एक्स्प्लोर

मोठी बातमी! ना मस्क, ना बेजोस 'हा' आहे जगातील श्रीमंत व्यक्ती, संपत्ती एकूण व्हाल थक्क

Richest Person : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर झालीय. यामध्ये ना एलन मस्क, ना जेफ बेजोस सर्वात श्रीमंत आहेत, तर फ्रेंच उद्योगपती हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. ब

Richest Person in the World: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर झालीय. यामध्ये ना एलन मस्क, ना जेफ बेजोस सर्वात श्रीमंत आहेत, तर फ्रेंच उद्योगपती हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. बर्नार्ड अरनॉल्ट (Bernard Arnault) असं त्यांचं नाव आहे. तीन दिवसांत तिसऱ्यांदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची नावे बदलली आहेत. तीन दिवसांपूर्वीपर्यंत, एलन मस्क प्रथम होते, मात्र, एक दिवसापूर्वी जेफ बेजोस यांनी मस्कला मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. आता मस्क आणि बेजोस या दोघांनाही मागे टाकून अरनॉल्ट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. 

जगातील सर्वात श्रीमंत होण्याचा विक्रम ज्या व्यक्तीच्या नावावर आहे ते फ्रान्सचे बर्नार्ड अरनॉल्ट आहे. लुई व्हिटॉन (LMVH) सारख्या लक्झरी ब्रँडचे मालक बर्नार्ड अरनॉल्ट यांची एकूण संपत्ती सध्या जगात सर्वाधिक आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकावर बर्नार्ड अरनॉल्टची एकूण संपत्ती आता 197 अब्ज डॉलर इतकी आहे. जी जगातील इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा जास्त आहे.

जेफ बेजोस 196 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर 

जेफ बेजोस हे 196 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. प्रदीर्घ काळ पहिल्या स्थानावर राहिलेल्या एलन मस्कची आता तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. ब्लूमबर्गच्या निर्देशांकानुसार एलन मस्कची एकूण संपत्ती सध्या 189 अब्ज डॉलर आहे. या निर्देशांकानुसार, हे अनेक वर्षांनंतर घडले आहे. जगातील कोणत्याही श्रीमंत व्यक्तीची संपत्ती 200 अब्ज डॉलर्स नाही.

फोर्ब्सची रिअलटाइम इंडेक्सवर वेगळं चित्र

फोर्ब्सच्या रिअलटाइम इंडेक्सवर चित्र थोडे वेगळे आहे. या यादीत बर्नार्ड अरनॉल्ट देखील पहिल्या स्थानावर आहे, परंतु त्यांची एकूण संपत्ती 227.6 अब्ज डॉलर्स असल्याचे सांगितले जाते. एलन मस्क या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांची संपत्ती 195.8 अब्ज डॉलर आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार, जेफ बेजोस यांची संपत्ती 194.6 अब्ज डॉलर आहे आणि ते जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

श्रीमंतांमध्ये अमेरिकेचा दबदबा 

जगातील अव्वल श्रीमंतांच्या यादीत अजूनही अमेरिकेचे वर्चस्व आहे. फोर्ब्स आणि ब्लूमबर्ग या दोन्हींच्या टॉप-5 श्रीमंतांच्या यादीत अमेरिकेबाहेरील एकच नाव आहे. बर्नार्ड अरनॉल्ट वगळता इतर चार श्रीमंत लोक अमेरिकेतील आहेत. भारतासह आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी 117.1 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह फोर्ब्सच्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 9व्या क्रमांकावर आहेत. ब्लूमबर्ग यादीत, ते 114 अब्ज डॉलर्ससह 11 व्या स्थानावर आहे.

महत्वाच्या बातम्या:

Anant-Radhika Pre-Wedding: जगात श्रीमंत असलेल्या अंबानींच्या घरी आहे 'हा' डॉन, राधिका - अनंतच्या प्री वेडिंगमधला हा व्हिडिओ पाहिलात का?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump: अवघं जग गॅसवर असताना ट्रम्पकडून 'तोंडपाटीलकी'ने शेअर बाजारात 'आंबा' पाडण्याचा राजरोस उद्योग! अचानक वाढीमुळे इनसायडर ट्रेडिंगचा संशय
अवघं जग गॅसवर असताना ट्रम्पकडून 'तोंडपाटीलकी'ने शेअर बाजारात 'आंबा' पाडण्याचा राजरोस उद्योग! अचानक वाढीमुळे इनसायडर ट्रेडिंगचा संशय
Cibil Score : खराब सिबिल स्कोअरमुळं कर्ज मंजूर होईना? सिबिल स्कोअर 800  च्या पार कसा पोहोचवणार?
Cibil Score : खराब सिबिल स्कोअरमुळं कर्ज मंजूर होईना? सिबिल स्कोअर 800  च्या पार कसा पोहोचवणार?
Good Loan vs Bad Loan :  सर्व कर्ज वाईट असतात का? चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज यातील फरक कसा ओळखावा? वाईट कर्जातून बाहेर कसं पडायचं?
सर्व कर्ज वाईट असतात का? चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज यातील फरक कसा ओळखावा? वाईट कर्जातून बाहेर कसं पडायचं?
Home Loan : 50 लाख रुपयांचं गृहकर्ज घेतल्यानंतर परतफेड करताना व्याजाचे 13 लाख कसे वाचवायचे? जाणून घ्या फॉर्म्युला
50 लाख रुपयांचं गृहकर्ज घेतल्यानंतर परतफेड करताना व्याजाचे 13 लाख कसे वाचवायचे? जाणून घ्या फॉर्म्युला

व्हिडीओ

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या वाट्याला 6 जागा, इच्छूकांची फिल्डिंग, ही 12 नावं रेसमध्ये, कोणाला उमेदवारी मिळणार
US- Iran Ceasefire: अमेरिका आणि इराणच्या युद्धविरामात वाढ; पुन्हा पाकिस्तानची मध्यस्थी; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
Devendra Fadnavis and Sunetra Pawar: मी 35 वर्षांपासून राजकारणात, समोरच्या नेत्याची क्षमता ओळखतो; सुनेत्रा पवार केवळ पहिल्या उपमुख्यमंत्री नाही तर.... देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis vs Supriya Sule : वादविवादाचं टेबल राजकीय 'लेव्हल' Special Report
Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis : ठाकरेंच्या कोट्या, भाजपची चर्चा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump: अवघं जग गॅसवर असताना ट्रम्पकडून 'तोंडपाटीलकी'ने शेअर बाजारात 'आंबा' पाडण्याचा राजरोस उद्योग! अचानक वाढीमुळे इनसायडर ट्रेडिंगचा संशय
अवघं जग गॅसवर असताना ट्रम्पकडून 'तोंडपाटीलकी'ने शेअर बाजारात 'आंबा' पाडण्याचा राजरोस उद्योग! अचानक वाढीमुळे इनसायडर ट्रेडिंगचा संशय
Gokul Election: गोकुळमध्ये भाजप सोडून मित्रपक्षाच्या पॅनेलसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्या, राष्ट्रवादीची मुश्रीफांकडे मागणी; भाजप, शिवसेना सोडून आणि कोणी मित्र आहेत का? भाजपचा खोचक सवाल!
गोकुळमध्ये भाजप सोडून मित्रपक्षाच्या पॅनेलसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्या, राष्ट्रवादीची मुश्रीफांकडे मागणी; भाजप, शिवसेना सोडून आणि कोणी मित्र आहेत का? भाजपचा खोचक सवाल!
El Nino Effect: राज्यावर एल निनोच्या संकटांचे ढग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून महत्वाच्या सूचना, अवकाळीनेही पुन्हा झोडपलं,अस्मानी संकटानं बळीराजाच्या तोंडचा घास हिरावला
राज्यावर एल निनोच्या संकटांचे ढग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून महत्वाच्या सूचना, अवकाळी पावसानेही पुन्हा झोडपलं,अस्मानी संकटानं बळीराजाच्या तोंडचा घास हिरावला
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: भाजपपासून, शिवसेना, राष्ट्रवादीपर्यंत...विधान परिषदेच्या 10 जागांसाठी कुणाकुणाची नावं चर्चेत; संपूर्ण यादी!
भाजपपासून, शिवसेना, राष्ट्रवादीपर्यंत...विधान परिषदेच्या 10 जागांसाठी कुणाकुणाची नावं चर्चेत; संपूर्ण यादी!
Shefali Bagga On Dating Rumors With Yuzvendra Chahal: युझवेंद्र चहलसोबत रिलेशनशिपच्या चर्चा; पण 'बिग बॉस' फेम अभिनेत्री म्हणतेय, 'मला विराट कोहलीसारखाच पार्टनर हवा...'
युझवेंद्र चहलसोबत रिलेशनशिपच्या चर्चा; पण 'बिग बॉस' फेम अभिनेत्री म्हणतेय, 'मला विराट कोहलीसारखाच पार्टनर हवा...'
Pritam Munde BJP: माजी खासदार प्रीतम मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन, भाजपने सोपवली महत्त्वाची जबाबदारी
माजी खासदार प्रीतम मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन, भाजपने सोपवली महत्त्वाची जबाबदारी
Ambernath Crime : नामांकित कंपनीतील बॉसकडून सतत मानसिक छळ, भेटीनंतर हॉटेलमध्येच तरुणीचं टोकाचं पाऊल; अंबरनाथच्या बड्या व्यावसायिकाविरोधात अखेर गुन्हा दाखल
नामांकित कंपनीतील बॉसकडून सतत मानसिक छळ, भेटीनंतर हॉटेलमध्येच तरुणीचं टोकाचं पाऊल; अंबरनाथच्या बड्या व्यावसायिकाविरोधात अखेर गुन्हा दाखल
US- Iran Ceasefire: डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतची शस्त्रसंधी वाढवली; अमेरिकेच्या निर्णयामागील हादरवणारं कारण, नेमकं काय घडलं?
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतची शस्त्रसंधी वाढवली; अमेरिकेच्या निर्णयामागील हादरवणारं कारण, नेमकं काय घडलं?
Embed widget