Credit Card: देशात क्रेडिट कार्डच्या थकबाकीमध्ये 29.6 टक्क्यांची विक्रमी वाढ, RBI कडून जानेवारी महिन्याची आकडेवारी जाहीर
RBI on Credit Card: क्रेडिट कार्डच्या वापरातून होणारी उलाढाल 1.87 लाख कोटीवर पोहोचली असून तोही एक विक्रम आहे असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटलं आहे.
मुंबई : देशातील क्रेडिट कार्डच्या (Credit card) वापरामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून येत असलं तरी त्याच्या थकबाकीमध्येही मोठी वाढ झाल्याचं स्पष्ट झालं आहे. जानेवारी महिन्यात क्रेडिट कार्डवरील थकबाकीमध्ये उच्चांकी वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात भारतात क्रेडिट कार्डच्या थकबाकीमध्ये 29.6 टक्क्यांची विक्रमी वाढ झाली आहे. या माध्यमातून होणारी उलाढाल 1.87 लाख कोटीवर पोहोचली असून तोही एक विक्रम आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या ताज्या आकडेवारीतून ही गोष्ट समोर आली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या ताज्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 10 महिन्यांत क्रेडिट कार्डची थकबाकी 20 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. जूनमध्ये सर्वाधिक वाढ 30.7 टक्के होती.
जानेवारी 2023 अखेरीस विविध बँकांनी सुमारे 8.25 कोटी क्रेडिट कार्ड जारी केले होते. क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या बाबतीत देशातील पहिल्या पाच बँका एचडीएफसी बँक, एसबीआय कार्ड, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक आणि कोटक बँक आहेत. रिझर्व्ह बँकेच्या डेटावरून असंही दिसून आलं आहे की जानेवारी 2023 मध्ये क्रेडिट कार्डच्या थकबाकीमध्ये वार्षिक वाढ 29.6 टक्के इतकी झाली होती. ही वाढ एका वर्षापूर्वी, जानेवारी महिन्यात सुमारे 10 टक्के होती. जानेवारी 2022 मध्ये थकबाकीची रक्कम 1,41,254 कोटी रुपये होती, जी जानेवारी 2023 मध्ये वाढून 1,86,783 कोटी रुपये झाली.
अनेक श्रेण्यांच्या डिजिटायझेशनमुळे ग्राहक त्यांच्या क्रेडिट कार्डद्वारे अधिक खर्च करत असल्याचं आरबीआयकडून सांगण्यात आलं आहे. विशेषत: आरोग्य आणि फिटनेस, शिक्षण, पाणी आणि लाईट बिल या गोष्टींसाठी क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येतंय. गेल्या काही महिन्यांपासून क्रेडिट कार्डद्वारे होणाऱ्या खर्चात सातत्याने वाढ झाली आहे. या वर्षी जानेवारीमध्ये क्रेडिट कार्डद्वारे 1.28 लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले, जे डिसेंबर 2022 मध्ये 1.26 लाख कोटी रुपये होते.
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीवरून असेही दिसून आले आहे की क्रेडिट कार्डच्या थकबाकीमध्ये वाढ झाली आहे. जानेवारी 2023 मध्ये ती वाढ 29.6 टक्के इतकी होती, जी एका वर्षापूर्वी याच महिन्यात जवळपास 10 टक्के होती. जानेवारी 2022 मध्ये थकबाकीची रक्कम 1,41,254 कोटी रुपये होती, जी जानेवारी 2023 मध्ये वाढून 1,86,783 कोटी रुपये झाली.
ही बातमी वाचा: