एक्स्प्लोर

Credit Card Fraud : माधुरी दीक्षित, अभिषेक आणि धोनीचं ओळखपत्र वापरुन लाखोंची फसवणूक, बनावट क्रेडिट कार्ड काढून खरेदी

Cyber Credit Card Fraud : बॉलिवूड अभिनेते आणि क्रिकेटपटूंची ओळखपत्र वापरून क्रेडिट कार्ड बनवून लाखोंची फसवणूक केल्याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Cyber Credit Card Fraud : सायबर गुन्ह्यांमध्ये (Cyber Crime) दिवसेंदिवस वाढ होत आहे. सायबर गुन्ह्यांसाठी गुन्हेगार दिवसेंदिवस नवनवीन प्रकाराचा अवलंब करतात. आता गुन्हेगांरी चक्क बॉलिवूड अभिनेते आणि क्रिकेटपटूंची ओळखपत्र वापरुन क्रेडिट कार्ड बनवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

जीएसटी क्रमांकांवरुन पॅन कार्डचा डेटा चोरला

एका टोळीने अनेक बॉलिवूड अभिनेते आणि क्रिकेटपटूंच्या जीएसटी क्रमांकांवरुन पॅन कार्डचा डेटा चोरला आणि पुण्यातील फिनटेक स्टार्टअप 'वन कार्ड'कडून त्यांच्या नावाने जारी केलेली क्रेडिट कार्ड मिळवली आणि त्यावरुन खरेदी करत लाखो रुपयांची फसवणूक केली. बॉलिवूड अभिनेते आणि क्रिकेटपटू यांचे GST क्रमांक ऑनलाईन उपलब्ध आहेत, अशी माहिती हॅकर्सना मिळाली होती. त्याच्या आधारे हॅकर्सनी बॉलिवूड अभिनेते आणि क्रिकेटपटू यांचे PAN डिटेल्स काढले आणि त्याद्वारे त्यांच्या नावाने बनावट क्रेडिट कार्ड जारी करत फसवणूक केली.

क्रेडिट कार्ड कंपनीकडून पोलिसांत तक्रार

पुण्यातील फिनटेक स्टार्टअप कंपनीने या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. एफपीएल टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून ‘वन कार्ड’ क्रेडिट कार्ड जारी केलं जातं. तसेच ऑनलाईन सेवाही पुरवल्या जातात. या क्रेडिट कार्डचा वापर ग्राहक ऑनलाईन खरेदी-विक्रीसाठी करु शकतात.

सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंच्या ओळखपत्रांचा गैरवापर

कंपनीने आरोप केला आहे की, "या फसवणूक करणाऱ्यांनी बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंच्या नावावर जारी केलेले क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी पॅन आणि आधार क्रमांक ही माहिती अपलोड करुन अॅपद्वारे कंपनीशी संपर्क साधला होता."

'या' बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंच्या नावाने फसवणूक

दिल्लीतील शाहदरा पोलीस उपायुक्त रोहित मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सायबर गुन्हेगारांनी अभिषेक बच्चन, शिल्पा शेट्टी, माधुरी दीक्षित, इमरान हाशमी आणि महेंद्र सिंग धोनी यांचं नाव आणि पॅन कार्ड वापरु क्रेडिट कार्ड बनवली."

क्रेडिट कार्डने खरेदी केलं 21.32 लाख रुपयांचं सामान

बनावट क्रेडिट कार्ड वापरनू आरोपींनी 21.32 लाख रुपयांची खरेदी केली होती. क्रेडिट कार्ड कंपनीला फसवणूक झाल्याचे नंतर कळले. त्यानंतर कंपनीने तात्काळ दिल्ली पोलिसांना याची माहिती दिली, त्यांनी कारवाई करत याप्रकरणी पाच जणांना अटक केली.

पाच आरोपी अटकेत

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनीत, मोहम्मद आसिफ, सुनील कुमार, पंकज मिश्रा आणि विश्व भास्कर शर्मा अशी पाच आरोपींची ओळख पटली आहे. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09 PM 19 January 2024Special Report Saif Ali Khan Attacker :र्जी, G-पे आणि बेड्या;सैफच्या 'जानी दुश्मन'च्या अटकेची कहाणीWankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget