर सारख्या समस्यांमुळं निर्माण होणाऱ्या अनिश्चिततांचा दाखला देखील दिला आहे. ते म्हणाले टॅरिफ संदर्भातील पावलांमुळं आर्थिक अनिश्चितता आणि महागाईची भीती निर्माण झाली आहे. आरबीआयचे गव्हर्नर पुढं म्हणाले की पतधोरण देशांतर्गत विकासाला पाहून ठरवलं जाईल. ज्यामुळं विकासाच्या वेगाला मदत मिळेल. याशिवाय महागाईबाबत सतर्क राहावं लागेल, असं म्हलोत्रा म्हणाले.  

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

वाशिम जिल्ह्यात डिझेलची टंचाई, डिझेल मिळवण्याच्या कारणावरुन ग्राहकांची तुंबळ हाणामारी 
वाशिम जिल्ह्यात डिझेलची टंचाई, डिझेल मिळवण्याच्या कारणावरुन ग्राहकांची तुंबळ हाणामारी 
SIP तून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना काय दक्षता घ्यावी? नुकसान टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात?
SIP तून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना काय दक्षता घ्यावी? नुकसान टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात?
'या' योजनेत करा गुंतवणूक, प्रत्येक तिमाहीत मिळवा 61 हजार 500 रुपयांचे व्याज, जाणून घ्या सविस्तर माहिती 
'या' योजनेत करा गुंतवणूक, प्रत्येक तिमाहीत मिळवा 61 हजार 500 रुपयांचे व्याज, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत न्यायमूर्तींची गरज नाही' केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
'मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत न्यायमूर्तींची गरज नाही' केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
तिरुवनंतपुरम-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसच्या दोन बोगीमध्ये भीषण अग्नितांडव; अवघ्या 15 मिनिटात 68 प्रवाशांना बाहेर काढल्याने जिवितहानी टळली
तिरुवनंतपुरम-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसच्या दोन बोगीमध्ये भीषण अग्नितांडव; अवघ्या 15 मिनिटात 68 प्रवाशांना बाहेर काढल्याने जिवितहानी टळली
NEET Exam Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात 'टेलिग्राम'चा सर्वाधिक वापर, शुभम खैरनारनंतर आता नाशिकमधील बडे क्लासचालक अडकणार CBI चौकशीच्या फेऱ्यात
नीट पेपरफुटी प्रकरणात 'टेलिग्राम'चा सर्वाधिक वापर, शुभम खैरनारनंतर आता नाशिकमधील बडे क्लासचालक अडकणार CBI चौकशीच्या फेऱ्यात
Mumbai Crime news: मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
Rohit Pawar: दोन बड्या नेत्यांनी अजितदादांबाबत खालच्या दर्जाची भाषा वापरली, सुनेत्रा पवार अन् पार्थ पवारांनी 'ती' ऑडिओ क्लीप ऐकलेय: रोहित पवार
दोन बड्या नेत्यांनी अजितदादांबाबत खालच्या दर्जाची भाषा वापरली, सुनेत्रा पवार अन् पार्थ पवारांनी 'ती' ऑडिओ क्लीप ऐकलेय: रोहित पवार
Ankita Walawalkar Cannes: 'कोकण हार्टेड गर्ल'ची कान्सवारी चर्चेत; अंकिता वालावलकर पोस्ट शेअर करत म्हणाली ' माझ्या मराठीचं ..'
'कोकण हार्टेड गर्ल'ची कान्सवारी चर्चेत; अंकिता वालावलकर पोस्ट शेअर करत म्हणाली ' माझ्या मराठीचं ..'
अंग थंड पडलं, इंजेक्शन आणण्यास काही सेकंदांचा उशीर अन्..‘शोले’ फेम अमजद खान यांच्या मृत्यूच्या रात्री काय घडलेलं?
अंग थंड पडलं, इंजेक्शन आणण्यास काही सेकंदांचा उशीर अन्..‘शोले’ फेम अमजद खान यांच्या मृत्यूच्या रात्री काय घडलेलं?
PM Modi Netherlands Visit: पंतप्रधान मोदींच्या नेदरलँडमध्ये दौऱ्यात सेमीकंडक्टरसंदर्भात ऐतिहासिक करारा; भरातला 100 वर्षांनंतर परत दिला 11व्या शतकातील अमूल्य वारसा
पंतप्रधान मोदींच्या नेदरलँडमध्ये दौऱ्यात सेमीकंडक्टरसंदर्भात ऐतिहासिक करारा; 11व्या शतकातील अमूल्य वारसाही भारतात परतणार
Embed widget