एक्स्प्लोर

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेचा अर्ज सादर करण्यास मुदतवाढ मिळण्याची शक्यता, 2 कोटी 40 लाख महिलांच्या अर्जांना मंजुरी

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवली जाण्याची शक्यता आहे.

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत वाढवण्यात आली होती. आता  राज्य  सरकारकडून पुन्हा एकदा मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिनाअखेरपर्यंत मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 2 कोटी 40 लाख महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे. ही आकडेवारी 24 सप्टेंबरपर्यंतची आहे. अधिकाअधिक महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रानं दिलं आहे. 

राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालवली जाते. आतापर्यंत या योजनेसाठी 2.5 कोटी अर्ज दाखल झाले असून त्यापैकी 2 कोटी 40  लाख अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. महिला व बालविकास विभागाकडून विविध ठिकाणी राबवण्यात आलेल्या विशेष शिबिरांमुळं अर्जांच्या संख्येत वाढ झाली आहे, अशी माहिती आहे. 

पुणे जिल्ह्यात 18 लाख महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यात 14 लाख, ठाणे आणि नागपूर जिल्ह्यात 10 लाख अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र सरकारनं जुलै महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केलेली आहे. या योजनेनुसार 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. मात्र, यासाठी संबंधित महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. महाराष्ट्र सरकारनं पुरवणी अर्थसंकल्प मांडला त्यामध्ये या योजनेसाठी 46 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरला आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज सादर करण्याची पहिली अंतिम मुदत 31 ऑगस्टपर्यंत होती. मात्र,त्यानंतर सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारनं लाडली बहना योजना सुरु केली होती त्याचा त्यांना पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी फायदा झाला होता. 

29 सप्टेंबरला तिसरा हप्ता जमा होणार 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. महिलांना 17 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला अनुक्रमे पुणे आणि नागपूरमध्ये कार्यक्रम घेऊन पैसे वितरित करण्यात आले होते. आता 29 सप्टेंबरला रायगड जिल्ह्यात मेळावा आयोजित करुन महिलांच्या खात्यात पैसे पाठवले जाणार आहेत, अशी माहिती आहे. 

इतर बातम्या : 

Ladki Bahin Yojana : सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना मेसेज आले,अर्ज मंजूर झाले, लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता लवकरच

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Yashomati Thakur on Alhad Kaloti: फडणवीसांकडून गुंडागर्दी, दमदाटीमुळेच मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ बिनविरोध; यशोमती ठाकूरांनी सांगितलं राज'कारण'
फडणवीसांकडून गुंडागर्दी, दमदाटीमुळेच मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ बिनविरोध; यशोमती ठाकूरांनी सांगितलं राज'कारण'
DK Shivkumar: 'मी या पदावर कायम राहू शकत नाही' काँग्रेसच्या पराभवाची मालिका थांबेना अन् आता कर्नाटकमध्ये डीके शिवकुमारांच्या वक्तव्यांनी भूवया उंचावल्या!
'मी या पदावर कायम राहू शकत नाही' काँग्रेसच्या पराभवाची मालिका थांबेना अन् आता कर्नाटकमध्ये डीके शिवकुमारांच्या वक्तव्यांनी भूवया उंचावल्या!
राज्यपालांनी विधानसभेतील मंजूर विधेयकांना विलंब करू नयेत, दिलेली डेडलाईन हटवली; सुप्रीम कोर्टाच्या संविधान पीठाने निर्णय बदलला
राज्यपालांनी विधानसभेतील मंजूर विधेयकांना विलंब करू नयेत, दिलेली डेडलाईन हटवली; सुप्रीम कोर्टाच्या संविधान पीठाने निर्णय बदलला
मुख्यमंत्र्यांपुढे ठरलं तरीही फोडाफोडी सुरूच; शिवसेनेनं भाजपचा उमेदवार फोडला, नगरसेवकपदाचा अर्ज मागे
मुख्यमंत्र्यांपुढे ठरलं तरीही फोडाफोडी सुरूच; शिवसेनेनं भाजपचा उमेदवार फोडला, नगरसेवकपदाचा अर्ज मागे
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jaykumar Gore : नगरपालिका निवडणुकीनंतर उरलेले नेतेही भाजपात येण्यासाठी धडपडतील
Bihar CM Nitish Kumar Oath मै सत्यनिष्ठा से... बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारंचा शपथविधी
PM kisan Nidhi 21st Installment : शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांना लाभ
Chitra Wagh on Malegaon Dongarale : त्या हरामखोर सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता
Kagal Alliance : जुने वैरी, नवी यारी! घाटगे विरुद्ध मुश्रीफ संघर्षाचा इतिहास Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yashomati Thakur on Alhad Kaloti: फडणवीसांकडून गुंडागर्दी, दमदाटीमुळेच मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ बिनविरोध; यशोमती ठाकूरांनी सांगितलं राज'कारण'
फडणवीसांकडून गुंडागर्दी, दमदाटीमुळेच मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ बिनविरोध; यशोमती ठाकूरांनी सांगितलं राज'कारण'
DK Shivkumar: 'मी या पदावर कायम राहू शकत नाही' काँग्रेसच्या पराभवाची मालिका थांबेना अन् आता कर्नाटकमध्ये डीके शिवकुमारांच्या वक्तव्यांनी भूवया उंचावल्या!
'मी या पदावर कायम राहू शकत नाही' काँग्रेसच्या पराभवाची मालिका थांबेना अन् आता कर्नाटकमध्ये डीके शिवकुमारांच्या वक्तव्यांनी भूवया उंचावल्या!
राज्यपालांनी विधानसभेतील मंजूर विधेयकांना विलंब करू नयेत, दिलेली डेडलाईन हटवली; सुप्रीम कोर्टाच्या संविधान पीठाने निर्णय बदलला
राज्यपालांनी विधानसभेतील मंजूर विधेयकांना विलंब करू नयेत, दिलेली डेडलाईन हटवली; सुप्रीम कोर्टाच्या संविधान पीठाने निर्णय बदलला
मुख्यमंत्र्यांपुढे ठरलं तरीही फोडाफोडी सुरूच; शिवसेनेनं भाजपचा उमेदवार फोडला, नगरसेवकपदाचा अर्ज मागे
मुख्यमंत्र्यांपुढे ठरलं तरीही फोडाफोडी सुरूच; शिवसेनेनं भाजपचा उमेदवार फोडला, नगरसेवकपदाचा अर्ज मागे
मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ नगरपरिषदेत बिनविरोध, रवी राणांचा थेट फोन; देवेंद्र फडणवीस म्हणाले अभिनंदन
मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ नगरपरिषदेत बिनविरोध, रवी राणांचा थेट फोन; देवेंद्र फडणवीस म्हणाले अभिनंदन
गुंडांना जामीन अन् नेत्यांना जमीन; पुण्यातील व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांचा गृहमंत्र्यांना सवाल
गुंडांना जामीन अन् नेत्यांना जमीन; पुण्यातील व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांचा गृहमंत्र्यांना सवाल
Shaurya Patil: माझ्या मुलाला पण असाच त्रास, मी माझ्या मुलाला घेऊन जीवन संपवण्याचा विचार केला; शौर्य पाटीलच्या शाळेतील पालकांचा शिक्षकांवर सनसनाटी आरोप
माझ्या मुलाला पण असाच त्रास, मी माझ्या मुलाला घेऊन जीवन संपवण्याचा विचार केला; शौर्य पाटीलच्या शाळेतील पालकांचा शिक्षकांवर सनसनाटी आरोप
Kalyan Crime News: ट्रेनमध्ये धक्का लागताच हिंदी-मराठी बोलण्यावरुन वाद; 4-5 जणांकडून मारहाण, कल्याणमधील अर्णव खैरेने घरी येऊन जीवन संपवलं!
ट्रेनमध्ये धक्का लागताच हिंदी-मराठी बोलण्यावरुन वाद; 4-5 जणांकडून मारहाण, कल्याणमधील अर्णव खैरेने घरी येऊन जीवन संपवलं!
Embed widget