एक्स्प्लोर

ATM मधून पैसे काढणं महागणार? आरबीआय मोठ्या निर्णयाच्या तयारीत, बँक खातेदारांना फटका बसणार

ATM Cash Withdrawal :रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. एटीएम कार्डच्या वापरासाठी आकारण्यात येणारी इंटरचेंज फी वाढवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

ATM Cash Withdrawal : एटीएम कार्डचा वापर करुन खात्यातून पैसे काढणं महागण्याची शक्यता आहे. एटीएमचा वापर करुन पाचवेळा पैसे काढणं मोफतं आहे. त्यानंतरच्या व्यवहारांवर लागणारं शुल्क आणि एटीएम इंटरचेंजचं शुल्क वाढवण्याच्या तयारीत आरबीआय असल्याची माहिती आहे. हिंदू बिझनेस लाईनच्या रिपोर्टनुसार मंगळावारी यासंदर्भात माहिती देण्यात आली. म्हणजेच बँक खातेदारांना एटीएममधून पैसे काढल्यास अतिरिक्त पैसे मोजावे लागतील.  

शुल्क किती वाढणार?

प्रस्तावित शुल्क किती वाटेल यासंदर्भातील माहिती देखील मसोर आली आहे. भारतीय राष्ट्रीय पेमेंटस कॉर्पोरेशननं पाच मोफत व्यवहारांची मर्यादा ओलांडल्यानंतर जे शुल्क आकारलं जातं ते 21 रुपयांवरुन 22 रुपये करण्याची शिफारस केली आहे. एनपीसीआयनं या क्षेत्रातील स्टेक होल्डर्स सोबत चर्चा केल्यानंतर एटीएम इंटरचेंज फी 17 रुपयांवरुन 19 रुपये करण्याची शिफारस केली आहे.  

इंटरचेंज फी एखाद्या खातेदारानं दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून विशिष्ट मर्यादेपेक्षा अधिकवेळा रक्कम काढल्यास आकारलं जातं.एटीएम सेवा वापरल्यानंतर एका बँकेकडून दुसऱ्या बँकेला दिली जाणारी रक्कम आहे. एटीएममधून पैसे काढल्यानंतरच्या बिलावर देखील त्याचा उल्लेख असतो.  

रिपोर्टनुसार बँक आणि व्हाइट- लेबल एटीएम ऑपरेटर मेट्रो आणि नॉन मेट्रो भागातील फीच्या वाढीसाठी एनपीसीआयच्या प्रस्तावाशी सहमत आहेत. मात्र, आरबीआय आणि एनपीसीआयनं या बाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

या संदर्भातील एका जाणकार व्यक्तीच्या दुजोऱ्यानं  स्पष्ट करण्यात आलं की, आरबीआयनं आयबीएच्या सीईओच्या अध्यक्षतेखाली एक दुसरी समिती बनवली आहे. यामध्ये एसबीआय आणि एचडीएफसी बँकेचे अधिकारी होते.  

खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खर्चाचा आढावा घेतल्यानंतर गेल्या सप्टेंबरमध्ये  यासंदर्भातील शिफारस केली होती. यानंतर एनपीसीआयच्या शिफारशीला मेट्रो सेक्टर्स साठी लागू केली जाऊ शकते. मात्र, खरा प्रश्न ग्रामीण आणि निमशहरी भागातील आहे.  

एटीएम चालवण्याच्या खर्चात वाढ

रिपोर्टनुसार वाढती महागाई आणि गेल्या दोन वर्षातील वाहतुकीचा वाढता खर्च, रोख रकमेची प्रतिपूर्ती  आणि इतर कारणांमुळं नॉन मेट्रो शहरं आणि ग्रामीण भागात एटीएम चालवण्याचा खर्च वाढत असल्याची माहिती आहे. 

इतर बातम्या :

Asian Paints : तिसऱ्या तिमाहीचा रिपोर्ट आला, एशियन पेंट्सचा नफा दुप्पट, शेअरमध्ये एका गोष्टीमुळं घसरला,शेअरधारकांकडून विक्री सुरु

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget