(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुकेश अंबानींची मोठी घोषणा, तीन वर्षांत 20,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार
भारतातील (India) सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी मोठी घोषणा केली आहे.
Reliance Industries : भारतातील (India) सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी मोठी घोषणा केली आहे. अंबानी यांनी पश्चिम बंगालमधील (West Bengal) गुंतवणुकीबाबत ही मोठी घोषणा केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries ) पुढील तीन वर्षांत पश्चिम बंगालमध्ये 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. मुकेश अंबानी यांनी बंगाल ग्लोबल बिझनेस समिटमध्ये बोलताना याबाबतची माहिती दिली.
तीन वर्षांत 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
रिलायन्स इंडस्ट्रीज पुढील तीन वर्षांत 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. डिजिटल लाइफ सोल्युशन्सपासून ते बायोगॅसपर्यंत सर्व गोष्टींसाठी ही गुंतवणूक केली जाणार आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी बंगालमधील गुंतवणुकीबाबतची ही मोठी घोषणा केली आहे. डिजिटल लाइफ सोल्युशन्स, रिटेल आणि बायो एनर्जीमध्ये गुंतवणूक केली जाईल. यामुळं बंगालचा विकास होईल. त्यासाठी त्यांची कंपनी कोणतीही कसर सोडणार नाही, असे अंबानी म्हणाले. कोलकाता येथील कालीघाट मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
रिलायन्सने बंगालमध्ये किती गुंतवणूक केली आहे
मुकेश अंबानी यांच्या कंपनीने बंगालमध्ये आधीच गुंतवणूक केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या काही वर्षांत या राज्यात विविध क्षेत्रात सुमारे 45 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्स बंगालच्या विकासाला गती देण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, अंबानी म्हणाले की, रिलायन्स फाऊंडेशन कोलकात्याच्या कालीघाट मंदिराचा "मूळ वैभव" पुनर्संचयित करण्यासाठी पुनर्विकास हाती घेणार आहे.
राज्यातील लाखो लोकांसाठी नवीन रोजगार मिळणार
Jio या वर्षाच्या अखेरीस जगातील सर्वात वेगवान 5G रोलआउट पूर्ण करणार आहे. कंपनीने बंगालमधील बहुतेक भाग कव्हर केले आहेत. आम्ही 5G ची क्रांतीकारी शक्ती राज्याच्या कानाकोपऱ्यात नेत आहोत. 5G विशेषत: खेड्यांमध्ये आणले जात आहे. जिओ फायबर आणि एअर फायबरच्या जलद रोलआउटसह पश्चिम बंगालमधील प्रत्येक घराला स्मार्ट होममध्ये रुपांतरित करण्याबद्दल अंबानी यांनीही सांगितले. या बदलामुळं राज्यातील लाखो लोकांसाठी नवीन रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी खुल्या होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तीन वर्षात 100 बायोगॅस प्रकल्प
मुकेश अंबानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स रिटेल राज्यात आपले अस्तित्व वाढवत आहे. पुढील दोन वर्षात त्यांची अंदाजे 1,000 रिटेल स्टोअर्स 1,200 पेक्षा जास्त वाढवली जातील. रिलायन्स पुढील तीन वर्षांत 100 बायोगॅस (CBG) संयंत्रे उभारण्याची योजना आखत आहे. मोठ्या प्रमाणावर ऊर्जा तयार करुन शेतकऱ्यांसाठी मदत करण्यात येणार आहे. ज्यामुळं 2 दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल. तसेच दरवर्षी 2.5 दशलक्ष टन सेंद्रिय खत तयार होईल.
महत्त्वाच्या बातम्या: