![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
RBI Governor Salary : आरबीआयचे गव्हर्नर असताना पगार किती, सुविधा कोणत्या? रघुराम राजन यांनी सांगितला आकडा
rbi Raghuram Rajan Salary : भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना पगार किती मिळायचा, याची माहिती स्वत: रघुराम राजन यांनी दिली.
![RBI Governor Salary : आरबीआयचे गव्हर्नर असताना पगार किती, सुविधा कोणत्या? रघुराम राजन यांनी सांगितला आकडा Reserve Bank Of India Governor Salary Raghuram rajan on How much government pay him as rbi governor salary RBI Governor Salary : आरबीआयचे गव्हर्नर असताना पगार किती, सुविधा कोणत्या? रघुराम राजन यांनी सांगितला आकडा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/26/56eb1e1a1451f197750b3b213ba915f11703602886649290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
RBI Governor Salary : भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर म्हणून मोठी जबाबदारी असते. देशातील अर्थव्यवस्थेची दिशा ठरवण्यात आरबीआय गव्हर्नरांची (Reserve Bank Of India Governor) मोठी भूमिका असते. आरबीआयकडे देशातील सगळ्याच बँकांच्या नियमन करण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँकेकडे असते. त्यामुळे रिझर्व्ह बँकेचे प्रमुख असलेल्या गव्हर्नरला किती पगार असेल, त्यांना कोणत्या सुविधा असतात, याबद्दल अनेकांना उत्सुकता असते. भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी गव्हर्नरपदावर असताना किती पगार होता आणि कोणती सुविधा मिळायची याबाबत माहिती दिली आहे.
आरबीयआयचे गव्हर्नर असताना चार लाख रुपये इतके मासिक वेतन मिळायचे अशी माहिती रघुराम राजन यांनी दिली आहे. आरबीआय गव्हर्नर असताना पगारापेक्षा शासकीय निवासस्थान अधिक महत्त्वाचे होते, असेही त्यांनी सांगितले.
युट्युबर राज शमानींसोबत पॉडकास्टवर संवाद साधताना रघुराम राजन यांनी ही माहिती दिली. आज त्यांना RBI गव्हर्नरच्या पगाराची माहिती नाही, पण त्यांच्या काळात त्यांना 4 लाख रुपये पगार मिळायचा असे रघुराम राजन म्हणाले. परंतु सर्वात मोठा फायदा म्हणजे आरबीआय गव्हर्नरचे अधिकृत घर आहे जे खूप मोठे आहे आणि आरबीआय गव्हर्नरचे घर मलबार हिल येथील देशातील दिग्गज उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर आहे.
पेन्शनचा लाभ नाही, वैद्यकीय सेवा मिळतात
रघुराम राजन म्हणाले, त्यांनी एकदा हिशोब केला होता, जर हे घर विकले किंवा भाडेतत्त्वावर दिले जसे बंदर प्राधिकरणाकडे दीर्घकालीन भाडेतत्वावर आहे, ज्यामुळे 450 कोटी रुपये मिळतात. जर तुम्ही त्यात गुंतवणूक केली तर तुम्ही RBI च्या उच्च अधिकार्यांचे पगार सहज देऊ शकता. आरबीआय गव्हर्नरला 4 लाख रुपये पगार पुरेसा आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तर ते म्हणाले की ते कॅबिनेट सचिवांसारखेच इतर सरकारी अधिकाऱ्यांसारखे आहेत. इतर सरकारी अधिकाऱ्यां इतकी पेन्शन मिळत नाही. मात्र वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. त्यांना पेन्शनही मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.
रघुराम राजन म्हणाले की, आरबीआय गव्हर्नर सरकारी अधिकारी असल्यामुळे त्यांना जास्त पेन्शन मिळते. त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, एक गव्हर्नर होता ज्यांनी आरबीआय आणि सरकारची दीर्घकाळ सेवा केली परंतु ते सरकारी कर्मचारी नसल्यामुळे त्यांना निवृत्ती वेतन मिळाले नाही. रघुराम राजन यांनी सांगितले की, त्यांच्याकडे पूर्णवेळ नोकरी असल्यामुळे त्यांना पेन्शनची गरज नाही.
सुविधा कोणत्या मिळतात?
रघुराम राजन म्हणाले की, गव्हर्नरपद भूषवताना इतर सुविधांप्रमाणे एक कार मिळते आणि घराच्या देखभालीसाठीही भरपूर पैसे मिळतात. हे घर खूप जुने असल्याने त्याची देखभाल करण्याची गरज आहे. ते म्हणाले की, भारतासारख्या देशात सरकारी कामांसाठी आलिशान वाहने वापरणे योग्य नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)