मुकेश अंबानी देणार पेप्सी आणि कोका कोलाला टक्कर, 'या' बड्या कंपनीसोबत केला करार
रिलायन्स रिटेल व्हेंचर्सची उपकंपनी असलेल्या रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सने श्रीलंकेच्या एलिफंट हाऊससोबत (Elephant House) भागीदारीची घोषणा केली आहे.
Reliance News : रिलायन्स समुहाचा (Reliance Group) नुकताच डिस्नेसोबत करार झाल्यानंतर पुन्हा एकदा उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचर्सची उपकंपनी असलेल्या रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सने श्रीलंकेच्या एलिफंट हाऊससोबत (Elephant House) भागीदारीची घोषणा केली आहे. त्यानंतर कोला मार्केटमधील हालचाली तीव्र झाल्या आहेत.
सध्या जगातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरातआनंदाचे वातावरण आहे. कारण त्यांच्या मुलाच्या लग्नाची तारीख निश्चित झाल्यापासून त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. अलीकडेच, डिस्नेचे रिलायन्समध्ये विलीनीकरण झाल्याची घोषणा झाली होती. त्यानंतर आता रिलायन्स समुहाने आणखी एक करार केला आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचर्सची उपकंपनी असलेल्या रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सने श्रीलंकेच्या एलिफंट हाऊससोबत भागीदारीची घोषणा केली आहे. तेव्हापासून कोला मार्केटमधील धांदल आणखीनच वाढली आहे.
शीतपेयांचे उत्पादन वाढवणार
या करारांतर्गत, रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सने संपूर्ण भारतात एलिफंट हाऊस ब्रँड अंतर्गत शीतपेयांचे उत्पादन, विपणन आणि वितरणाचे अधिकार प्राप्त केले आहेत. RCPL कडे आधीच कॅम्पा, सोस्यो आणि रसिक सारखे सुप्रसिद्ध ब्रँड आहेत. आरसीपीएलने एलिफंट हाऊस ब्रँडचे अधिग्रहण केल्यानंतर, कंपनीचा पेय पदार्थ पोर्टफोलिओ मजबूत झाला आहे. एलिफंट हाऊस सिलोन कोल्ड स्टोअर्स पीएलसीच्या मालकीचे आहे, जो जॉन कील्स होल्डिंग्स पीएलसीची उपकंपनी आहे. श्रीलंकेतील सर्वात मोठा समूह आहे. एलिफंट हाऊस ब्रँड अंतर्गत, ते नेक्टो, क्रीम सोडा, ईजीबी (जिंजर बीअर), ऑरेंज बार्ली आणि लेमोनेड यांसारखी अनेक पेये तयार करते आणि विकते.
हा करार मैलाचा दगड
भारतीय बाजारपेठेत एलिफंट हाऊस ब्रँडच्या विस्ताराची घोषणा आणि रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडसोबतची भागीदारी हा मैलाचा दगड ठरणार असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. RCPL भारतीय ग्राहकांना जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त ब्रँड आणि उत्पादनांचा विस्तृत पोर्टफोलिओ प्रदान करण्याचा प्रयत्न करते. यासाठी, RCPL विविध बाजारपेठेतील अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या मल्टी-चॅनल ऑपरेशन्सचा झपाट्याने विस्तार करत आहे.
वायकॉम 18 मीडिया प्रायव्हेट लिमिटेड (Viacom18) आणि वॉल्ट डिस्ने यांच्यातही करार
रिलायन्सच्या वायकॉम 18 मीडिया प्रायव्हेट लिमिटेड (Viacom18) आणि वॉल्ट डिस्ने कंपनी यांच्यात एक करार झाला असून या दोन्ही कंपन्यांनी मनोरंजन क्षेत्रात एक जॉईंट व्हेंचर (Joint Venture) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या भागीदारीअंतर्गत रिलायन्सकडून 11,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. नीता अंबानी (Nita Ambani) या संयुक्त उपक्रमाच्या अध्यक्ष असतील तर उदय शंकर उपाध्यक्ष असतील. उदय शंकर हे या संयुक्त उपक्रमासाठी धोरणात्मक मार्गदर्शन करणार आहेत.
महत्वाच्या बातम्या:
रिलायन्स आणि डिस्नेमध्ये मोठा करार, नव्या जॉईंट व्हेंचरमध्ये मुकेश अंबांनी करणार 11,500 कोटींची गुंतवणूक, नीता अंबानी असतील प्रमुख